मुंबई, 07 जानेवारी : काही महिन्यांपूर्वी देशात 5G नेटवर्क सुविधा लाँच करण्यात आली. सध्या प्रमुख शहरांमध्ये 5G नेटवर्क सुविधा मिळत आहे. हळूहळू या सुविधेचा विस्तार सुरू आहे. काही प्रमुख टेलिकॉम कंपन्यांनी 5G नेटवर्क सुविधा देण्यास सुरुवात केली आहे. 5G नेटवर्कच्या पार्श्वभूमीवर जिओनं एक नवीन रिचार्ज प्लॅन ग्राहकांसाठी लाँच केला आहे. या प्लॅनची किंमत 61 रुपये आहे. या प्लॅनमध्ये युजर्सला 5G डाटा मिळतो. ज्या युजर्सला 5G नेटवर्कमध्ये अपग्रेड व्हायचं आहे, त्यांच्यासाठी कंपनीने हा प्लॅन लाँच केला आहे. या प्लॅनमध्ये युजर्सला अन्य कोणतेही बेनिफिट्स मिळणार नाहीत. हा प्लॅन नेमका कसा आहे, ते जाणून घेऊया. जिओने 5G लाँच केल्यापासून बहुतांश ग्राहक 5G प्लॅन्सच्या प्रतीक्षेत आहेत. पण कंपनीने यासाठी वेगळा कोणताही प्लॅन लाँच केलला नाही. काही रिचार्ज प्लॅनवर युजर्सला 5G एलिजिबीलिटी मिळत आहे. पण ज्यांना ती मिळत नाही, अशा युजर्ससाठी जिओनं 5G अपग्रेड नावानं नवीन रिचार्ज प्लॅन लाँच केला आहे. जिओ कंपनीने नुकतीच एका नव्या प्लॅनची घोषणा केली आहे. हा रिचार्ज प्लॅन 5G मध्ये अपग्रेड करू इच्छिणाऱ्या युजर्ससाठी लाँच करण्यात आला आहे. कंपनीचे बहुतांश प्लॅन 5G एलिजिबिलिटीसह आहेत. पण काही रिचार्ज प्लॅनमध्ये युजर्सला 4G डाटा मिळतो. त्यामुळे असे युजर्स हा नवा प्लॅन घेत 5G मध्ये अपग्रेड होऊ शकतात. हेही वाचा : दमदार बॅटरी अन् 50MP कॅमेऱ्यासह लाँच झाला Redmiचा तगडा स्मार्टफोन, किंमतही बजेटमध्ये हा रिचार्ज प्लॅन खरेदी केल्यावर फोनमध्ये लगेच 5G नेटवर्क मिळेल असं नाही. जर तुमच्याकडे 5G स्मार्टफोन असेल आणि तुम्ही राहत असलेल्या परिसरात जिओचं 5G नेटवर्क उपलब्ध असेल तरच तुम्हाला 5G नेटवर्क सुविधा मिळेल. जिओची 5G सुविधा अजून सर्व युजर्ससाठी उपलब्ध करुन देण्यात आलेली नाही. सध्या ही सुविधा निवडक ग्राहकांनाच मिळत आहे. कंपनीची 5G नेटवर्क सुविधा वापरण्यासाठी तुमच्याकडे Jio Welcome Offer असणं गरजेचं आहे. या ऑफर अंतर्गत तुम्हाला अनलिमिटेड 5G डाटाचा अॅक्सेस मिळू शकतो. यासाठी तुम्ही My Jio अॅपवर जाऊन रजिस्टर करू शकता. जिओचा 61 रुपयांचा रिचार्ज प्लॅन खरेदी करून तुम्ही 5Gमध्ये अपग्रेड करु शकता. या प्लॅन अंतर्गत युजर्सला 5G डाटा मिळतो. या प्लॅनची किंमत अर्थातच 61 रुपये आहे. जिओचा हा प्लॅन एक डाटा व्हाउचर आहे. यामध्ये तुम्हाला अन्य कोणतेही बेनिफिट मिळत नाहीत. याचाच अर्थ तुम्ही 61 रुपयांचे रिचार्ज केले तर तुम्हाला या प्लॅनमध्ये कॉलिंग किंवा एसएमएस अशा कोणत्याही सुविधा मिळत नाहीत. यामध्ये तुम्हाला 6GB 5G डाटा मिळेल. तसेच युजर्स अनलिमिटेड 5G डाटा वापरण्यास पात्र असेल. या प्लॅनची कोणतीही वैधता नाही, उलट सक्रिय प्लॅनची वैधता हा प्लॅन कमी करेल. जिओच्या या ऑफरचा फायदा 119 रुपये, 149 रुपये, 179 रुपये , 199 रुपये आणि 209 रुपयांवर मिळेल. यापेक्षा जास्त किमतीचे रिचार्ज प्लॅन 5G एलिजिबिलिटीसह येतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.