मुंबई, 8 नोव्हेंबर: तुम्हाला माहिती आहे का की नवीन वाहन खरेदी केल्यावर सरकारला जीएसटीच्या रूपात दरवर्षी करोडो रुपयांचा फायदा होतो. त्यामुळे वेळोवेळी स्क्रॅपिंग पद्धतीत बदल घडवून आणण्याची तयारी केली जाते. गेल्या वर्षी म्हणजे 2021 मध्ये याबाबत एक मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आली होती. तुमच्याकडेही अशी एखादी कार, बाईक किंवा स्कूटर आहे जी विकायचा तुम्ही विचार करत आहात? वाहन विकण्याची योग्य वेळ तुम्हाला माहीत आहे का?वेळेत वाहन विकून हजारो रुपयांची बचत होऊ शकते. काही लोक जुनी वाहने विकायला जातात, तेव्हा त्यांना योग्य भाव मिळत नाही. त्यामुळे सरकारनं जारी केलेल्या नियमांनुसार योग्य वेळी त्याची विक्री झाली पाहिजे. नवीन कार का विकायची? शोरूममधून नवीन वाहन काढल्यानंतर काही महिन्यांनी लोक ते विकतात. या मागचे कारण माहित आहे का? खरंतर यामागे खूप मोठं कारण आहे, ज्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. खरं तर, ज्या वाहनांचा अपघात होतो आणि काही कारणास्तव विम्याचा दावा पास होत नाही, अशा गाड्या लोक दुरुस्तीनंतर विकतात. या वाहनांची विक्री करताना योग्य किंमत मिळते. वास्तविक लोक कार खरेदी करताना किलोमीटर आणि खरेदीची तारीख पाहतात. पण गाडी वेगळी दुरुस्त केल्याचे त्यांना माहीत नसतं. हेही वाचा: Volvo ex90: इलेक्ट्रिक कार आहे की पॉवर बँक, घरालाही पुरवू शकते वीज सरकारच्या स्क्रॅपिंग धोरणापूर्वी कार विका- सरकारने जारी केलेल्या नवीन स्क्रॅपिंग धोरणानुसार, 15 वर्षे जुन्या पेट्रोल कार आणि 10 वर्षे जुन्या डिझेल कार स्क्रॅप करण्याचा नियम आहे. मात्र त्यातही काही बदल आहेत. पण इथे मुद्दा कार विकण्याचा आहे, अशा परिस्थितीत गाड्या त्यांच्या निम्म्या वयाच्या म्हणजे पेट्रोल कार 7 ते 8 वर्षे आणि डिझेल 5 ते 6 वर्षांच्या दरम्यान विकल्या पाहिजेत. अशा प्रकारे, तुम्हाला कारची योग्य किंमत देखील मिळेल.
इंजिनमध्ये समस्या असल्यास… कारमध्ये इंजिनमध्ये काही दोष आढळल्यास, त्याची विक्री करण्याबाबत त्वरित निर्णय घ्या. कारण एकदा इंजिनचे काम सुरु झालं की, कारचा परफॉर्मन्स पूर्वीप्रमाणं कधीच होत नाही. त्याच वेळी, एकदा इंजिन दुरुस्त केलं की ते पुन्हा पुन्हा खराब होते. अशा परिस्थितीत त्याची विक्री करणं हा योग्य पर्याय आहे.

)







