जाहिरात
मराठी बातम्या / ऑटो अँड टेक / पावसात कार-बाईक बंद पडली तर गाडी रिस्टार्ट कशी करायची? तुम्ही 'ही' चूक करता का?

पावसात कार-बाईक बंद पडली तर गाडी रिस्टार्ट कशी करायची? तुम्ही 'ही' चूक करता का?

पावसात कार-बाईक बंद पडली तर गाडी रिस्टार्ट कशी करायची? तुम्ही 'ही' चूक करता का?

पावसाळ्यात रस्त्यावर अनेकदा पाणी तुंबते. अशा परिस्थितीत कार किंवा बाईकने येणाऱ्या लोकांना अडचणींचा सामना करावा लागतो. पावसामुळे पाणी साचल्याने कार आणि दुचाकींचे नुकसान होते.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 5 जून : पावसाळ्यात (Monsoon season) रस्त्यावर अनेकदा पाणी तुंबते. अशा परिस्थितीत कार किंवा बाईकने येणाऱ्या लोकांना अडचणींचा सामना करावा लागतो. पावसामुळे पाणी साचल्याने कार (Car Safety) आणि दुचाकीचे (Bike) नुकसान होण्याची शक्यता सर्वाधिक आहे. अशा स्थितीत वाहनाच्या इंजिनमध्ये पाणी जाण्याचाही धोका असतो, त्यामुळे वाहन बंद पडते. तुम्हालाही अशा समस्यांचा सामना करावा लागला असेल, तर या पद्धतींचा वापर करून तुम्ही तुमची कार-बाईक सुरक्षित ठेवू शकता. कार-बाईक अर्ध्याहून अधिक बुडाली तर? पावसाळ्यात अनेक वेळा रस्ते इतके पाण्याने भरतात की तुमची कार-बाईक अर्ध्याहून अधिक पाण्यात बुडते. अशा परिस्थितीत इंजिनपर्यंत पाणी पोहोचल्याने ते अनेकदा बंद होते. अशा वेळी तुमची कार-बाईक पाण्यापासून दूर ढकलून किंवा टोइंग करून पाण्यातून बाहेर काढा. जर कार अर्ध्याहून अधिक पाण्यात बुडली असेल आणि बाहेर पडण्याचा मार्ग नसेल तर चारही बाजूंनी दरवाजे उघडा, जेणेकरून कार बुडणार नाही. अशा स्थितीत गाडी सुरू करण्याचा अजिबात प्रयत्न करू नका, कारण इंजिनमध्ये पाणी जाऊ शकते. जेथून पाणी बाहेर पडेल अशा ठिकाणी काही तास कार-बाईक ठेवा. यानंतर कार सुरू करा, जर गाडीचे इंजिन सुरू झाले नाही तर मेकॅनिकला बोलवा. 1 जूनपासून महाग होणार Car Insurance, भरवा लागणार इतका इन्शुरन्स पाणी साचलेल्या ठिकाणी पहिल्या गीअरमध्ये गाडी चालवा पावसात कधीही जास्त वेगाने वाहन चालवू नका. जर तुम्हाला इंजिनमध्ये पाणी जाण्यापासून रोखायचे असेल, तर पहिल्या किंवा दुसऱ्या गीअरमध्ये कमी वेगाने गाडी चालवा. त्यामुळे लगेच ब्रेक लावणे सोपे होईल आणि गाडीही सुरक्षित राहील. ब्रेक, क्लच पेडलमधूनही पाणी आत शिरू शकते. हे टाळण्यासाठी गाडी चालवताना हलके ब्रेक वापरा. यामुळे ब्रेक शूमधील पाणी निघून जाते आणि ते लवकर सुकते. सुरक्षेसाठी, आपले वाहन समोरच्या वाहनाच्या मागे ठेवा. कारण रस्त्यावर पाणी असताना खड्डे दिसत नाहीत. दुचाकीस्वारांनी या गोष्टी लक्षात ठेवा जर तुम्ही दुचाकीवरून जात असाल तर सुरक्षिततेसाठी नेहमी हेल्मेट घालून पावसाळ्यात बाहेर जा. बाईकची चाके कमी रुंद असतात. त्यामुळे नेहमी मागील ब्रेकचा वापर करा. त्यामुळे दुचाकी घसरण्याचा धोका कमी होईल. पावसात बाईक थांबली तर लगेच पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न करू नका. बाईकमधून पाणी निघेपर्यंत थांबा आणि मग ती सुरू करा. स्टार्ट किकने कार सुरू होत नसल्यास, स्पार्क प्लग तपासा. स्वच्छ सुती कापडाने स्पार्क प्लग साफ केल्यानंतर, त्याला करंट येत आहे का ते तपासा. करंट येत नसेल तर बॅटरी तपासा. बॅटरी फिक्स करूनही बाईक सुरू होत नसेल तर मेकॅनिकला बोलवा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात