जाहिरात
मराठी बातम्या / ऑटो अँड टेक / Bike Tips and Tricks: तुमची बाइकही देईल उत्तम मायलेज, फक्त फॉलो करा ‘या’ टिप्स

Bike Tips and Tricks: तुमची बाइकही देईल उत्तम मायलेज, फक्त फॉलो करा ‘या’ टिप्स

Bike Tips and Tricks: तुमची बाइकही देईल उत्तम मायलेज, फक्त फॉलो करा ‘या’ टिप्स

Bike Tips and Tricks: तुमची बाइकही देईल उत्तम मायलेज, फक्त फॉलो करा ‘या’ टिप्स

How To Increase Bike Mileage: अनेकवेळा आपली बाईक जास्त मायलेज देत नसल्याचं पाहायला मिळतं. बाइकचे मायलेज कमी-जास्त असल्याने त्याचा थेट परिणाम आपल्या खिशावर होतो.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 07 ऑगस्ट: भारतात बाइक चालकांची संख्या खूप जास्त आहे. देशातील कोट्यवधी लोक दुचाकीचा वापर करतात. मात्र लोकांना बाइक चालवताना मायलेजशी संबंधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अनेकवेळा आपली बाईक जास्त मायलेज देत नसल्याचं (How To Increase Bike Mileage) पाहायला मिळतं. बाइकचे मायलेज कमी-जास्त असल्याने त्याचा थेट परिणाम आपल्या खिशावर होतो. कारण अलीकडच्या काळात पेट्रोलचे दर प्रचंड प्रमाणात वाढले आहेत. अशा परिस्थितीत जर तुमची बाईक चांगलं मायलेज देत नसेल, तर अशा परिस्थितीत तुम्हाला खूप खर्च करावा लागू शकतो. आज आम्ही तुम्हाला अशाच काही खास टिप्स सांगणार आहोत, ज्याचा अवलंब करून तुम्ही तुमच्या बाइकचं मायलेज वाढवू शकता. बाईकचं मायलेज वाढल्यानंतर तुमच्या पेट्रोलची खूप बचत होईल. चला जाणून घेऊया खास टिप्स- 1. ब्रेकचा वापर फूट रेस्टसारखा करू नका- अनेकदा लोक ब्रेकचा वापर फूट रेस्ट म्हणून करतात. तुम्हीही ही चूक करत असाल तर त्याचा थेट परिणाम तुमच्या बाइकच्या मायलेजवर होतो. अधिक मायलेज मिळविण्यासाठी, तुम्ही तुमचा पाय ब्रेक पँडलवर न ठेवता, तो फूटरेस्टवरच ठेवावा. 2. बाईकची वेळोवेळी सर्व्हिस करत रहा- तुम्ही तुमची बाईक वेळोवेळी सर्व्हिसिंग करत राहावी. सर्व्हिसिंग केल्यानं तुमच्या बाईकची चेन, इंजिन आणि इतर ठिकाणं व्यवस्थित ऑईल होतात. याचा थेट परिणाम तुमच्या बाइकच्या परफॉर्मन्स आणि मायलेजवर होतो. हेही वाचा-  EPFO: जुन्या कंपनीचा PF कसा करायचा विलीन? फक्त 5 मिनिटांचं आहे काम, नंतर मिळेल मोठं व्याज 3. दुचाकीवर अतिरिक्त भार टाकू नका- अनेकदा बाइकवर अतिरिक्त भार टाकल्यानं तिचे मायलेज कमी होते. अतिरिक्त भार थेट बाईकच्या इंजिनवर परिणाम करतो. वाढलेल्या भारामुळे तिला जास्त इंधन वापरावं लागतं. यामुळं बाइकचं मायलेज मोठ्या प्रमाणात कमी होतं. 4. दुचाकी मध्यम वेगाने चालवा- तुम्ही तुमची बाईक सरासरी वेगानं चालवावी. बाईक वेगानं चालवल्यास त्यात इंधनाचा वापर खूप जास्त होतो. अशा परिस्थितीत, अधिक मायलेज मिळविण्यासाठी, आपण ती मध्यम आणि एकसारख्या वेगाने चालवावी.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: mileage
  • First Published :
जाहिरात
जाहिरात