जाहिरात
मराठी बातम्या / ऑटो अँड टेक / Electric Vehicle: व्हेईकल नेमकं कसं काम करतं? समजून घ्या सोप्या शब्दात

Electric Vehicle: व्हेईकल नेमकं कसं काम करतं? समजून घ्या सोप्या शब्दात

Electric Vehicle: इलेक्ट्रिक व्हेईकल नेमकं कसं काम करतं? समजून घ्या सोप्या शब्दात

Electric Vehicle: इलेक्ट्रिक व्हेईकल नेमकं कसं काम करतं? समजून घ्या सोप्या शब्दात

Electric Vehicle : सध्या इलेक्ट्रिक कारच्या (Electric Car) मागणीत सातत्याने वाढ होत आहे. आता इलेक्ट्रिक कारकडे भविष्य म्हणून पाहिलं जात आहे.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 24 सप्टेंबर: सध्या इलेक्ट्रिक कारच्या (Electric Car) मागणीत सातत्याने वाढ होत आहे. आता इलेक्ट्रिक कारकडे भविष्य म्हणून पाहिलं जात आहे. यामुळेच बहुतांश कंपन्या आता चांगली रेंज आणि परफॉर्मन्स असलेल्या इलेक्ट्रिक कार्स बाजारात आणत आहेत. भारतात अशा अनेक कंपन्या आहेत, ज्या वेगाने इलेक्ट्रिक कार बनवण्यात गुंतलेल्या आहेत. महत्त्वाचं म्हणजे त्याचे अनेक फायदे आहेत. या कारचं मेकॅनिझम जितकं साधं आणि सोपं आहे, तितकंच ते गुंतागुंतीचं दिसतं. EV कसं काम करते, ते सोप्या भाषेत समजून घेऊ या. इलेक्ट्रिक कारमध्ये बॅटरी पॅक (Battery Pack), पॉवर कंट्रोल युनिट (Power Control Unit), इलेक्ट्रिक मोटर (Electric Motor Unit), ड्राइव्ह मोड (Drive Mode) आणि बॅटरी चार्जर (Battery Charger) हे भाग असतात. या सर्व घटकांच्या साह्याने ही गाडी चालते. बॅटरी पॅक- बॅटरी पॅक हा कोणत्याही इलेक्ट्रिक कारचा सर्वांत महत्त्वाचा भाग असतो. यावरून कारची रेंज आणि पॉवर ठरवली जाते. इलेक्ट्रिक कारमध्ये बॅटरी पॅक सर्वांत महाग असतो. तो गाडीत फिट केला जातो. बॅटरी पॅकमध्ये लहान मॉड्युल्स असतात. त्यांच्या साह्याने कारला शक्ती मिळते. ही एक सर्वसामान्य बॅटरी असते; पण तिची क्षमता खूप जास्त असते. **हेही वाचा:** Washing Machine: 20,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळतायेत ‘या’ टॉप वॉशिंग मशिन्स; मिळतीये मोठी सवलत, पाहा लिस्ट इलेक्ट्रिक मोटर- हादेखील कारचा एक महत्त्वाचा आणि अत्यावश्यक भाग आहे. बॅटरी पॅकमधून प्राप्त होणारी पॉवर डीसी टू एसी कन्व्हर्शन करून मोटरमध्ये ट्रान्समिट केली जाते. यानंतर मोटर पॉवरला अ‍ॅक्सेलवर ट्रान्समिट करते. याचाच अर्थ ती अ‍ॅक्सेलला फिरवण्याचं काम करते. काही ईव्हीला प्रत्येक व्हीलला मोटर दिली जाते. काही ईव्हीमध्ये एक किंवा दोन मोटर्स असतात. ड्राइव्ह मोड- हे फक्त एक प्रकारचे ट्रान्समिशन आहे. इतर वाहनांमध्ये ज्याप्रमाणे गिअर्स असतात, त्याचप्रमाणे इलेक्ट्रिक कारमध्ये गिअर्स नसतात. परंतु एकच ट्रान्समिशन सिस्टम असते. ती रिव्हर्स आणि फ्रंट मूव्हमेंटला कंट्रोल करते. तुम्ही याला सिंगल गिअरदेखील म्हणू शकता.

    News18लोकमत
    News18लोकमत

    बॅटरी चार्जर- इलेक्ट्रिक कारसाठी बॅटरी चार्जर हा महत्त्वाचा घटक आहे. तो AC पॉवरला DC मध्ये कन्व्हर्ट करून बॅटरी चार्ज करण्याचं काम करतो. साधारणपणे, बॅटरी चार्ज होण्यास बराच वेळ लागतो, असं दिसून येतं. त्याचं हेच कारण आहे, की जेव्हा पॉवर AC स्वरूपातून DC मध्ये रूपांतरित होते, तेव्हा अँपिअर लॉस होतो आणि त्यामुळे बॅटरी चार्ज होण्यास वेळ लागतो. मार्केटमध्ये उपलब्ध असणाऱ्या कोणत्याही ईव्हीमध्ये या सर्वांत महत्वाच्या गोष्टी आहेत. त्याशिवाय ईव्ही चालू शकत नाही.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात