मराठी बातम्या /बातम्या /ऑटो अँड टेक /

कोणाचा कॉल येणार आहे हे Truecaller ला आधीच कसं कळतं? 'हे' तंत्रज्ञान आहे कारण!

कोणाचा कॉल येणार आहे हे Truecaller ला आधीच कसं कळतं? 'हे' तंत्रज्ञान आहे कारण!

ज्यांच्याकडे Truecaller हे अ‍ॅप आहे, त्यांनी हे बघितलं असेल, की फोन येण्याच्या काही सेकंद आधीच स्क्रीनवर कॉलर आयडी अलर्ट दिसतो. त्यामध्ये 'इनकमिंग कॉल बाय...' असं लिहून कोणाचा फोन येत आहे त्या कॉलरचं नाव असतं. कॉल प्रत्यक्षात कनेक्ट होण्याच्या सुमारे 3-4 सेकंद आधी ही सूचना पॉप अप होते आणि मग फोनची रिंग वाजू लागते.

पुढे वाचा ...

नवी दिल्ली, 1 मार्च : अनेकदा आपल्या मोबाइल फोनवर (Mobile Phone) नको असलेले फोन येतात. त्यामुळे अनेक जण आपल्या फोनमध्ये Truecaller हे अ‍ॅप डाउनलोड करतात. यामुळे कोणाचा फोन येत आहे, याचं नोटिफिकेशन (Notification) आधीच तुमच्या स्क्रीनवर झळकतं. तुमच्‍या फोनमध्‍ये एखाद्या व्‍यक्‍तीचा नंबर सेव्‍ह नसला, तरीही तो कोणाचा आहे हे कळतं. त्यामुळे अनोळखी व्यक्तीकडून येणारे फोन तुम्ही टाळू शकता. त्यामुळे अलीकडे बहुतांश जण Truecaller हे अ‍ॅप वापरत आहेत.

ज्यांच्याकडे Truecaller हे अ‍ॅप आहे, त्यांनी हे बघितलं असेल, की फोन येण्याच्या काही सेकंद आधीच स्क्रीनवर कॉलर आयडी अलर्ट दिसतो. त्यामध्ये 'इनकमिंग कॉल बाय...' असं लिहून कोणाचा फोन येत आहे त्या कॉलरचं नाव असतं. कॉल प्रत्यक्षात कनेक्ट होण्याच्या सुमारे 3-4 सेकंद आधी ही सूचना पॉप अप होते आणि मग फोनची रिंग वाजू लागते. यामुळे अनेकांना आश्चर्य वाटतं, की कोणाचा फोन येणार आहे, हे Truecallerला आधीच कसं कळतं! त्याचं उत्तर आज आपण जाणून घेऊ या. झी न्यूजने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

अनेकदा एखाद्या मोबाइल अ‍ॅप्लिकेशनवर ओटीपी टाकण्याची आवश्यकता असते. अशा वेळी ओटीपी येण्यापूर्वीच तो ओटीपी अ‍ॅप्लिकेशनमध्ये टाकला जातो. ओटीपी कोणता येणार आहे, हे मेसेज येण्यापूर्वीच अ‍ॅप्लिकेशनला कळतं ते सेल्युलर नेटवर्कची फ्रिक्वेन्सी आणि इंटरनेट नेटवर्कची फ्रिक्वेन्सी यांच्यातल्या फरकामुळे. यामागे अन्य कोणतीही टेक्नॉलॉजी वापरण्यात आलेली नाही.

प्रत्येक टेलिकॉम कंपनीचं नेटवर्क (Telecom Network) एका निश्चित अशा फ्रिक्वेन्सीमध्ये काम करते. कॉल करण्यासाठी कंपन्या 450 ते 2700 MHz ची फ्रिक्वेन्सी (Frequency) वापरतात. कोणतीही अ‍ॅप्लिकेशन्स इंटरनेट फ्रिक्वेन्सीवर (Internet Frequency) काम करतात. ती 2 गीगाहर्ट्झ फ्रिक्वेन्सी असते. यावरून इंटरनेटचा वेग कॉलच्या वेगापेक्षा किती तरी पटींनी अधिक असल्याचं स्पष्ट होतं. डेटा किंवा वाय-फाय तर सेल्युलर नेटवर्कपेक्षा अधिक वेगवान आहे. याच कारणामुळे कोणता कॉल येणार आहे हे अ‍ॅप्लिकेशनला आधीच माहीत होतं. मोबाइल फोनवर कॉल प्राप्त होण्यापूर्वीच Truecaller अ‍ॅप्लिकेशन रेडिओ फ्रिक्वेन्सीद्वारे (Radio Frequency) कॉल (Call) कोणाचा आहे हे ओळखतं. त्याच वेळी सेल्युलर नेटवर्कच्या कमी गतीमुळे कॉल थोड्या वेळाने येतो. त्यामुळे कॉल येण्याच्या काही सेकंद आधी कॉलची सूचना स्क्रीनवर दिसते.

हे ही वाचा-Google Map वापरुन करता येईल कमाई; तुम्हाला करावं लागेल हे काम

ही सुविधा अनेक व्यक्तींना फायद्याची ठरत असून, ती पूर्णपणे सुरक्षित असल्याचा कंपनीचा दावा आहे. तुम्ही कॉल करण्यापूर्वी तुमचं नाव ज्याला कॉल केला आहे त्याला कळू नये असं वाटत असेल तर तुम्ही अ‍ॅपच्या सेटिंगमध्ये जाऊन ते डिसेबल करू शकता. याशिवाय तुम्ही तुमच्या फोनमधून अ‍ॅप काढूनदेखील टाकू शकता.

First published:

Tags: Internet, Truecaller