मुंबई, 27 ऑक्टोबर: कार खरेदी करण्याएवढंच कारची देखभाल आणि कारचा योग्य वापर करणं हीदेखील महत्त्वाची गोष्ट आहे. खरंतर गाडी चालवणं आपल्या हातात असतं, पण सगळीकडे सारखेच रस्ते नसल्यामुळं गाडी लवकर खराब होण्याची शक्यता असते. आज आम्ही तुम्हाला काही खबरदारीचे मार्ग सांगणार आहोत. ज्यामुळे तुमच्या गाडीच्या सस्पेन्शनचं होणारं नुकसान लक्षणीयरित्या कमी होऊ शकतं.
खड्डेमय रस्त्यांवरून गाडी चालवताना सावधगिरी बाळगा-
कारच्या सस्पेन्शनसाठी खड्डे अत्यंत हानिकारक असतात. ते शक्य तितके टाळले पाहिजेत किंवा इतर मार्ग माहित असल्यास खड्डे असलेले रस्ते टाळणं हा एक चांगला पर्याय आहे. अशा मार्गावर चालणं केवळ सस्पेन्शनचंच नुकसान करणार नाहीत तर शकत नाही तर ते खंडित देखील करू शकते. त्यामुळे तुमचे अनावश्यक खर्च वाढू शकतात.
मर्यादित सामान ठेवा-
प्रत्येक वाहनाच्या सस्पेंशनमध्ये वजन वाहून नेण्याची ठराविक क्षमता असते. तुमच्या कारमध्ये योग्य प्रमाणात वस्तू ठेवा. जास्त प्रमाणात सामान ठेवणं कारसाठी हानिकारक ठरू शकतो. जर मार्ग बरोबर नसेल तर नुकसान होण्याची शक्यता अधिक असते.
हेही वाचा: सिंगल चार्जमध्ये तब्बल 500 किमी धावेल OLAची पहिली Electric Car, पाहा पहिली झलक
काळजीपूर्वक लावा ब्रेक-
वाहनाच्या ब्रेकिंगच्या बाबतीत बरेच लोक बेफिकीर दिसतात. असे लोक गाडी कुठेही थांबवण्यासाठी वारंवार ब्रेक लावतात. असे केल्यानं कारचा संपूर्ण भार एकाच वेळी सस्पेंशनवर येतो. ज्यामुळे अपघातही होऊ शकतो. त्यामुळे एखाद्या ठिकाणी थांबायचं असेल तर एकदम ब्रेक लावण्याऐवजी काही अंतरावरून हळू हळू ब्रेक वापरणे कधीही चांगलं. यामुळे कारचं कोणत्याही प्रकारचं नुकसान न होता आरामात थांबेल आणि कोणत्याही नुकसानीची परिस्थिती उद्भवणार नाही.
जास्त जड एक्सेसरीज लावू नका-
काही लोक कार खरेदी केल्यानंतर अनेक एक्सेसरीज लावतात. त्यांचं वजन खूप असते. यानंतर प्रवासात राईड आणि सामानाचे वजन यांमुळं एकूणच कारचं वजन क्षमतेपेक्षा जास्त होते. त्यामुळे कारचे सस्पेन्शन खराब होते. असा निष्काळजीपणा टाळावा.