मुंबई, 11 जून : मालवेअर अटॅक्स व फ्रॉडच्या वाढत्या संख्येमुळे इलेक्ट्रिकल उपकरणांची सुरक्षितता ही एक मोठी चिंता बनत आहे. ही समस्या सोडवण्यासाठी व लोकांना त्यांचे स्मार्टफोन सुरक्षित करण्यात मदत करण्यासाठी, दूरसंचार विभागाने (DoT) काही फ्री बॉट रिमूव्हल टूल्स आणली आहेत. याबद्दल मेसेज करून सरकार जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. या संदर्भात ‘इंडिया टुडे’ने वृत्त दिलंय. तुम्हालाही असा मेसेज आला असू शकतो. त्यात “स्टे सायबर सेफ! तुमच्या डिव्हाइसचे बॉटनेट इन्फेक्शन, मालवेअरपासून संरक्षण करण्यासाठी भारत सरकार CERT-In द्वारे, csk.gov.in वर ‘Free Bot Removal Tool’ डाउनलोड करण्याची शिफारस करतं,” असं लिहिलं असेल. बॉटनेट डिटेक्शन म्हणजे काय आणि नागरिक सरकार पुरवत असलेल्या मोफत टूल्सचा वापर कसा करू शकतात, ते जाणून घेऊयात. सायबर स्वच्छता केंद्र पोर्टल काय आहे सरकारच्या घोषणेनुसार, नागरिक सायबर स्वच्छता केंद्र पोर्टलद्वारे मोफत मालवेअर डिटेक्शन टूल्सचा वापर करू शकतात. हे पोर्टल, बॉटनेट क्लीनिंग आणि मालवेअर अॅनॅलिसिस सेंटर म्हणूनही ओळखलं जातं. हे इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर्स (ISPs) आणि अँटिव्हायरस कंपन्यांच्या सहकार्याने इंडियन कम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमच्या (CERT-In) मॅनेजमेंटअंतर्गत कार्यरत आहे. युजर्सना त्यांची सिस्टिम व डिव्हाईस सुरक्षित करण्यासाठी माहिती आणि टूल्स ही वेबसाइट पुरवते. याचा उद्देश भारतातील बॉटनेट इन्फेक्शन ओळखून एक सुरक्षित सायबरस्पेस स्थापित करणं हा आहे. WhatsApp वरच लपवू शकता सर्व प्रायव्हेट फोटोज! कोणालाच माहिती नसेल हा जुगाड बॉटनेट इन्फेक्शन म्हणजे काय? बॉटनेट हे स्मार्टफोन किंवा कम्प्युटरसारख्या डिव्हायसेसचं नेटवर्क आहे, जे ‘बॉट’ नावाच्या मालवेअरमुळे इन्फेक्ट झालं आहे. एकदा एखादं डिव्हाईस यामुळे इन्फेक्ट झालं की मालवेअर हॅकर्सचा या डिव्हायसेसवर कंट्रोल येतो. परिणामी, स्पॅम पाठवणं, आउटगोइंग आणि इनकमिंग टेक्स्ट आणि कॉल्स ब्लॉक करणं, नेट बँकिंग डिटेल्स, युजरनेम व पासवर्ड अशी पर्सनल माहिती मिळवून ते त्याचा गैरवापर करू शकतात. तुमचं डिव्हाइस बॉटद्वारे इन्फेक्ट होऊ शकतं जर तुम्ही - - ईमेलमध्ये इन्फेक्टेड अटॅचमेंट ओपन केल्यास - ईमेल किंवा वेबसाइटवरील मॅलिशिअस लिंकवर क्लिक केल्यास - अविश्वसनीय सोर्सवरून फाइल डाउनलोड केल्यास - असुरक्षित सार्वजनिक वाय-फाय नेटवर्क वापरल्यास मालवेअर आणि बॉटनेट कसं काढायचं? तुमचं डिव्हाइस बॉटनेटने इन्फेक्ट झालंय की नाही हे तपासण्यासाठी किंवा बॉट्स व मालवेअर काढून टाकण्यासाठी खालील गोष्टी करा. - www.csk.gov.in/ या वेबसाईटला भेट द्या - “Security Tools” टॅबवर क्लिक करा - ज्या अँटिव्हायरस कंपनीचे बॉट रिमूव्हल टूल तुम्हाला वापरायचे आहे ती निवडा. - डाऊनलोड बटणवर क्लिक करा. . विंडो युजर्ससाठी - : eScan Antivirus, K7 Security व क्विक हील यापैकी कोणतेही बॉट रिमूव्हल टूल डाउनलोड करा. अँड्रॉइड युजर्ससाठी : गूगल प्लेवर जाऊन ’eScan CERT-IN Bot Removal’ टूल किंवा ‘M-Kavach 2’ डेव्हलप बाय C-DAC Hyderabad सर्च करून डाउनलोड करा. अॅप डाउनलोड झाल्यावर ते ओपन करा. हे अॅप तुमचा फोन स्कॅन करेल व इन्फेक्टेड मालवेअर रिमूव्ह करेल. बॉट रिमूव्हल टूल्सशिवाय CSK पोर्टलही ‘USB Pratirodh’ व ‘AppSamvid’ नावाचे सिक्युरिटी अॅप प्रोव्हाईड करतं. युजर्सना हे अॅप डाउनलोड करावे लागतील. ‘USB प्रतिरोध’ हे एक डेस्कटॉप टूल आहे. जे फोन आणि पेन ड्राइव्हमधील स्टोरेज मीडियाचा वापर रेग्युलेट करण्यासाठी डिझाईन केलंय. जेव्हा नवीन USB डिव्हाईस कनेक्ट केलं जातं, तेव्हा युजर्सना ऑथेंटिकेशनसाठी युजरनेम व पासवर्ड द्यावा लागतो. या व्यतिरिक्त, हे टूल मालवेअरसाठी यूएसबी डिव्हाईस स्कॅन करतं, डेटा एन्क्रिप्ट करतं आणि वाचण्या-लिहण्यात बदल करण्याची परवानगी देतं. Windows युजर्ससाठी ‘AppSamvid’ हे ऑपरेटिंग सिस्टीमवर अप्रूव्हड फाइल्स चालवणारं अॅप्लिकेशन आहे. हे युजर्सना एक्झिक्युटेबल आणि जावा फाइल्सची सूची तयार करू देतं. युजर्स पासवर्डसह अॅप सुरक्षित करू शकतात. AppSamvid व्हायरस, ट्रोजन आणि इतर मालवेअरपासून सिस्टिम सुरक्षित ठेवतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.