मराठी बातम्या /बातम्या /ऑटो अँड टेक /

Fire Boltt Epic Review: उत्तर बॅटरी बॅकअप ते गेमिंपर्यंत; हा Smartwatch एक परफेक्ट कॉम्बो

Fire Boltt Epic Review: उत्तर बॅटरी बॅकअप ते गेमिंपर्यंत; हा Smartwatch एक परफेक्ट कॉम्बो

या वॉचमधला टच रिस्पॉन्स रेट आणि लोडिंग टाइम खूपच चांगला आहे. या वॉचमध्ये युझर्सना 240*280 पिक्सेल रिझॉल्युशन मिळेल.

या वॉचमधला टच रिस्पॉन्स रेट आणि लोडिंग टाइम खूपच चांगला आहे. या वॉचमध्ये युझर्सना 240*280 पिक्सेल रिझॉल्युशन मिळेल.

या वॉचमधला टच रिस्पॉन्स रेट आणि लोडिंग टाइम खूपच चांगला आहे. या वॉचमध्ये युझर्सना 240*280 पिक्सेल रिझॉल्युशन मिळेल.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

नवी दिल्ली, 12 सप्टेंबर : सध्या बाजारात विविध फीचर्स (Features) असलेली स्मार्टवॉचेस (Smartwatch) उपलब्ध आहेत. फिटनेसचा ट्रेंड वाढल्याने साहजिकच स्मार्टवॉच वापरण्याकडे कल जास्त असल्याचं दिसून येतं. सर्वसामान्यपणे, स्मार्टवॉचमध्ये ऑक्सिजन लेव्हल, हार्ट रेट, स्लीपिंग मोड आणि कॉलिंग यांसारखी वेगवेगळी फीचर्स पाहायला मिळतात. बाजारात अगदी दोन हजारांपासून स्मार्टवॉच उपलब्ध आहेत. ग्राहक आपली गरज आणि बजेटनुसार स्मार्टवॉच खरेदी करतात.

बाजारात काही भारतीय कंपन्यांचीही स्मार्टवॉचेस उपलब्ध आहेत. फायर बोल्ट स्मार्टवॉच (Fire Bolt Smartwatch) हे त्यापैकीच एक होय. कंपनीनं ग्राहकांसाठी या स्मार्टवॉचची किंमत केवळ दोन हजार रुपये ठेवली आहे. 'टीव्ही नाइन हिंदी'ने या स्मार्टवॉचचा रिव्ह्यू (Review) केला आहे आणि त्या संदर्भातली काही निरीक्षणं नोंदवली आहेत. त्याबद्दल जाणून घेऊ या.

फायर बोल्ट स्मार्टवॉचचं डिझाइन अत्यंत आकर्षक आणि लेटेस्ट मार्केट ट्रेंडनुसार आहे. फायर बोल्टने हे स्मार्टवॉच आयताकृती स्टाइलमध्ये लॉंच केलं आहे. या वॉचच्या स्क्रीनच्या तळाशी जाड बेझल्स दिसतील; पण या वॉचच्या स्क्रीनचा आकार किमतीला साजेसा आहे. या स्मार्टवॉचच्या उजवीकडे एक बटण देण्यात आलं आहे. या बटणाच्या मदतीनं हे वॉच चालू किंवा बंद करू शकता. स्क्रीन पाहायचा असेल त्या वेळी हे बटण वापरू शकता. मागच्या बाजूला सेन्सर्सव्यतिरिक्त चार्जिंगसाठी मॅग्नेटिक पॉइंटही दिसतील. या वॉचला सिलिकॉन बेल्टसह मेटलचं बक्कल आहे. वॉचची बिल्ट क्वालिटी उत्तम आहे.

Security Tips: डबल सिक्युरिटी! सोशल मीडियासाठी टू स्टेप व्हेरिफिकेशन आहे खूपच महत्वाचं, असं करा सुरु

फायर बोल्ट वॉचमध्ये कंपनीने अनेक प्रकारची हेल्थ फीचर्स (Health Features) दिली आहेत. या वॉचमध्ये हार्ट रेटसोबत (Heart Rate) ब्लड प्रेशर तपासण्याचीही सुविधा आहे. वॉचच्या माध्यमातून एसपीओ2 अर्थात ऑक्सिजन लेव्हलही (Oxygen Level) तपासू शकता. हे वॉच आणि ऑक्सिमीटर यांच्या रिझल्ट्सची तुलना केली असता दोन्ही टूल्सचे रिझल्ट जवळपास सारखे असल्याचं दिसून आलं; मात्र ब्लड प्रेशर, ऑक्सिजन लेव्हल किंवा हार्ट रेट या गोष्टी डॉक्टरांकडून तपासल्याशिवाय पूर्णतः अवलंबून राहू नये. रिव्ह्यूदरम्यान स्टेप काउंट (Step Count) फीचर वापरलं असता 50 पावलं चालल्यानंतर या वॉचने 46 स्टेप दाखवल्या. म्हणजेच हा रिझल्ट जवळपास बरोबर होता.

आपल्याला कंटाळा आला तर आपण गेम्स खेळतो. फायर बोल्ट वॉचमध्ये प्री-इन्स्टॉल गेम्स (Games) देण्यात आले आहेत. या वॉचमध्ये 2048 गेम्स आणि एक थंग बर्ड नावाचा गेम युझर्ससाठी देण्यात आला आहे. या वॉचचा टच सेन्सिटिव्ह रेट (Touch Sensitive Rate) उत्तम आहे. त्यामुळे गेम खेळताना टच रिस्पॉन्स रेटच्या अनुषंगाने अडचणी जाणवल्या नाहीत.

कोणत्याही गॅजेटसाठी बॅटरी हा अत्यंत महत्त्वाचा घटक असतो. गॅजेट उत्तम चालण्यासाठी चांगलं बॅटरी लाइफ गरजेचं असते. या वॉचचा बॅटरी बॅकअप (Battery Backup) चांगला असल्याचं दिसून आलं आहे. रिव्ह्यू करताना सिंगल चार्जवर सुमारे सहा दिवसांचा बॅकअप मिळाला. या वॉचचं बॅटरी लाइफ चांगलं असण्यामागे एक महत्त्वाचं कारण आहे, ते म्हणजे या वॉचमध्ये इन-बिल्ट जीपीएस फीचर नाही. त्यामुळे बॅटरी दीर्घ काळ टिकते. चार्जिंग टाइमचा विचार करता, फायर बोल्ट वॉच फुल चार्ज होण्यासाठी सुमारे 2 तास 15 मिनिटांचा वेळ लागतो. एकूणच बॅटरी लाइफ आणि चार्जिंग स्पीड उत्तम असल्याचं दिसून आलं.

फायर बोल्ट स्मार्टवॉचमध्ये कंपनीने 1.69 इंचाचा फुल टच डिस्प्ले दिला आहे. या वॉचच्या डिस्प्लेवर चांगले कलर्स दिसून आले. 1999 रुपये किमतीचं हे वॉच घरामध्ये वापरताना ब्राइटनेस लेव्हल 50 टक्के सेट केल्यास कोणतीही समस्या जाणवत नसल्याचं लक्षात आलं. आउटडोअर वापरताना ब्राइटनेस लेव्हल 100 टक्के असेल, तर सूर्यप्रकाशात कोणतीही अडचण न येता कंटेंट पाहता येतो.

या वॉचमधला टच रिस्पॉन्स रेट आणि लोडिंग टाइम खूपच चांगला आहे. या वॉचमध्ये युझर्सना 240*280 पिक्सेल रिझॉल्युशन मिळेल.

फायर बोल्ट स्मार्टफोनमध्ये पाच वॉच फेस आहेत. त्याशिवाय भरपूर क्लाउड बेस्ड वॉच फेस सुविधा यात आहे; मात्र त्यासाठी कंपनीचं Da Fit हे अ‍ॅप गुगल स्टोअर किंवा अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअरवरून डाउनलोड करावं लागेल. ब्लूटूथच्या (Bluetooth) मदतीनं हे वॉच स्मार्टफोनला कनेक्ट करू शकता. स्मार्टफोनला कनेक्ट केल्यावर खालच्या बाजूला तुम्हाला वॉच आयकॉन दिसेल. या ऑप्शनवर क्लिक केल्यावर अनेक ऑप्शन्स दिसून येतील. यापैकी वॉच फेसेस हा पहिला ऑप्शन आहे. या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर खालच्या बाजूला मोअर वॉच फेस (Watch Face) या ऑप्शनवर क्लिक करावं लागेल. त्यानंतर अनेक वॉच फेस दिसतील. यातून आवडीचा फेस निवडून सेट करू शकता. क्लाउड बेस्ड वॉच फेस कलेक्शन चांगलं असल्याचं दिसून आलं आहे.

एकूणच, दोन हजार रुपयांचं बजेट असलेल्या ग्राहकांसाठी फायर बोल्टचं हे स्मार्टवॉच अत्यंत चांगला पर्याय ठरू शकतं. यात बॅटरी बॅकअपसह अनेक फिटनेस फीचर्स आहेत; मात्र फिटनेसशी संबंधित गोष्टींसाठी स्मार्टवॉचवर पूर्णपणे अवलंबून न राहता, गरज वाटेल तेव्हा डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे.

First published:

Tags: Game, Health, Health Tips, Smartwatch