मराठी बातम्या /बातम्या /ऑटो अँड टेक /

Car Suspension: कारच्या सस्पेन्शनमधील 'या' बिघाडाकडे करू नका दुर्लक्ष, होऊ शकतो अपघात

Car Suspension: कारच्या सस्पेन्शनमधील 'या' बिघाडाकडे करू नका दुर्लक्ष, होऊ शकतो अपघात

Car Suspension: कारच्या सस्पेन्शनमधील बिघाडाकडे करू नका दुर्लक्ष, होऊ शकतो अपघात

Car Suspension: कारच्या सस्पेन्शनमधील बिघाडाकडे करू नका दुर्लक्ष, होऊ शकतो अपघात

Car Suspension Tips: गाडी चालवताना जर तुम्हाला वाटत असेल की तुमची कार एका बाजूला ओढत आहे, तर याचा अर्थ असा आहे की कारच्या सस्पेन्शनमध्ये दोष आहे. अशा स्थितीत वाहन उलटण्याचा धोका वाढतो.

  मुंबई, 17 ऑगस्ट: तुम्हाला आरामदायी प्रवास करता यावा यासाठी कारमध्ये सस्पेंशन सिस्टीम (Car Suspension) दिलेली असते. वाहनाचा संपूर्ण भार त्याच्या सस्पेन्शन सिस्टमवर अवलंबून असतो ज्यामध्ये शॉक एब्सॉर्बर आणि स्ट्रट्स दिलेले असतात. आपल्यापैकी बरेच जण सस्पेन्शन प्रणालीच्या देखभालीकडे कमी लक्ष देतात आणि नंतर वाईट परिणामांना सामोरं जावं लागतं. इंजिन, ब्रेक्स आणि गिअरबॉक्सच्या देखभालीइतकंच सस्पेन्शन सिस्टिमकडं दिलेलं लक्ष महत्त्वाचं आहे. जर तुमची सस्पेन्शन सिस्टीम योग्य नसेल तर तुम्हाला कारमधून प्रवास करताना अजिबात आराम मिळत नाही आणि कार हाताळणं देखील कठीण होईल. 1. हादरे- वाटेत खड्डे आणि खडबडीत रस्त्यांवरून चालत असताना केबिनपर्यंत जाण्याचे धक्के जाणवत असतील तर समजून घ्या की तुमच्या गाडीचं सस्पेन्शन दुरुस्त करणं आवश्यक आहे. छोट्या-छोट्या खड्ड्यांतून जाताना वाहन उसळत असेल  किंवा धक्के जाणवत असतील तर सस्पेन्शमध्ये नक्कीच मोठा समस्या निर्माण झालेली असू शकते. 2. वळणावर कार एका बाजूला ओढल्यासारखं वाटणं- कार वळवताना तुमच्या कारमध्ये ताण येत आहे असं तुम्हाला वाटत असेल, तर याचा अर्थ तिच्या सस्पेन्शनमध्ये दोष आहे आणि त्याचं कारण असं आहे की, एका बाजूला तुमचं सस्पेन्शन वाहनाचे वजन सहन करू शकत नाही, जे नंतर खूप जोरात जाणवतं. हेही वाचा- Whatsapp Windows Native App: फोन बंद असतानाही करता येणार मेसेज, व्हॉट्सअ‍ॅपचं अप्रतिम फीचर लाँच
   3. बिघडणारी ब्रेकिंग कार्यक्षमता
  कारच्या सस्पेन्शनचा ब्रेकडाउन थेट त्याच्या ब्रेकिंग कार्यक्षमतेवर परिणाम करतो. अशा परिस्थितीत जर तुम्हाला कधी अचानक ब्रेक लावावा लागला तर तुम्ही अपघाताला बळी पडू शकता. ब्रेक लावताच तुमच्या कारची बॉडी थोडी पुढे सरकत असल्याचंही तुम्हाला अनेकदा जाणवेल. या गोष्टीला 'नोज-डायव्हिंग' म्हणतात. नोज डायव्हिंगमुळे, वाहनाची ब्रेकिंग कार्यक्षमता बिघडतं आणि तुमच्या कारची थांबण्याची वेळ देखील 20 टक्क्यांनी कमी होते. अशा परिस्थितीत, सस्पेन्शन दुरुस्त करणं चांगलं आहे. 4. सस्पेन्शन दुरुस्त करताना या गोष्टी लक्षात ठेवा- सस्पेन्शन दुरुस्ती किंवा बदली दरम्यान तुमच्या मेकॅनिकला कारची राइड हाइट तपासण्यास सांगा. मेकॅनिकला फक्त ओरिजनल स्पेयर पार्ट्स वापरण्यास सांगा. सस्पेंशनमध्ये बनावट पार्ट्स वापरल्यास तुम्हाला पुन्हा ते अडचणीत आणतील. त्यामुळं सस्पेन्शनसारखी वस्तू दुरुस्त करताना  पैसे वाचवण्याचा विचार करू नका. जर सस्पेंशनमधील शॉक एब्सॉर्बर किंवा स्ट्रट्सपैकी एक खराब झाला असेल, तर तुम्ही ते दोन्ही एकाच वेळी बदलले पाहिजेत. यामुळे तुमची सस्पेंशन सिस्टीम पूर्वीपेक्षा चांगली कामगिरी करू लागते. एब्सॉर्बरचे काम अतिशय बारकाईनं करावं लागतं आणि प्रत्येकजण त्यामध्ये तज्ञ नसतो त्यामुळे वाहन स्थानिक मेकॅनिककडे नेण्याऐवजी अधिकृत सेवा केंद्रावर नेऊन तिथे सस्पेन्शनची दुरुस्ती करणं महत्त्वाचे आहे.
  Published by:Suraj Sakunde
  First published:

  Tags: Car, Suspension

  पुढील बातम्या