मुंबई, 21 जुलै: व्हॉट्सअॅप (WhatsApp) आपल्या iOS आणि Android दोन्ही प्लॅटफॉर्मवर अनावश्यक लोकांना ब्लॉक करण्याचा पर्याय देते. अशा परिस्थितीत एखादी व्यक्ती तुम्हालाही ब्लॉक करू शकते. परंतु, सध्यातरी व्हॉट्सअॅपवर असं कोणतंही फिचर दिलं जात नाही की, तुम्हाला कोणी ब्लॉक केलं (Someone blocked you on Whatsapp) आहे, हे तुम्हाला समजू शकेल. परंतु ते शोधण्याचे इतर अनेक मार्ग आहेत. याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. 1. लास्ट सीन / ऑनलाइन स्थिती तपासा- जर तुम्हाला कोणाचं ऑनलाइन स्टेटस दिसत नसेल किंवा लास्ट सीन दिसत नसेल तर समोरच्या व्यक्तीनं तुम्हाला ब्लॉक केलं असण्याची शक्यता आहे. 2. प्रोफाइल फोटो तपासा- जर तुमच्या संपर्कांपैकी एखाद्याचे प्रोफाइल पिक्चर अचानक दिसणं बंद झालं असेल, तर समोरच्या व्यक्तीनं तुम्हाला ब्लॉक केलं असण्याची शक्यता आहे. तथापि, त्या व्यक्तीने त्याचा प्रोफाइल फोटो काढून टाकला असण्याची शक्यताही नाकारता येत नाही. हेही वाचा- Fraud Alert: डेबिट-क्रेडिट कार्ड चोरीला गेल्यास त्वरित करा हे काम, अन्यथा बँक खातं होईल रिकामं 3. मॅसेज डिलीवरी स्टेटस चेक करा- तुम्हाला कोणीतरी WhatsApp वर ब्लॉक केल्याचा संशय असल्यास, त्यांना मेसेज पाठवण्याचा प्रयत्न करा. जर तुमचा संदेश पोहोचला नाही तर दोन गोष्टी शक्य आहेत. पहिली म्हणजे समोरच्या व्यक्तीने तुम्हाला ब्लॉक केलं आहे किंवा दुसरं म्हणजे त्याचं इंटरनेट बंद आहे. परंतु, एक-दोन दिवसांनंतरही ते त्याच्यापर्यंत पोहोचले नाहीत, तर दुसऱ्या व्यक्तीने तुम्हाला ब्लॉक केलं असण्याची शक्यता जास्त असते. 4. संबंधित व्यक्तीला कॉल करा- दुसर्या व्यक्तीने तुम्हाला ब्लॉक केलं आहे, असा तुम्हाला संशय असल्यास, त्यांना कॉल करण्याचा प्रयत्न करा. समोरच्या व्यक्तीनं तुम्हाला ब्लॉक केलं असेल तर तुमचा कॉल त्यांच्यापर्यंत पोहोचणार नाही. म्हणजेच रिगिंग स्टेटस तुम्हाला दिसणार नाही. 5. WhatsApp ग्रुप तयार करा- तुम्हाला कोणीतरी ब्लॉक केलं आहे असं वाटत असेल तर व्हाट्सअॅप ग्रुप बनवण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हाला असा संदेश आला की तुम्ही त्या व्यक्तीला जोडण्यासाठी ऑथोराइज्ड नाही, तर त्या व्यक्तीनं तुम्हाला ब्लॉक केलं असण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







