मुंबई, 18 नोव्हेंबर: गाडी चालवताना स्पीड आणि मायलेज या दोन्ही गोष्टी प्रत्येकाच्या मनात असतात. कमी स्पीडमध्ये कार चालवल्यानं चांगलं मायलेज मिळतं, असं बहुतेकांचे मत आहे. पण तसं नाही. कमी स्पीडमध्ये कार चालवल्यानं चांगलं मायलेज मिळेलच असं नाही. गिअरनुसार वेग ठेऊन तो मेंटेन करणं आवश्यक आहे. चांगल्या मायलेजसाठी योग्य गिअरसह योग्य वेगानं कार चालवणं खूप महत्त्वाचं आहे. यासोबतच हाय स्पीडसुद्धा मायलेजसाठीही धोकादायक आहे, हेही लक्षात ठेवायला हवे. कारण अशा परिस्थितीत तुमच्या गाडीतील इंधनाचा वापर जलद होतो आणि त्यामुळं तुमच्या कारचं मायलेजही झपाट्यानं घसरते. बर्याच लोकांना असं वाटतं की, कार कमी स्पीडमध्ये चालवली तर चांगलं मायलेज देते, परंतु तसं नाही. मायलेज आणि स्पीडचे कॉम्बिनेशन नीट समजून घेतलं पाहिजे. याविषयीचा हा खास रिपोर्ट तुमच्यासाठी… योग्य गियर आणि गतीचं कॉम्बिनेशन कसं साधायचं?
- पहिला गियर - 0 ते 20 किमी प्रतितास स्पीड
- दुसरा गियर - 20 ते 30 किमी प्रतितास स्पीड
- 3रा गियर - 30 ते 50 किमी प्रतितास स्पीड
- 4 था गियर - 50 ते 70 किमी प्रतितास स्पीड
- 5 वा गियर - 70 पेक्षा जास्त वेगासाठी
- काही कारमध्ये 6 गीअर्स असतात, या प्रकरणात 6 वा गीअर हायस्पीडसाठी म्हणजेच 100 किमी स्पीडसाठी वापरला जातो.
हेही वाचा: 499 रुपयांत स्कूटर… तुम्हाला आलाय का असा मेसेज किंवा कॉल? काय आहे सत्य स्पीड कमी असेल तर मायलेज कसं कमी होईल? गाडीचा वेग कमी ठेवल्यास चांगलं मायलेज मिळेल, हा भ्रम आहे. जर तुम्ही चौथ्या गियरमध्ये कारचा वेग 20 किंवा 30 किमी प्रतितास ठेवला असेल तर तुमच्या इंजिनवर लोड येईल आणि ते नॉक करेल. तसेच ते अधिक इंधन पंप करण्याचा प्रयत्न करेल. दुसरीकडं जर तुम्ही खालच्या गीअरमध्ये म्हणजे पहिल्या किंवा दुसऱ्या गिअरमध्ये सतत गाडी चालवत असाल, तर हे पॉवरफुल गिअर्स आहेत आणि या काळात इंजिन जास्तीत जास्त पॉवर पुरवते.
या परिस्थितीत इंधनाचा वापर सर्वात जास्त होतो. या गिअर्समध्ये तुम्हाला कमी मायलेज मिळतं.