मराठी बातम्या /बातम्या /ऑटो अँड टेक /आता तुमची कारच सांगेल ड्रायव्हरने मद्यपान केलं की नाही? वाचा काय आहे यंत्रणा

आता तुमची कारच सांगेल ड्रायव्हरने मद्यपान केलं की नाही? वाचा काय आहे यंत्रणा

मद्यपान केलेल्या व्यक्तीला गाडी चालवण्याची संधीच मिळता कामा नये, असं तंत्रज्ञान विकसित करण्याची तरतूद अमेरिकेतल्या या विधेयकात करण्यात आली आहे.

मद्यपान केलेल्या व्यक्तीला गाडी चालवण्याची संधीच मिळता कामा नये, असं तंत्रज्ञान विकसित करण्याची तरतूद अमेरिकेतल्या या विधेयकात करण्यात आली आहे.

मद्यपान केलेल्या व्यक्तीला गाडी चालवण्याची संधीच मिळता कामा नये, असं तंत्रज्ञान विकसित करण्याची तरतूद अमेरिकेतल्या या विधेयकात करण्यात आली आहे.

  नवी दिल्ली, 3 ऑगस्ट : रस्ते अपघात (Road Accidents), तसंच वाहनांशी संबंधित अपघात हे सर्वाधिक मृत्यू होण्यामागे मोठं कारण आहे. भारतासारख्या देशांमध्ये याचं प्रमाण मोठं आहेच, पण अमेरिकेसारखी (USA) महासत्ताही त्याला अपवाद नाही. कोरोना महामारीमुळे गेल्या वर्षी अमेरिकेत वाहनं रस्त्यावर येण्याचं प्रमाण कमी होतं. तरीही रस्ते अपघातांमध्ये तिथे तब्बल 38 हजार 680 जणांचा वर्षभरात मृत्यू झाला. त्याआधीच्या वर्षाच्या तुलनेत हे प्रमाण 7.2 टक्के अधिक आहे. या पार्श्वभूमीवर, अमेरिकी सिनेटमध्ये कार्सच्या सुरक्षितता (Car Safety System) यंत्रणा वाढवण्यावर भर देणारं एक विधेयक प्रस्तावित आहे. त्यावर सिनेटर्सचं मतदान लवकरच होणार आहे. या विधेयकात कारमध्ये सुरक्षिततेसाठी नव्या यंत्रणा बसवण्याची तरतूद असून, ड्रायव्हरने मद्यपान (Inebriated Driver) केलं आहे की नाही, हे ओळखणाऱ्या यंत्रणेचाही त्यात समावेश आहे.

  ड्रिंक अँड ड्राइव्ह (Drink and Drive) अर्थात मद्यपान करून वाहन चालवणं हे अपघातांचं एक मोठं कारण आहे. मद्यपान (Drink n Drive) केल्यानंतरही अनेक जण बिनधास्त ड्रायव्हिंग करतात. पण मद्यपानानंतर नशेत कधी दुर्दैवी घटना घडेल हे सांगता येत नाही. म्हणूनच मद्यपान केलेल्या व्यक्तीला गाडी चालवण्याची संधीच मिळता कामा नये, असं तंत्रज्ञान विकसित करण्याची तरतूद अमेरिकेतल्या या विधेयकात करण्यात आली आहे.

  Electric Vehicle पॉलिसीला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारचा खास प्लॅन

  मद्यपान केलेल्या ड्रायव्हर्सचं लक्ष ड्रायव्हिंगवरून (Driving) सातत्याने विचलित होत असतं. त्यामुळे त्यांच्याकडून वाहन नीट प्रकारे चालवलं जात नाही. चालकाच्या डोळ्यांचं स्कॅनिंग करून संबंधित चालकाने वाहन चालवण्यापूर्वी मद्यपान केलेलं आहे की नाही, याचा शोध लावणारे सेन्सर्स (Sensors) गाडीत बसवले जावेत, असं कंपन्यांना सुचवण्यात आलं आहे.

  मद्यपान केलेल्या ड्रायव्हर्सना पकडण्यासाठी अमेरिकेतील पोलीस याच तंत्रज्ञानाचा वापर करतात. हे सेन्सर्स कारमध्ये बसवणं बंधनकारक करण्यात आलं, तर कार उत्पादक कंपन्यांना ते बसवावेच लागतील. त्या सेन्सर्सच्या साहाय्याने मद्यपान केलेल्या ड्रायव्हर्सबद्दलची माहिती लगेचच उघड होऊ शकेल. त्यामुळे ड्रंक अँड ड्राइव्हच्या घटनांमध्ये घट होऊ शकेल.

  Bike वर मागे बसणाऱ्यांसाठी सरकारचा नवा नियम, असा करावा लागणार टू-व्हिलरवर प्रवास

  याशिवाय, नव्या कार्समध्ये ऑटोमेटिक ब्रेक्स (Automatic Brakes), टक्कर रोखणारी यंत्रणा, तसंच डोअर लॉजिक अलर्ट (Door Logic Alert) अशा सुरक्षाविषयक यंत्रणा बसवणंही बंधनकारक करावं, अशी तरतूदही या विधेयकात आहे.

  त्याशिवाय, कारमध्ये पाठीच्या सीटवर लहान मुलांना ठेवलेलं आहे याचा विसर पडून आई-वडील त्या मुलांना कारमध्ये तसंच ठेवून जाण्याच्या घटना काही वेळा घडल्या आहेत. उन्हाळ्याच्या दिवसांत अशी चुकून कोंडली गेलेली मुलं मृत्युमुखी पडण्यासारख्या दुर्घटनाही घडल्या आहेत. त्यामुळे वाहनांमध्ये डोअर लॉजिक अलर्ट यंत्रणा बसवण्याची तरतूद करण्यात आली असून, या अॅलर्टद्वारे ड्रायव्हरला मागच्या सीटवर लक्ष देण्याची आठवण केली जाते.

  First published:

  Tags: Accident, Car