मराठी बातम्या /बातम्या /ऑटो अँड टेक /

लाँचिंगआधीच सुपरहिट ठरली 'ही' कार, वैशिष्ट्यं वाचून पडाल प्रेमात

लाँचिंगआधीच सुपरहिट ठरली 'ही' कार, वैशिष्ट्यं वाचून पडाल प्रेमात

 ग्रँड व्हिटाराच्या माध्यमातून प्रीमिअम कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्येही कंपनीनं दमदार प्रवेश केला आहे.

ग्रँड व्हिटाराच्या माध्यमातून प्रीमिअम कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्येही कंपनीनं दमदार प्रवेश केला आहे.

ग्रँड व्हिटाराच्या माध्यमातून प्रीमिअम कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्येही कंपनीनं दमदार प्रवेश केला आहे.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 7 ऑक्टोबर :   मारुती सुझुकी कंपनीने त्यांची एसयूव्ही ग्रँड व्हिटारा नुकतीच लाँच केली.  लाँचिंगच्या आधीच ही कार बाजारात सुपरहिट ठरली होती. या कारला लाँचिंगआधीच जबरदस्त मागणी होती. त्यामुळेच गेल्या 60 दिवसांत तिचं बुकिंग 60 हजारांच्या पुढं गेलं आहे. ग्रँड व्हिटाराच्या माध्यमातून प्रीमिअम कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्येही कंपनीनं दमदार प्रवेश केला आहे. कंपनीनं 26 सप्टेंबरपासून या गाडीची डिलिव्हरीही सुरू केलीय. प्रीमिअम फीचर्स आणि सेल्फ चार्जिंग मजबूत हायब्रीड पॉवरटरेनसह असणाऱ्या या ग्रँड व्हिटाराची काही खास वैशिष्ट्य आहेत.

किंमत किती?

कंपनीने ग्रँड व्हिटारा ही गाडी सिग्मा, डेल्टा, झेटा, अल्फा, अल्फा ऑल व्हील ड्राइव्ह असा पाच प्रकारांमध्ये उपलब्ध करुन दिलीय. यामध्ये ही एसयूव्ही माईल्ड हायब्रिड मॅन्युअल, माईल्ड हायब्रिड ऑटोमॅटिक, स्ट्राँग हायब्रिड अशा तीन प्रमुख श्रेणींमध्ये लाँच करण्यात आली आहे. सिग्मा गाडीची एक्स-शोरूम किंमत 10.45 लाख रुपयांपासून सुरू होते. तर, अल्फा ऑल व्हील ड्राइव्हमध्ये माईल्ड हायब्रिड मॅन्युअल मॉडेलची किंमत सुमारे 17 लाख रुपये आहे.

फ्यूएल एफिशिएंट इंजिन

ग्रँड व्हिटारामध्ये 1.5 लीटर माईल्ड हायब्रिड पेट्रोल आणि 1.5 लीटर, 3 सिलेंडर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन इलेक्ट्रिक मोटरशी जोडलेलं आहे. इंजिनच्या मजबूत हायब्रीड पॉवरटरेनमध्ये उच्च पॉवर आउटपूट असून, ते अधिक फ्युएल एफिशिएंट मॉडेल आहे. याशिवाय, यामध्ये समान माईल्ड हायब्रीड पॉवरटरेनचा पर्याय देण्यात आला आहे. तसंच केवळ मॅन्युअल ट्रान्समिशनसह माईल्ड हायब्रीड पॉवरटरेनमध्ये ऑल व्हील ड्राइव्ह सिस्टमसुद्धा देण्यात आली आहे.

5G नेटवर्कच्या पहिल्या फेजमध्ये मिळणार तुफान स्पीड, 6GB फाईल HD मुव्ही डाऊनलोडिंगला लागणार फक्त इतका वेळ!

तज्ज्ञ काय म्हणतात?

मारुती सुझुकी कंपनीच्या या गाडीबाबत तज्ज्ञांचं मत आहे की, ‘यामधील सिग्माची बेसिक प्रकारातील गाडी म्हणून शिफारस करता येईल. परंतु, कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटचा हा सर्वांत परवडणारा एन्ट्री लेव्हल प्रकार आहे. तसंच चांगलं बजेट असणाऱ्या ग्राहकांसाठी ही गाडी उत्तम पर्याय आहे. एक परिपूर्ण एंट्री लेव्हल पर्याय आणि स्वयंचलित मॉडेल म्हणून त्याची शिफारस करता येईल.’ झेटा प्रकारातील गाडीबाबत तज्ज्ञांचं मत आहे की, ‘प्रीमिअम वैशिष्ट्यं आणि मजबूत हायब्रिड पॉवरटरेनसाठी ही गाडी निवडता येईल.’

अल्फा प्रकारातील गाडीबाबत त्यांनी सांगितलं की, ‘सर्व प्रकारची प्रीमिअम वैशिष्ट्यं आणि मजबूत हायब्रिड पॉवरटरेनच्या अनुभवासाठी, तुम्हाला अतिरिक्त पैसे खर्च करावे लागतील. तुम्ही ऑल व्हील ड्राईव्ह टरेनची निवड करू शकता.’

पुढच्या वर्षी वाढणार कारच्या किमती; जाणून घ्या काय आहे कारण

वाहनप्रेमींच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर मारुती सुझुकी ग्रँड व्हिटारा भारतीय बाजारपेठेत लाँच झाली असून, तिच्या खरेदीला चांगला प्रतिसाद मिळतोय.

First published:

Tags: Car, Maruti suzuki cars