जाहिरात
मराठी बातम्या / ऑटो अँड टेक / या गावात आहे Royal Enfield Bullet चे मंदिर, खरी कहाणी वाचाल तर अंगावर येईल काटा!

या गावात आहे Royal Enfield Bullet चे मंदिर, खरी कहाणी वाचाल तर अंगावर येईल काटा!

या गावात आहे Royal Enfield Bullet चे मंदिर, खरी कहाणी वाचाल तर अंगावर येईल काटा!

या मंदिरात रॉयल एनफिल्ड बुलेट 350 (Royal Enfield Bullet 350) ची पूजा केली जाते. देशभरातील अन्य बुलेट प्रेमी आणि इतर भाविक या ठिकाणी येऊन सुरक्षित प्रवासासाठी साकडं घालता.

  • -MIN READ
  • Last Updated :

राजस्थान, 30 जून : देवांची मंदिर तर तुम्ही पाहिलीच असेल, पण कधी एखाद्या बुलेटचे मंदिर असेल असं ऐकलं आहे का? वाचून धक्का बसला आहे ना. पण, राजस्थानमध्ये चक्क बुलेट बाबाचे मंदिर आहे. देवाप्रमाणेच या बुलेटची लोकं पूजा करत असतात. गमंतीची भाग म्हणजे, या ठिकाणी केलेले नवसही पूर्ण होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. या मंदिरात रॉयल एनफिल्ड बुलेट 350 (Royal Enfield Bullet 350) ची पूजा केली जाते. देशभरातील अन्य बुलेट प्रेमी आणि इतर भाविक या ठिकाणी येऊन सुरक्षित प्रवासासाठी पूजा करतात. राजस्थान जिल्ह्यातील जोधपूरपासून 50 किमी दूर अंतरावर स्थितीत ओम बन्ना धाम (बुलेट बाबा मंदिर) म्हणून प्रचलित आहे. फायन्सशियल एक्स्प्रेसमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार,  राजस्थानमधील पाली शहराजवळील चोटिला गावामध्ये ठाकूर जोग सिंह राठोड यांचा मुलगा ओम सिंह राठोड याच्या नावावर हे मंदिर  बनवण्यात आले होते. जवळपास 30 वर्षांपूर्वी ओम सिंह राठोड याचा एका अपघातात मृत्यू झाला होता. VIDEO : मास्क लावायला सांगितलं म्हणून दिव्यांग महिलेला केली मारहाण अपघातानंतर पोलिसांनी मृतदेह आणि बाईक दोन्ही ताब्यात घेतले होते. पण, दुसऱ्या दिवशी बाईक पोलीस स्टेशनमधून गायब झाली. जेव्हा पोलिसांनी बाईकचा शोध घेतला. तेव्हा ती बाईक ज्या ठिकाणी अपघात झाला होता, त्या ठिकाणी उभी होती. त्यानंतर पोलिसांनी पुन्हा ती बाईक पोलीस स्टेशनला घेऊन गेले. पण, दुसऱ्या दिवशी पुन्हा बाईक अपघाताच्या ठिकाणी आढळून आली.  हा प्रकार कित्येक दिवस सुरू होता. त्यामुळे पोलीस घडणाऱ्या या प्रकारामुळे बुचकळ्यात पडले होते. त्यामुळे पोलिसांनी एके दिवशी स्टेशनमध्ये बाईक बांधून ठेवली आणि तिच्यावर नजर ठेवली. पण त्या रात्री जे घडले ते पाहून पोलिसांची चांगलीच भंबेरी उडाली. बाईक आपोआप सुरू झाली आणि पोलीस स्टेशनमधून बाहेर पडली. त्यानंतर ती पुन्हा अपघातग्रस्त ठिकाणी जाऊन पोहोचली. हा सगळा प्रकार पाहून पोलीस हैराण झाले. त्यांनी दुसऱ्या दिवशी राठोड कुटुंबाकडे ही बाईक परत केली. तयार झाले ओम बन्ना धाम राजस्थानमध्ये तरुण मुलांना बन्ना असे म्हटले जाते. ओम राठोडचा ज्या ठिकाणी अपघात झाला तिथे  बाईक जात असल्याचे पाहून ओम राठोडच्या वडिलांनी त्या ठिकाणी ओम बन्ना धाम नावाने मंदिर उभारले. या मंदिराला बुलेट बाबा मंदिर सुद्धा म्हटले जाते. या महामार्गावरून प्रवास करणारे प्रवासी आणि चालक हे या मंदिरात थांबून पुढील प्रवास सुखकर व्हावा अशी प्रार्थना करता आणि मगच पुढे प्रवास करता. संपादन - सचिन साळवे

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात