मुंबई, 02 एप्रिल : अलीकडच्या काळात भारतात इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे. त्यातही इलेक्ट्रिक स्कूटरची मागणी लक्षणीयरित्या वाढली आहे. इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत तुलनेनं जास्त असते. तसेच त्यांच्या रेंजच्या बाबतीत अजूनही लोकांच्या मनात शंका आहेत. त्यामुळंच अजूनही अनेक लोक त्या खरेदी करणं टाळत असले तरीही सर्व कंपन्या आपल्या इलेक्ट्रिक स्कूटरमधील कमतरता देखील पूर्ण करत आहेत.
सध्या तीन इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात धुमाकूळ घालत आहेत. या ई-स्कूटर्सची रेंजही खूप चांगली आहे आणि किंमतही खूप कमी आहे. त्यांचा परफॉर्मन्सदेखील दमदार असल्यामुळं लोकंही त्यांना पसंत करत आहेत. त्या स्कूटर कोणत्या आहेत आणि त्यांची वैशिष्ट्ये कोणती आहेत हेच आज आपण जाणून घेणार आहोत.
सिंपल वन (Simple One): सिंपल वन सध्या सर्वात लोकप्रिय ब्रॅण्डपैकी एक आहे. या स्कूटरच्या रेंजबद्दल मत-मतांतरं असली असली तरी कंपनीच्या दाव्यानुसार ही स्कूटर एका चार्जमध्ये 250 किमीपर्यंत चालू शकते. स्कूटरचं टॉप स्पीड देखील 100 किमी प्रति तासापर्यंत जाते. ही स्कूटर चार रंगांच्या पर्यायांसह तसेच स्टँडर्ड आणि एक्सट्रा या दोन प्रकारांसह ऑफर केली गेली आहे. स्कूटरला 4.8 kWh सह 1.6 kWh बॅटरी बॅकअप मिळतो. या स्कूटरच्या फ्रंट आणि रिअर डिस्क ब्रेकसह येणाऱ्या स्टँडर्ड व्हेरिएंटची किंमत 1.10 लाख रुपये आहे आणि एक्स्ट्रा व्हेरियंटची किंमत 1.44 लाख रुपये आहे.
हेही वाचा: Best 5G Smartphones : 'या' स्मार्टफोनमध्ये 5G सुसाट; झक्कास फीचर्ससह किंमतही खास
Komaki LY Pro: ड्युअल बॅटरीसह येणाऱ्या या स्कूटरची रेंज 180 किमी आहे. तिच्या दोन्ही बॅटरी चार्ज होण्यासाठी सुमारे 5 तास लागतात. स्कूटर 62 किमी. प्रति तास या वेगाने धावू शकते. या स्कूटरला अँटी स्किड टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे. त्यामुळं ती खूप सुरक्षित आहे. यशिवाय 12 इंच ट्यूबलेस टायर देण्यात आले आहेत. स्कूटरमध्ये टीएफटी डिस्प्ले, ऑनबोर्ड नेव्हिगेशन, साउंड सिस्टिम, ब्लूटूथ, कॉलिंग ऑप्शन, थ्री ड्रायव्हिंग मोड यांसारखी फीचर्सही देण्यात आली आहेत. किंमतीबद्दल बोलायचं झालं तर ही स्कूटर 1.37 लाख रुपयांना उपलब्ध आहे.
Okinawa OKHI-90: बॅटरी निर्माता ओकिनावाने इलेक्ट्रिक वाहनांच्या बाजारपेठेत दमदार प्रवेश केला आहे. कंपनीची Okhi 90 स्कूटर लोकप्रिय होत आहे. सिंगल चार्जमध्ये ही स्कूटर 160 किमीची रेंज देते. तिचं टॉप स्पीड 90 किमी प्रतितास आहे. स्कूटरमध्ये एबीएस देण्यात आला आहे. यात 3.6 kWh पॉवर बॅटरी आहे जी पाच तासांत पूर्णपणे चार्ज होते. स्कूटरला बॅटरी व्हॉल्ट इन्फॉर्मेशनसह डिजिटल स्पीडोमीटर मिळते. ही स्कूटर तुम्ही किंमत सुमारे 1.86 लाख रुपयांना खरेदी करू शकता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Electric vehicles