नवी दिल्ली, 10 फेब्रुवारी : देशात एटीएम सेंटरमध्ये जाऊन तेथील एटीएम यंत्र फोडून पैसे चोरून नेण्याच्या घटना वाढत आहेत. मात्र आता अशा घटनांना आळा बसू शकतो. कारण सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बँकांनी एटीएममध्ये काही नवीन फीचर्स आणलीत. ज्यामुळे आता एटीएम चोरीसारख्या घटनांना आळा बसेल, असा दावा करण्यात येतोय. लीड बँक मॅनेजर सुशील कुमार यांनी सांगितलं की, ‘एटीएम यंत्र कापून त्यामधून पैसे चोरून नेण्याच्या घटना पाहता, आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार सर्व एटीएम ई-निगरानी वर असतील.’ ई-सर्व्हेलेन्सच्या माध्यमातून एटीएम सेंटरवर पैसे काढण्यासाठी आलेल्या लोकांच्या संशयास्पद हालचालींवर नजर ठेवली जाऊ शकते. विशेष म्हणजे बँक ऑफ इंडियाकडून नवीन एटीएम बसवण्यात येत आहेत. हे सर्व नवीन फीचर्ससह सुसज्ज आहेत, आणि विशिष्ट धातूपासून बनवली आहेत. जेणेकरून कटरनेही ती यंत्र सहज कापता येणार नाहीत. मुंबईतून सर्व एटीएमवर ठेवलं जाणार लक्ष - सुरक्षेच्या दृष्टीनं सर्व नवीन एटीएम सेंटरमध्ये 5 कॅमेरे बसवण्यात येतील. ज्याची कंट्रोल रुम देशाची आर्थिक राजधानी मुंबईत असेल. यासर्व एटीएमवर कॅमेऱ्यांद्वारे लक्ष ठेवलं जाईल. तसेच हे एटीएम सुरक्षेच्या दृष्टीनं अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बनवण्यात आलंय. जेणेकरून ते कोणालाही हॅक करता येऊ नये. याशिवाय या मशिनमध्ये कार्डचा क्लोनही तयार करता येणार नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या गुन्हेगारी घटनांनाही आळा बसेल. म्हणून आणले एटीएममध्ये खास फीचर्स - देशाच्या विविध भागांमध्ये एटीएममधून पैसे चोरण्याच्या घटना समोर आल्यात. त्यापैकी काही गुन्हेगार अद्याप फरार आहेत, तर काही पकडले गेलेत. याशिवाय अनेक एटीएम निर्जन परिसरात असल्यानं चोरट्यांनी ती सहज लक्ष्य केलीत. तर दुसरीकडे अनेकजण वृद्ध आणि लहान मुल पैसे काढण्यासाठी आल्यानंतर त्यांना टार्गेट करून एटीएम कार्डचा क्लोन तयार करून पैसे काढत असल्याच्या घटनाही वाढल्या आहेत.हे सर्व टाळण्यासाठी एटीएममध्ये खास नवीन फीचर्स तयार करण्यात येत आहेत, जेणेकरून या घटनांना आळा बसेल. हेही वाचा - आता एटीएममधून नोटा नाही तर नाणी येणार! 12 शहरांमध्ये सुरू होणार सेवा दरम्यान, एटीएम कार्डचा वापर हा आता मोठ्या प्रमाणात वाढला आहे. बँकेमध्ये अकाउंट उघडल्यानंतर जवळपास प्रत्येकालाच एटीएम कार्ड दिलं जातं. या कार्डचा वापर करून एटीएम सेंटरवर जाऊन कोणत्याही वेळी पैसे काढता येतात. त्यामुळे आता एटीएम ही सर्वांसाठी आवश्यक गोष्ट झाली आहे. पण दुसरीकडे एटीएम सेंटरवरील मशीन फोडून पैसे चोरण्याच्या प्रकारही वाढत आहेत. अशावेळी सुरक्षेच्या दृष्टीनं नवीन फीचर्सनं सज्ज मशीन बँकांनी आणण्यासाठी हालचाली सुरू केल्यात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.