मुंबई, 23 फेब्रुवारी: महिंद्रा अँड महिंद्राचे चेअरमन आनंद महिंद्रा (Anand Mahindra) सोशल मीडियावर (Social Media) खूपच अॅक्टिव्ह असतात. ते नेहमी व्हायरल व्हिडिओ, मोटिव्हेशन व्हिडिओ शेअर करत असतात. महिंद्रा ट्रॅक्टर्सच्या ट्विटर हँडलवरून (Twitter Handle) एक पोस्ट करण्यात आली. ती पोस्ट पाहून आनंद महिंद्रा स्वतःला रोखू शकले नाहीत. रिट्विट करून त्यांनी महिंद्रा ट्रॅक्टरपासून बनवलेल्या जीपचं कौतुक केलं आहे. हा फोटो सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral) होत असून, नेटिझन्सनाही तो आवडला आहे. याबाबतचं वृत्त 'आज तक'ने दिलं आहे.
आनंद महिंद्रा यांनी एका जीपचा फोटो शेअर केला आहे. ही जीप महिंद्रा ट्रॅक्टरमध्ये (Mahindra Tractor) बदल करून तयार करण्यात आल्याचं दिसत आहे. मेघालयात जोवई (Jowai) इथे राहणार्या माईया रिंबाई (Maia Rymbai) यांनी महिंद्रा ट्रॅक्टरमध्ये बदल करून ही जीप तयार केली आहे. 'टफसुद्धा कूल असू शकतं हे मेघालयच्या Maia Rymbai यांनी सिद्ध केलं आहे. महिंद्रा ग्रुपला 275 एनबीपीची ही मॉडिफाइड पर्सनॅलिटी आवडली आहे,' असं महिंद्रा ट्रॅक्टर्सच्या ट्विटमध्ये लिहिण्यात आलं आहे.
हे ट्विट रिटि्वट करून आनंद महिंद्रा यांनी म्हटलं आहे, 'ही एक विचित्र दिसणारी बीस्ट आहे; पण तो डिस्नी अॅनिमेटेड चित्रपटातल्या एखाद्या गोड पात्रासारखा दिसत आहे.' या फोटोला अनेक युझर्सनी पसंती दर्शवली आहे. तसंच अनेकांनी मजेशीर कमेंट्सदेखील केल्या आहेत. हा ग्रेट खलीचा अधिकृत ट्रक असावा, अशी कमेंट एका युझरने केली आहे.
Now that’s a strange looking beast…But it looks like a loveable character from a Disney animated film! https://t.co/JBR25yeXKD
— anand mahindra (@anandmahindra) February 22, 2022
आनंद महिंद्रा यांनी मॉडिफाइड ट्रॅक्टरव्यतिरिक्त आणखी एक पोस्ट शेअर केली आहे. ती पोस्ट Yezdi गाडीसंदर्भातली आहे. एका व्यक्तीने Yezdi गाडीचा फोटो शेअर करून आपल्या लहानपणीच्या आठवणींना उजाळा दिला. त्याने लिहिले, 'माझ्या वडिलांचं वयाच्या 70 व्या वर्षी गेल्या महिन्यात निधन झालं. जुन्या अल्बममध्ये हा फोटो सापडला. हा फोटो पाहताच लहानपणीचे दिवस आठवले. माझे वडील संपूर्ण कुटुंबाला त्यांच्या बाइकवरून फिरायला घेऊन जायचे.' त्या व्यक्तीची ही पोस्ट शेअर करून आनंद महिंद्रा यांनी म्हटलं आहे, 'आठवणी, भावना आणि आनंद... त्यामुळेच Yezdi सारख्या प्रतिष्ठित ब्रँडला पुनरुज्जीवित करण्यात येत आहे.'
— anand mahindra (@anandmahindra) February 22, 2022
महिंद्रा कंपनीने नुकतंच भारतीय बाजारात Yezdi आणि जावा यांसारख्या जुन्या मोटरसायकल ब्रँड्सना नवा लुक देऊन पुन्हा लॉन्च केलं आहे. महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. जेव्हा ते एखादी पोस्ट शेअर करतात, तेव्हा त्यांच्या पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. त्यांच्या फॉलोअर्सची संख्याही मोठी असून ते आनंद महिंद्रा यांच्या पोस्टची वाट पाहत असतात. तसंच त्यांच्या पोस्टवर मजेशीर पद्धतीने प्रतिक्रियाही नोंदवतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Anand mahindra, Tracter, Tweet