जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / कारच्या क्रॅश टेस्टद्वारे सेफ्टी रेटिंग कसं दिलं जातं? त्याचे फायदे काय? जाणून घ्या सर्व प्रक्रिया

कारच्या क्रॅश टेस्टद्वारे सेफ्टी रेटिंग कसं दिलं जातं? त्याचे फायदे काय? जाणून घ्या सर्व प्रक्रिया

कारच्या क्रॅश टेस्टद्वारे सेफ्टी रेटिंग कसं दिलं जातं? त्याचे फायदे काय? जाणून घ्या सर्व प्रक्रिया

कार खरेदी ( buying a car ) करताना सर्वात महत्वाची ( important ) गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे सेफ्टी ( safety ). बदलत्या काळानुसार सेफ्टी म्हणजेच सुरक्षा हा महत्त्वाचा मुद्दा बनला आहे.

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    मुंबई, 23 फेब्रुवारी-   कार खरेदी ( buying a car ) करताना सर्वात महत्वाची ( important ) गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे सेफ्टी ( safety ). बदलत्या काळानुसार सेफ्टी म्हणजेच सुरक्षा हा महत्त्वाचा मुद्दा बनला आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) च्या आकडेवारीनुसार, देशात दरवर्षी सरासरी एक लाखांहून अधिक लोकांचा रस्ते अपघातात ( accidents) मृत्यू होतो. मात्र, विविध कंपन्यांच्या कारमधील सेफ्टी फीचर अधिक चांगले होत असल्याने रस्ते अपघातात मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या कमी होत आहे. कार खरेदी करणाऱ्यांपैकी बहुतेकजण आता कारच्या क्रॅश टेस्टिंगबाबत माहिती मिळवतात. कोणत्याही कारची ताकद किंवा सेफ्टी क्रॅश टेस्टिंग आणि सेफ्टी रेटिंग याने तपासली जाते. ग्लोबल न्यू कार असेसमेंट प्रोग्रामद्वारे (NCAP) कारला क्रॅश टेस्टिंगमध्ये सेफ्टी रेटिंग दिलं जातं. या टेस्टमध्ये कार प्रवास करण्यासाठी किती सुरक्षित आहे, हे समोर येतं. प्रौढांसाठी आणि मुलांसाठी ही सुरक्षा वेगवेगळी आहे. सेफ्टी रेटिंग म्हणजे काय ?- जवळपास सर्वच कंपन्यांच्या गाड्यांची क्रॅश चाचणी एनसीएपीद्वारे केली जाते. सर्व कंपन्या त्यांच्या कारच्या प्रत्येक मॉडेल आणि व्हेरियंटवर विविध सेफ्टी फीचर्स देतात. यामध्ये एअरबॅग्ज, एबीएस, ईबीडी, सेफ्टी बेल्ट, बॅक सेन्सर, कॅमेरा, स्पीड अलर्ट यांसारख्या फीचर्सचा समावेश आहे. जेव्हा कारची क्रॅश टेस्ट केली जाते, तेव्हा या सेफ्टी फीचर्सच्या आधारावर रेटिंग दिलं जातं. असं दिलं जातं सेफ्टी रेटिंग- सेफ्टी रेटिंगसाठी कारची क्रॅश टेस्ट केली जाते. यासाठी कारमध्ये व्यक्तीऐवजी त्यांचे डमी वापरले जातात. टेस्टच्या वेळी गाडी एका फिक्स स्पीडमध्ये हार्ड ऑब्जेक्टला धडकवली जाते. यावेळी कारमध्ये 4 ते 5 डमी बसवलेले असतात. लहान मुलांचे डमी मागच्या सीटवर असतात. त्यावरून चाइल्ड सेफ्टी ठरवली जाते. या धडकेमध्ये गाडीवर किती परिणाम झाला यावरून त्या गाडीचं सेफ्टी रेटिंग ठरवलं जातं. कार खरेदीसाठी मदत- क्रॅश टेस्टिंगनंतर कारमधील एअरबॅग्ज काम करतात की नाही, डमीचे किती नुकसान झाले, कारची इतर सेफ्टी फीचर्स कितपत योग्य आहेत, या सर्वांच्या आधारे रेटिंग दिले जाते. हे रेटिंग ग्राहकांना सेफ्टी कार खरेदी करण्यास मदत करतं. अर्थात एनसीएपी कोणत्याही कारच्या सर्व व्हेरियंटची क्रॅश टेस्ट करत नाही. कार खरेदी करताना तुम्ही विविध गोष्टींचा विचार करत असाल. पण स्वतःच्या व कुटुंबाच्या सुरक्षेसाठी कारचे सेफ्टी रेटिंग किती आहे, याचीही माहिती घेणं गरजेचं आहे. ही माहिती मिळवणं आता खूप अवघड राहिलेलं नाही, ती सहजासहजी उपलब्ध होते.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: car , technology
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात