नवी दिल्ली, 4 नोव्हेंबर : दिवाळीच्या (Diwali 2021) निमित्ताने सूरतमधील एका कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट म्गणून इलेक्ट्रिक स्कूटर गिफ्ट केली आहे. पेट्रोलच्या वाढत्या किमती पाहता कंपनीने हे पाऊल उचललं आहे. यामुळे पर्यावरणाचं होणारं नुकसानही टाळता येऊ शकतं. ( Diwali gift from company)
कर्मचाऱ्यांनी इलेक्ट्रिक स्कूटर गिफ्ट (Electric Scooter Gift) करणाऱ्या सूरतमधील या प्रसिद्ध कंपनीचं नाव आहे अलायंस ग्रुप (Alliance Group). कंपनीचे डायरेक्टर सुभाष डावर यांनी सांगितलं की, इंधराची वाढत्या किंमती पाहता आम्ही कर्मचाऱ्यांना इलेक्ट्रिक वाहन भेट म्हणून देण्याचा निर्णय घेतला. ग्रुप में एम्ब्राॅयडरी मशीनचा व्यवसाय पाहणारे सुभाष यांचा मुलगा चिरागने सांगितलं की, या दिवाळीत कंपनीने 35 कर्मचाऱ्यांना इलेक्ट्रिक स्कूटर दिली आहे. कंपनीचं म्हणणं आहे की, गेल्या काही दिवसात पेट्रोलच्या किमतीत वाढ होताना दिसत आहे. ही बाब केवळ बातम्यांमध्ये दिसून येत नाबी तर याचा परिणाम कंपन्यांवरही होत आहे. (Alliance Group Company in Gujarat gifted an electric scooter to its employees in diwali)
हे ही वाचा-विद्यार्थ्यांनो, दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर करा करिअरचा शुभारंभ; कसा ते वाचा
त्यामुळे कंपनीने हा निर्णय घेतला आहे. त्यानुसार कंपनीमे पेट्रोल बाईक चालवणाऱ्या कर्मचाऱ्यांना इलेक्ट्रिक स्कूटर्स गिफ्ट केले. यामध्ये इंधनाचा खर्च वाचले, आणि पर्यावरणदेखील सुरक्षित राहिल. गुरुवारी दिवाळीनिमित्ताने आयोजित एका कार्यक्रमात कर्मचाऱ्यांना स्कूटरचे वाटप करण्यात आले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Diwali 2021, Gujrat