Home /News /career /

विद्यार्थ्यांनो, दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर करा तुमच्या करिअरचा शुभारंभ; 'या' स्टेप्स फॉलो करून घडवा तुमचं भविष्य

विद्यार्थ्यांनो, दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर करा तुमच्या करिअरचा शुभारंभ; 'या' स्टेप्स फॉलो करून घडवा तुमचं भविष्य

दिवाळीच्या या शुभमुहूर्तावर तुमच्या करिअरचा शुभारंभ (How to be successful in Career) कसा करावा याबाबत आम्ही तुम्हाला काही टिप्स देणार आहोत.

    मुंबई, 04 ऑक्टोबर: दिवाळी म्हंटली की आपल्या जीवनात सुख, आनंद आणि भरभराट येते. दिवाळीत सुटी असली तरी करिअर घडवू इच्छिणाऱ्या (How to start career) उमेदवारांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी करिअर घडवण्याची उत्तम संधी असते. जशी दिवाळी आपल्या सर्वांसाठीच नव्या अपेक्षांची आणि नव्या भविष्याची माळ घेऊन येते. त्याचप्रमाणे करिअरमध्येही समोर (Tips to create Career) जाणं मह्त्वाचं आहे. करिअर सुरु करण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष देणं आवश्यक आहे. म्हणूनच दिवाळीच्या या शुभमुहूर्तावर तुमच्या करिअरचा शुभारंभ (How to be successful in Career) कसा करावा याबाबत आम्ही तुम्हाला काही टिप्स देणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया. सुरुवातीला आपली आवड ओळखा अनेकदा विद्यार्थी करिअर निवडताना एखाद्या व्यक्तीला डोळ्यासमोर ठेऊन करिअरकडे वाटचाल करतात. मात्र स्वतःला काय आवडतं याबाबत दुर्लक्ष करतात. यामुळे नुकसान होऊ शकतं. आवड नसल्यामुळे त्या करिअरमध्ये शिक्षण आणि नोकरी आपण किती काळ करू शकणार याची खात्री नसते. म्हणूनच करिअर निवडताना तुम्हाला कोणत्या क्षेत्रात अधिक आवड आहे याबाबत विचार करा. कुठल्या क्षेत्रात काम केल्यामुळे तुम्हाला कंटाळा येणार नाही याचा विचार करूनच करिअर निवडा., शिक्षणाबाबत माहिती घ्या एकदा तुम्हाला तुमची आवड नक्की कोणत्या क्षेत्रात आहे हे समजलं की यानंतर तुम्ही त्या क्षेत्राबाबत शिक्षणाच्या संधी आणि इतर माहिती घेऊ शकता. ही माहिती घेणं सर्वात महत्वाचं आहे. कोणत्याही क्षेत्रात करिअर करण्यासाठी त्या क्षेत्रातील शिक्षणाच्या संधींबद्दल माहिती घेणं महत्त्वाचं असतं. यामुळे त्या क्षेत्रातील प्रवेश परीक्षा आणि इतर प्रवेशाबाबत माहिती मिळते. सिनेमांच्या जादुई दुनियेत करिअर करायचंय? मग 'हे' कोर्सेस करून मिळवा एन्ट्री सॅलरी आणि जॉब्सबद्दल माहिती घ्या एकदा शिक्षणाबद्दल माहिती घेतल्यानंतर त्या क्षेत्रातील जॉब्स आणि त्या जॉबमधून मिळणाऱ्या पगाराबाबत माहिती घ्या. यासाठी याबाबतीतल वेबसाईट्स बघत राहा. तुम्हाला आवडणाऱ्या क्षेत्रात नक्की कोणत्या जागा आहेत आणि त्यामध्ये किती पगार मिळतो हे बघा. या सर्व गोष्टी तपासूनच करिअरची निवड करा. भरतीबाबत माहिती घ्या जर तुम्ही तुम्हाला आवडणाऱ्या क्षेत्रात शिक्षण घेतलं असेल त्या क्षेत्रातील नोकरीच्या संधींबाबत माहिती घेत राहा. त्यासंबंधीच्या भरतीकडे लक्ष द्या आणि अर्ज करायला विसरू नका. स्वतःवर विश्वास ठेवा कोणत्याही क्षेत्रात करिअर सुरु करण्यासाठी स्वतःवर विश्वास ठेवणं महत्त्वाचं असतं. करिअर करताना अनेक चढउतार येतात. कधीतरी अपयश येतं. यामुळे आत्मविश्वास कमी होतो. मात्र असं अजिबात होऊ देऊ नका. करिअरमध्ये समोर जाताना स्वतःवर विश्वास ठेवा. तुमचं प्रत्येक स्वप्न पूर्ण होईल हे लक्षत ठेवा.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    पुढील बातम्या