Home /News /aurangabad /

'महाराष्ट्रातील परिस्थिती तालिबानपेक्षा वेगळी नाही'; सदाभाऊ खोतांची सरकारवर जहरी टीका

'महाराष्ट्रातील परिस्थिती तालिबानपेक्षा वेगळी नाही'; सदाभाऊ खोतांची सरकारवर जहरी टीका

तालिबानशी तुलना केलेल्या या विधानामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

सांगली, 19 ऑगस्ट : बैलगाडी शर्यतीच्या मुद्द्यावरून आमदार सदाभाऊ खोत (MLA Sadabhau Khot) यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे. तालिबान (Taliban) सारख्या चौक्या उभ्या करून बैलगाडी शर्यती पोलिस बळावर चिरडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप आमदार खोत यांनी केला आहे. आज सदाभाऊ खोत यांना झरे या ठिकाणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी आयोजित केलेल्या बैलगाडी शर्यतीला जाताना पोलिसांकडून रोखण्यात आलं होतं. मात्र पोलिसांचे नाकेबंदी झुगारून खोत झरे याठिकाणी पोहचले आहे. (The situation in Maharashtra is no different than that of the Taliban Sadabhau Khot criticism of the government) येथे आल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर जहरी टीका केली. आटपाडीच्या झरे या ठिकाणी उद्या 20 ऑगस्ट रोजी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी बैलगाडी शर्यतीचे आयोजन केलं आहे आणि या शर्यतीच्या मुद्द्यावरून जोरदार संघर्ष प्रशासनाने पडळकर यांच्यात निर्माण झाला आहे. प्रशासनाकडून 9 गावाच्या आसपास संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तर दुसरीकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर नाकाबंदी करण्यात आली आहे आणि या नाका बंदीचा फटका कृषी राज्यमंत्री नामदार सदाभाऊ खोत यांनाही बसला. हे ही वाचा-युतीमध्ये असताना श्वास कोंडत होता' देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य पोलीस प्रशासनाकडून त्यांना या ठिकाणी जात असताना रोखून धरण्यात आलेल्या परवानगी नसल्याने त्यांना प्रवेश नाकारण्यात आला होता. मात्र त्यांनी रस्त्यावरच ठिय्या मारण्याची भूमिका घेतल्याने अखेर पोलिसांकडून त्यांना प्रवेश देण्यात आला. त्यानंतर खोत यांनी झरे या ठिकाणी दाखल होत प्रसारमाध्यमांशी बोलताना महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.
Published by:Meenal Gangurde
First published:

Tags: Sadabhau khot, Sangali, Taliban

पुढील बातम्या