भरधाव कारची कमानीला भीषण धडक; एअरबॅग उघडूनही तरुणाचा जागीच मृत्यू

भरधाव कारची कमानीला भीषण धडक; एअरबॅग उघडूनही तरुणाचा जागीच मृत्यू

Car Accident: जिमवरून घरी परत येत असताना अचानक अपघात (Road Accident) झाल्यानं एका बिल्डरच्या मुलाचा जागीच मृत्यू (builder's son death) झाला आहे. विशेष म्हणजे चारचाकी गाडीच्या एअरबॅग (airbag) उघडूनही त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

  • Share this:

औरंगाबाद, 23 जून: जिमवरून घरी परत येत असताना अचानक अपघात (Road Accident) झाल्यानं एका बिल्डरच्या मुलाचा जागीच  मृत्यू (builder's son death) झाला आहे. विशेष म्हणजे चारचाकी गाडीच्या एअरबॅग (airbag) उघडूनही त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अथर्व आशितोष नावंदर असं मृत तरुणाचं नाव असून रस्त्यात आडव्या आलेल्या कोणाला तरी वाचवण्याचा प्रयत्नात हा अपघात झाला असावा, असा प्राथमिक अंदाज लावला जात आहे. या भीषण अपघातात अथर्वच्या मांडीचं हाड मोडलं आहे. तसेच त्याच्या छातीत गंभीर दुखापत झाली आहे. यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.

लॉकडाऊनमुळे महाविद्यालये बंद असल्यानं अथर्व आपल्या घरी परत आला होता. मंगळवारी तो नेहमी प्रमाणे पहाटे जिमला गेला होता. पण अचानक काहीतरी काम आठवल्यानं तो परत घराकडे निघाला होता. दरम्यान रस्त्यात असणाऱ्या एका कमानीला कारची जोरदार धडक (car hit arch) बसल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातात कारचा अक्षरशः चुराडा झाला आहे. अथर्वच्या बाजूनेच कार कमानीला आदळल्यानं एअरबॅग उघडूनही त्याला गंभीर दुखापत झाली.

या अपघाताची माहिती मिळताच गस्तीवरील पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली. यानंतर पोलिसांनी अथर्वला कारमधून बाहेर काढून घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. मात्र याठिकाणी डॉक्टरांनी उपचारापूर्वीच अथर्वला मृत घोषित केलं आहे. औरंगाबाद शहराच्या बन्सीलालनगर परिसरात राहणाऱ्या अथर्वचे वडील बांधकाम व्यावसायिक आहेत. तर अथर्व सध्या मुंबईच्या महाविद्यालयातून डेटा सायन्सची पदवी घेत होता. या दुर्दैवी अपघातात त्याचं निधन झाल्यानं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा-घराजवळच CID निरीक्षकाची दहशतवाद्यांकडून हत्या, गोळीबाराचा LIVE VIDEO समोर

हा अपघात नेमका कसा झाला, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही. पण घटनास्थळापासून 15 फूट अंतरापर्यंत जोरात ब्रेक दाबल्याचे टायरचे व्रण रस्त्यावर उमटले आहेत. रस्त्याच्या मध्ये अचानक कुणीतरी आल्यानं त्याला वाचवण्याचा प्रयत्न अथर्वनं केला असावा. दरम्यान या कारचा वेग किमान 120 ते 130 असल्यानं कार नियंत्रित करता न आल्यानं ही कार कमानीवर जाऊन आदळली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून लावण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Published by: News18 Desk
First published: June 23, 2021, 10:43 AM IST

ताज्या बातम्या