जाहिरात
मराठी बातम्या / देश / श्रीनगरमध्ये CID निरीक्षकावर दहशतवाद्यांकडून हत्या; गोळीबाराचा LIVE VIDEO

श्रीनगरमध्ये CID निरीक्षकावर दहशतवाद्यांकडून हत्या; गोळीबाराचा LIVE VIDEO

श्रीनगरमध्ये CID निरीक्षकावर दहशतवाद्यांकडून हत्या; गोळीबाराचा LIVE VIDEO

दहशतवाद्यांनी मंगळवारी CID निरीक्षकाची ( CID officer) गोळी (Shot)मारून हत्या केली आहे. या घटनेचा व्हिडिओ आता समोर आला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

श्रीनगर, 23 जून: दहशतवाद्यांनी मंगळवारी CID निरीक्षकाची ( CID officer) गोळी (Shot)मारून हत्या केली आहे. श्रीनगरच्या (Srinagar)नौगाम भागात ही धक्कादायक घटना घडली. (Jammu Kashmir Police) नौगाम पोलीस स्टेशनच्या क्षेत्रातील कनिपोरामध्ये दहशतवाद्यांनी निरीक्षक परवेज अहमद डार यांना त्यांच्या घराजवळ 3 गोळ्या मारुन हत्या केली. एक पोलीस अधिकाऱ्यानं या संदर्भातली माहिती दिली आहे. घटनेनंतर त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र त्यांचा यात घटनेत मृत्यू झाला. या गोळीबारानंतर भारतीय सैन्यानं त्या भागात घेराव घातला आहे. या घटनेचा व्हिडिओ आता समोर आला आहे. (CCTV Footage)

जाहिरात

घटना घडली तेव्हा परवेज नमाज करुन घरी परतत होते. यावेळी दोन हल्लेखोरांनी मागून येऊन त्यांच्यावर गोळीबार केला. जम्मू- काश्मीर पोलिसांच्या म्हणण्यानुसार, CCTV फुटेजमध्ये दोन दहशतवादी गोळीबार करताना दिसत आहेत. त्यांचा तपास सुरु आहे. संशयितांची चौकशीही सुरू आहे. या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 10 दिवसांपूर्वीही 2 पोलीस शहीद 10 दिवसांपूर्वी जम्मू- काश्मीरच्या बारामुल्लामध्ये दहशतवाद्यांनी पोलीस आणि CRPF च्या दलावर अंधाधुंद गोळीबार केला होता. यात दोन पोलिसांसह दोन सामान्य नागरिकांचा यात मृत्यू झाला होता. या हल्ल्यामागे लष्कर ए तोयबाच्या दहशतवाद्यांचा हात असल्याचं काश्मीर IG विजय कुमार यांनी सांगितलं होतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात