मराठी बातम्या /बातम्या /aurangabad /

No Vaccine; No Entry, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध अधिक कडक; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

No Vaccine; No Entry, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध अधिक कडक; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

शॉपिंग मॉल, मोठे किराणा मालाचे दुकाने, बहुमजली दुकाने, कापड दुकानांचे मॉल, बहु-उत्पादन विक्री दुकानामध्ये कोरोना लसीकरण प्रमाणपत्र दाखवणे आवश्यक आहे.

शॉपिंग मॉल, मोठे किराणा मालाचे दुकाने, बहुमजली दुकाने, कापड दुकानांचे मॉल, बहु-उत्पादन विक्री दुकानामध्ये कोरोना लसीकरण प्रमाणपत्र दाखवणे आवश्यक आहे.

शॉपिंग मॉल, मोठे किराणा मालाचे दुकाने, बहुमजली दुकाने, कापड दुकानांचे मॉल, बहु-उत्पादन विक्री दुकानामध्ये कोरोना लसीकरण प्रमाणपत्र दाखवणे आवश्यक आहे.

  • Published by:  Meenal Gangurde

औरंगाबाद, 10 नोव्हेंबर : आजपासून औरंगाबाद शहर (Aurangabad city and district) आणि जिल्ह्यात No Vaccine; No Entry हा नियम लागू करण्यात आला आहे. त्यामुळे आता औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यातील कोणत्याही दुकानात खरेदीसाठी जात असाल आणि तुम्ही लस (Corona Vaccine) घेतली नसेल तर तुम्हाला दुकानात प्रवेश दिला जाणार नाही.

औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यातील शॉपिंग मॉल, मोठे किराणा मालाचे दुकाने, बहुमजली दुकाने, कापड दुकानांचे मॉल, बहु-उत्पादन विक्री दुकानामध्ये कोरोना लसीकरण प्रमाणपत्र दाखवणे आवश्यक आहे. जर ग्राहकाकडे लसीकरणाचे प्रमाणपत्र नसेल किंवा लस घेतली नसेल तर त्या व्यक्तीला, ग्राहकाला दुकानात प्रवेश दिला जाणार नाही. औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी याबाबतचे आदेश काढले आहे. यापूर्वी औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यातील पेट्रोल पंप, गॅस, रेशन दुकानात खरेदी करायचे असेल तर कोरोना लसीकरण प्रमाणपत्र आवश्यक केले आहे. (Order of Aurangabad District Collector No Vaccine No Entry restrictions on corona background more strict)

त्यानंतर आता कोणत्याही दुकानात जा, तिथं लसीकरण झाले की नाही याची तपासणी केली जाणार आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व शॉपींग मॉल, मोठी किराणा मालाचे दुकाने, बहुमजली दुकाने, कापड दुकानांचे मॉल, बहु-उत्पादन विक्री दुकाने, इत्यादी तत्सम सर्व दुकाने आस्थापनामध्ये कार्यरत दुकान मालक विक्री अधिकारी, विक्री कर्मचारी, सहायक कामगार वर्ग, कार्यरत सर्व मनुष्यबळ यांच्या कोविड 19 प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दोन मात्रा पूर्ण झाल्याची खातरजमा संबंधित आस्थापनाचे मालक, प्रमुखांनी करावी.

हे ही वाचा-कोरोना परत आला; 24 तासात या देशात सापडले तब्बल 37,120 नवीन रुग्ण!

कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण पूर्ण झाल्याचे अंतिम प्रमाणपत्र संबंधित मालकाने त्यांच्या अधिनस्त मनुष्यबळ व कामगारांकडून प्राप्त करुन घ्यावे. ज्या कार्यरत कामगारांचे, मनुष्यबळाचे लसीकरणासाठी काही अडचण असल्यास नजीकच्या लसीकरण केंद्रात जावे किंवा लसीकरणाचे विषेश सत्र आयोजित करावे, जेणेकरून सर्व दुकान मालक व विक्री कामगार वर्ग यांचे लसीकरण पूर्ण होईल याची खातरजमा करावी.

बाजारात ग्राहकांची वर्दळ असते अशा सर्व ठिकाणी लसीकरणाची किमान एक मात्रा पूर्ण केलीली असणे आवश्यक व लसीकरणाची एकही मात्रा झालेली नसल्यास अशा ग्राहकांना खरेदी करिता प्रवेश देण्यात येऊ नये. तसेच ग्राहकांचे आधारकार्ड, मोबाईल क्रमांकवरुन लसीकरण झाल्याची पडताळणी करण्यात यावी. औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व मॉल्स, सर्व दुकानात येणाऱ्या ग्राहकांना प्रवेशद्वारावरच ग्राहकांची लसीकरण झाल्याबाबत पडताळणी करण्यात येईल आणि किमान एक मात्रा झालेली नसल्यास अशा ग्राहकांना खरेदीच्या ठिकाणी प्रवेश दिला जाणार नाही. याबाबत "No Vaccine No Entry" हा नियम अत्यंत काटेकोरपणे पाळला जाईल याची सर्वांनी नोंद घेऊन पूर्तता करावी. त्यासोबत मास्क वापरणे, 2 गज दुरी, सॅनीटायझरचा वापर, आवश्यकते नुसार फेसशिल्ड वापरणे गरजेचे असल्याचे आदेश देण्यात आलेत.

First published:

Tags: Aurangabad, Corona spread