Home /News /aurangabad /

नवाब मलिकांवर ED ची नजर; वक्फ बोर्ड जमीन घोटाळ्याबाबत 7 जागांवर छापेमारी

नवाब मलिकांवर ED ची नजर; वक्फ बोर्ड जमीन घोटाळ्याबाबत 7 जागांवर छापेमारी

Ed raid in Maharashtra : ईडीच्या पथकाकडून औरंगाबादमध्ये छापेमारी सुरू कऱण्यात आली आहे.

औरंगाबाद, 11 नोव्हेंबर : मुंबईतील क्रूझ ड्रग्ज केस (Mumbai Cruise drug case) प्रकरणावरुन गेल्या काही दिवसांपासून सातत्याने समीर वानखेडे (Sameer Wankhede) आणि भाजपवर (BJP) निशाणा साधणारे नवाब मलिक (Nawab Malik) आता अडचणीत येताना दिसत आहेत. महाराष्ट्रातील कथित घोटाळ्याच्या संदर्भात ईडीकडून औरंगाबादमध्ये कछापेमारी सुरू करण्यात आली आहे. वक्फ बोर्डाच्या जमीन खरेदी-विक्रीच्या संदर्भात ही छापेमारी करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. (ED raids in connection of Waqf Board land scam case) मिळालेल्या माहितीनुसार, वक्फ बोर्डच्या जमीन घोटाळ्याबाबत दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनंतर ही छापेमारी केली जात आहे. पुण्यातील सात ठिकाणी ही छापेमारी करण्यात येत आहे. त्यासोबतच औरंगाबादमध्येही छापेमारी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातील बंडगार्डन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्ट महिन्यात या घोटाळ्याच्या प्रकरणात पकडलेले काहीजण हे वक्फ बोर्डाचे विश्वस्त होते. मात्र, बोर्डाच्या अन्य काही अधिकाऱ्यांनी या मालमत्तांचा वैयक्तिक फायद्यासाठी वापर केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबादमध्ये ईडीच्या पथकाकडून विविध ठिकाणी छापेमारी सुरू आहे. औरंगाबादमधील दोन बड्या उद्योजकांच्या संबंधित ठिकाणी ईडीने छापामारी केली असून त्या ठिकाणी झाडाझडती सुरू आहे. ही प्राथमिक माहिती हाती आली आहे. या संदर्भात अद्याप सविस्तर माहिती मिळू शकलेली नाहीये. मुंबईत क्रूझ ड्रग्ज पार्टीवर ईडीने छापेमारी केली. या कारवाईत ईडीने अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान यालाही अटक केली होती. ईडीने केलेल्या या कारवाईनंतर नवाब मलिक यांनी प्रश्न उपस्थित केले त्यासोबतच अनेक गंभीर आरोपही केले आहेत. गेल्या काही दिवसांपासून नवाब मलिक हे भाजप आणि एनसीबीवर निशाणा साधत आहेत. यामुळे नवाब मलिक हे सातत्याने मीडियात चर्चेत आहेत. त्याच दरम्यान आता ही कारवाई झाली आहे. नवाब मलिकांची मुलगी निलोफर यांच्याकडून देवेंद्र फडणवीसांना नोटीस मुंबईतील क्रूझ ड्रग्ज प्रकरणानंतर राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक हे सातत्याने एनसीबी, समीर वानखेडे आणि भाजपवर निशाणा साधत आहेत. तर भाजपकडूनही नवाब मलिकांना प्रत्युत्तर देत गंभीर आरोप करण्यात येत आहेत. त्याच दरम्यान आता नवाब मलिकांची मुलगी निलोफर हिने राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. नवाब मलिक यांची मुलगी निलोफर (Nawab Malik daughter Nilofer) आणि मलिकांच्या जावयाने देवेंद्र फडणवीस यांना नोटीस पाठवली आहे. बदनामीकारक आणि खोटे आरोप केल्याबद्दल ही कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे. अब्रूनुकसानीचा खटला दाखल करण्याच्या संदर्भात ही नोटीस असल्याची माहिती समोर आली आहे.
First published:

Tags: Aurangabad, ED, Nawab malik

पुढील बातम्या