Home /News /aurangabad /

अल्पवयीन मुलीनं मित्राच्या मदतीनं लांबवलं 16 तोळे सोनं; फिल्मी स्टाईल पाठलाग करून अटक

अल्पवयीन मुलीनं मित्राच्या मदतीनं लांबवलं 16 तोळे सोनं; फिल्मी स्टाईल पाठलाग करून अटक

Crime in Aurangabad: वृद्ध दाम्पत्य घरात झोपलेलं असताना एका अल्पवयीन मुलीनं आपल्या मित्राच्या मदतीने घरातील 16 तोळे सोनं चोरून (Gold Theft) नेलं आहे.

    औरंगाबाद, 13 जून: वृद्ध दाम्पत्य घरात झोपलेलं असताना एका अल्पवयीन मुलीनं आपल्या मित्राच्या मदतीने घरातील 16 तोळे सोनं चोरून (Gold Theft) नेल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी अवघ्या काही तासांतच अल्पवयीन मुलीसह तिच्या मित्राला बेड्या (Minor girl arrest with accused friend) ठोकल्या आहेत. सोनू ऊर्फ बाब्या मोहन भगुरे असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. पोलिसांनी पाठलाग करून या दोघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. दोन्ही आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात असून त्यांची चौकशी केली जात आहे. सबंधित घटना शुक्रवारी भरदुपारी म्हाडा कॉलनीतील सदाशिवनगर परिसरात घडली आहे. याठिकाणी मार्ग प्रकल्प विभागातील सेवानिवृत्त कर्मचारी रमेश तायडे (वय-62) आपली दोन मुलं, सून आणि पत्नीसोबत राहतात. 11 जून रोजी दुपारी मुलं घराबाहेर गेली असता, घरात वृद्ध रमेश आणि त्यांची पत्नीच होती. शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास हे वृद्ध दाम्पत्य घरात झोपलं होतं. झोपण्यापूर्वी त्यांनी स्वयंपाकघराचा दरवाजा पुढे लोटला होता. चार वाजता जेव्हा त्यांच्या पत्नीला जाग आली, तेव्हा कपटातील सोन्याची साखळी, बांगड्या, अंगठी, मंगळसूत्र आणि कर्णफुले असा 16 तोळे सोन्याचा ऐवज असलेली पिशवी चोरीला गेल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस आयुक्त रवींद्र साळोखे यांनी तातडीने तपासाचे आदेश दिले. याप्रकरणी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, एक तरुणी हातात पिशवी घेऊन चिखलठाणच्या दिशेनं गेल्याचं दिसून आलं. यांनतर पोलिसांनी रात्रभर आसपासच्या परिसरात नाकाबंदी केली. अनेक ठिकाणी शोध घेतला पण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेली तरुणी काही सापडली नाही. पण पोलिसांनी तपास जारी ठेवला. हे ही वाचा-महाराष्ट्रातील चौघींना अहमदाबादमध्ये 214 बिअर टीनसह अटक; पोलिसही चक्रावले दरम्यान शनिवारी सकाळी सहाच्या सुमारास आरोपी तरुणी एका रिक्षामधून जात असताना पोलिसांना आढळलं. यानंतर पोलिसांनी रिक्षाचा पाठलाग सुरू केला. पोलीस पाठलाग करत असल्याचं पाहून रिक्षाचालक आरोपी भगुरेनं रिक्षाचा वेग वाढवला. पण पोलिसांनी पाठलाग करून रिक्षा थांबवला. यावेळी आरोपी तरुणीने चोरलेल्या सोन्याची पिशवी रिक्षात ठेवून पळ काढण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी तिचा पाठलाग करून अटक केली आहे. अल्पवयीन मुलीनं आपल्या भगुरेच्या मदतीनं ही चोरी केली होती. आरोपी भगुरे हा सराईत गुन्हेगार असून नशेखोरही आहे. हे ही वाचा-सोलापुरात डान्सबारवर छापा; अर्धनग्न अवस्थेत सुरू होता बीभत्स प्रकार, 29 जण अटकेत त्याचबरोबर आरोपी तरुणीला यापूर्वीही एका चोरीच्या घटनेत अटक करण्यात आलं होतं. पण आरोपी अल्पवयीन असल्यानं तिला समज देऊन सोडून देण्यात आलं होतं. यानंतर तिने हा गंभीर गुन्हा केला आहे. संबंधित आरोपी मुलीची वैद्यकीय तपासणी केली असता, ती सहा महिन्यांची गर्भवती असल्याचं समोर आलं आहे. ही मुलगी मागील काही काळापासून आपल्या कुटुंबीयांपासून वेगळं राहत होती.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Aurangabad, Crime news, Theft

    पुढील बातम्या