मराठी बातम्या /बातम्या /aurangabad /पाऊस-वारा असला तरीही उद्याचा मराठा क्रांती मोर्चा अटळ; 20 ते 30 हजारांचा समावेश, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चिंता वाढली

पाऊस-वारा असला तरीही उद्याचा मराठा क्रांती मोर्चा अटळ; 20 ते 30 हजारांचा समावेश, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चिंता वाढली

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 20 ते 30 हजारांच्या संख्येने मराठा क्रांती मोर्चा निघणार असल्याचं सांगितलं जात आहे, त्यामुळे ठाकरे सरकारची चिंता वाढली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 20 ते 30 हजारांच्या संख्येने मराठा क्रांती मोर्चा निघणार असल्याचं सांगितलं जात आहे, त्यामुळे ठाकरे सरकारची चिंता वाढली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 20 ते 30 हजारांच्या संख्येने मराठा क्रांती मोर्चा निघणार असल्याचं सांगितलं जात आहे, त्यामुळे ठाकरे सरकारची चिंता वाढली आहे.

बीड, 4 जून : उद्या 5 जून रोजी मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) मुद्द्यावरुन मराठा क्रांती संघर्ष मोर्चाचा एल्गार पाहायला मिळणार आहे. शिवसंग्राम व इतर मराठा संघटना, क्रांती मोर्चा या रॅलीत सहभागी होणार आहेत. या मोर्चामध्ये 20 ते 30 हजार लोक सहभागी होतील असा संयोजकांचा अंदाज आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा अधांतरी असल्यामुळे समाजाकडून ठाकरे सरकारवर टीका केली जात आहे. त्यात सध्या कोरोनाची (Coronavirus in Maharashtra) परिस्थिती पाहता मोठ्या संख्येने मोर्चा निघाला तर रुग्णसंख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. (Maratha Kranti Morcha on 5th June in beed)

सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर हा पाहिलाच मोर्चा असल्याने सर्वांचे लक्ष आहे. उद्या सकाळी 10.30 वाजता हा मोर्चा बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल वरून निघणार आहे. बीड जिल्ह्यासह पर जिल्हा मराठा नेते बीडमध्ये आज हजेरी लावत आहेत. बीड जिल्हा प्रशासनाने या मोर्चाला परवानगी दिलेली नाही, यामुळे गोंधळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हे ही वाचा-1 जूननंतर औरंगाबादेत दुकानं उघडणार म्हणजे उघडणारच, खासदार जलील यांचा इशारा

विनायक मेटे पत्रकार परिषदेत म्हणाले..

बीडमधील मराठा क्रांती संघर्ष मोर्चा लढा आरक्षणाचा यासाठी मोठा प्रतिसाद मिळत आहे, म्हणून काही जणांना पोट सूळ उठला आहे. म्हणून बीडचा संबंध नसताना इथे येऊन विरोध करत आहेत. अशा विरोधकांना आम्ही भीक घालत नाही पाऊस.. वारा काहीही असले तरी उद्याचा मोर्चा निघणारच, असा विश्वास मराठा नेते आ. विनायक मेटे यांनी व्यक्त केला. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी मराठा नेते नरेंद्र पाटील यांची उपस्थिती होती.

पुढे बोलताना ते म्हणाले की, मराठा समाजाचं नाव काढलं तरी काँग्रेसच्या पोटात दुखते. त्यांची ही भूमिका पूर्वीची आहे. मराठा समाजाचे नेते कै अण्णासाहेब पाटील यांनी यांची आत्महत्या नसून  काँग्रेस सरकारने केलेली हत्या आहे. मराठा आरक्षणा संदर्भात असे अनेक खून काँग्रेस केले आहेत. मोर्चा संदर्भात अनेक लोक गरळ ओकत आहेत. मात्र त्यांनी त्यांचं काम करावं आम्ही आमच.. हा मोर्चा बोलका आहे, मुका नाही. सरकारचे वाभाडे काढणारा आहे, या सरकारला मराठा समाजाकडे दुर्लक्ष करू देणार नाही. मोर्चाला अडवलं तर आम्ही त्याची जबाबदारी घेऊ. कोरोनाचे नियम पाळून हा मोर्चा कोणत्याही परिस्थिती मध्ये निघेल.

First published:
top videos

    Tags: Beed news, Maratha kranti morcha, Maratha reservation, Protest for maratha reservation