मराठी बातम्या /बातम्या /aurangabad /

विनामास्क फिरणाऱ्याला हटकले; संतापाच्या भरात पोलिसांवरच हल्ला करत घेतला चावा, NSG कमांडो असल्याचा करतोय दावा

विनामास्क फिरणाऱ्याला हटकले; संतापाच्या भरात पोलिसांवरच हल्ला करत घेतला चावा, NSG कमांडो असल्याचा करतोय दावा

औरंगाबादमध्ये नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी विनामास्क फिरणाऱ्याला हटकले. त्यावेळी या इसमाने चक्क पोलिसांवरच हल्ला केला.

औरंगाबादमध्ये नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी विनामास्क फिरणाऱ्याला हटकले. त्यावेळी या इसमाने चक्क पोलिसांवरच हल्ला केला.

औरंगाबादमध्ये नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी विनामास्क फिरणाऱ्याला हटकले. त्यावेळी या इसमाने चक्क पोलिसांवरच हल्ला केला.

  • Published by:  Sunil Desale

सचिन जिरे, प्रतिनिधी

औरंगाबाद, 30 जून: महाराष्ट्रात कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता राज्य सरकारने (Maharashtra Government) कठोर निर्बंध लागू (Strict restrictions) केले आहेत. मात्र, असे असतानाही अनेकजण सर्रास नियमांचे उल्लंघन करताना दिसत आहेत. औरंगाबादमध्ये पोलिसांच्या नाकाबंदी दरम्यान विनामास्क फिरणाऱ्या इसमाला पोलिसांनी रोखले. यावेळी या तरुणाने आपण एनएसजी कमांडो (NSG Commando) असल्याचं सांगत पोलिसांसोबत वाद घातला. इतकेच नाही तर पोलिसांना मारहाण (attack on policemen) केली. तर एका पोलीस कर्मचाऱ्याला चावा सुद्धा घेतला.

औरंगाबादमधील छावणी परिसरातील नगरनाक्यावर नाकाबंदीवेळी विनामास्क फिरणाऱ्या या इसमाची गाडी पोलिसांनी थांबवली. गाडी अडवून दंडाची पावती घेण्याबाबत सूचना करताच त्याने दोन जमादारांना बेदम मारहाण केली. हा प्रकार पाहताच मध्यस्थीसाठी गेलेल्या सहायक पोलीस निरीक्षकांना कमांडोने फायटरने मारहाण करुन डोके फोडले.

ग्रामीण भागात बकरी चोरांची दहशत; बाप-लेकीचे हातपाय बांधून 25 शेळ्या पळवल्या

या हल्ल्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग भागीले, जमादार श्रीधर टाक आणि किशोर घोडेले हे जखमी झाले. या जखमींवर सध्या औरंगाबादमधील घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बुधवारी दुपारच्या सुमारास पंढरपूरहून हर्सुलच्या दिशेने कारमध्ये एमएच-20-एवाय-0011 जात असलेल्या गणेश गोपीनाथ भुमे याला छावणी पोलीस ठाण्यातील जमादार किशोर घोडेले यांनी अडवले. यावेळी भुमे हा विनामास्क आणि दारुच्या नशेत तर्रर असल्याने पोलिसांनी त्याला दंड भरण्यास सांगितले. यावेळी त्याने आपण एनएसजी कमांडो असल्याचं म्हटलं आणि पोलिसांसोबत वाद घातला.

केंद्रीय मंत्र्यांचा बॉडीगार्ड असल्याची बतावणी करत आपल्याला ओळखपत्र का मागता असे म्हणत जमादार घोडेले यांच्या तोंडावर बुक्की मारुन हाताला चावा घेतला. या प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

First published:

Tags: Aurangabad, Crime