औरंगाबाद, 29 सप्टेंबर : गेल्या दोन दिवसांपासून मराठवाड्यासह राज्यातील विविध भागांत मुसळधार पाऊस (Heavy rainfall in Marathwada) पडत आहे. औरंगाबाद (Aurangabad)मध्ये झालेल्या जोरदार पावसाने जटवाडा रोडवरील बंधारा फुटला त्यामुळे रस्त्यावर पाणीच पाणी झाले. आज जटवडा येथील एव्हरेस्ट कॉलेज ऑफ इंजीनियरिंगमध्ये एमएचटी सीईटी 2021 ची परीक्षा (MHT-CET exam) देण्यासाठी या सेंटरवरील सर्व विद्यार्थी पोहोचू शकले नाहीत. त्यामुळे त्यांच्या परीक्षेचा काय हा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे.
केवळ औरंगाबादच नाही तर नांदेड आणि इतर मराठवाड्याच्या भागातूनही विद्यार्थी परीक्षा देण्यासाठी पोचले होते. त्यातील नांदेड येथून आलेल्या एका विद्यार्थ्यांनी आपण कसे अडकलो आणि सेंटरपर्यंत पोहोचू शकलो नाहीत याची कैफियत सांगितली. अनेक ठिकाणी विद्यार्थी परीक्षेसाठी पोहचू शकले नाहीत. विशेष करून ग्रामीण भागातील जवळपास सर्वच नद्यांना पूर आल्याने विद्यार्थी अडकून पडले. परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा संधी देईल अशी शक्यता आहे. हा निर्णय राज्याचे उच्च तंत्रज्ञान विभाग घेणार असल्याचे सूत्रांनी माहिती आहे.
Weather Alert : पुढील 24 तास महत्त्वाचे; मुंबईसह या भागांत मुसळधार पावसाची शक्यता
पावसामुळे नांदेडमध्ये काही विद्यार्थ्यांना एमएचटी-सीईटीची परीक्षा देता आली नाही. लातूर रोड येथील होरीजन स्कूल येथे एमएचटी-सीईटीचे परीक्षा सेंटर होते. दोन सत्रात जवळपास अडीचशे विद्यार्थ्यांची सीईटी परीक्षा घेण्यात येणार होती. बी फार्मसी आणि डी फार्मसीसाठी ही पूर्व परिक्षा होती. मात्र काल पावसामुळे सकाळी 9 ते 12 या वेळेची परीक्षा होऊ शकली नाही. परीक्षा केंद्रावर जाण्याऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे विद्यार्थ्यांना सेंटरमध्ये पोहोचता आलेले नाही.
परीक्षा देण्यासाठी अनेक ठिकाणांहून दूरवरून विद्यार्थी आले होते. सकाळी साडे सात वाजल्यापासून परीक्षा सेंटरच्या अलीकडेच येऊन विद्यार्थी अडकले होते. रस्त्यात मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने वाहनांची व्यवस्था झाली नाही. त्यामुळे काही विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचता आलेच नाही. दरम्यान परीक्षा व्यवस्थापकांनी विद्यार्थ्यांची हजेरी घेऊन त्यांचे मोबाईल क्रमांक घेतले, नंतर या विद्यार्थ्यांची परिक्षा घेतली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
आज सकाळपासूनच मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात पावसाचं धुमशान पाहायला मिळेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. या जिल्ह्यांवर मुसळधार पावसाचे काळे ढग घोंघावत आहेत. त्यामुळे मुंबईकरांनी विशेष काळजी घेण्याचा सल्ला हवामान तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे. पुढील दोन-तीन तासांत मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता आहे.
महाराष्ट्रात मुंबईसह कोकण किनारपट्टी आणि मराठवाडा भागात येत्या 24 तासांत अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने मंगळवारी संध्याकाळी ही माहिती दिली. आयएमडी मुंबईचे वरिष्ठ शास्त्रज्ञ के. एस होसाळीकर म्हणाले की, “गुलाब चक्रीवादळाचा उर्वरित प्रभाव मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकणात कायम राहील आणि काही ठिकाणी अतिवृष्टी होईल. कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या उत्तर भागात बुधवारी अधिक पाऊस पडेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aurangabad, Exam, Rain