Home /News /aurangabad /

Aurangabad शहरात पाणीटंचाई, पालकमंत्री सुभाष देसाई यांचं मोठं पाऊल

Aurangabad शहरात पाणीटंचाई, पालकमंत्री सुभाष देसाई यांचं मोठं पाऊल

औरंगाबाद शहराला पाण्याची टंचाई जाणवत असल्याने जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई (minister subhash desai) यांनी महत्वाचे पाऊल उचलले आहे.

  औरंगाबाद, 14 मे : औरंगाबाद शहरात पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. यामुळे महापालिका, (Aurangabad municipal) महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व इतर विभागांच्या समन्वयाने औरंगाबाद शहराला (Aurangabad town water management) मुबलक व समाधानकारक पाणी पुरविण्यासाठी विविध घटकांवर कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. त्याचाच परिणाम म्हणून येत्या आठवडाभरात शहराला 15 द.ल.लिटर अतिरिक्त पाण्याचा पुरवठा होणार आहे. दरम्यान जिल्ह्यात 50.15 टक्के पाणीसाठा आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील 14 गावांना पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. दरम्यान औरंगाबाद शहराला पाण्याची टंचाई जाणवत असल्याने जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई (minister subhash desai) यांनी महत्वाचे पाऊल उचलले आहे. 

  जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई म्हणाले की, सद्यपरिस्थिती पाहता नागरिकांकडून पाणी पट्टी चार हजार रुपयांवरून समाधानकारक पाणी मिळेपर्यंत दोन हजार रुपये करण्याच्या सूचना महापालिकेला देसाई यांनी दिल्या आहेत.आमखास मैदानाजवळील महापालिकेच्या स्मार्ट सिटी कार्यालयात शहराच्या पाणी पुरवठ्याचा आढावा देसाई यांनी घेतला. 

  हे ही वाचा : बाप-लेकाचा विहिरीत बुडून दुर्देवी मृत्यू; आईच्या प्रसंगावधानाने दुसऱ्या मुलाचा जीव वाचला

  मंत्री देसाई म्हणाले, शहराच्या पाणी पुरवठ्यात सुधारणा करण्यासाठी शासनाच्या विविध यंत्रणेकडून युद्धपातळीवर 42 प्रकारची कामे सुरू आहेत. ज्यामध्ये पाण्याची गळती थांबविणे, पाइप लाइन टाकणे, स्वच्छ पाण्याचा पुरवठा आदी कामांचा समावेश आहे. ही कामे युद्धपातळीवर पूर्ण करून नागरिकांना मुबलक पाणी पुरवठा करण्याचा यंत्रणांचा विश्वास आहे.

  उपलब्ध पाण्याचे समान प्रमाणात समन्यायी पद्धतीने पाणी वाटप व्हावे, यासाठी विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीमध्ये जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त, पोलिस आयुक्त, पाणी पुरवठा विभागाचे सचिव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी आदींचा यामध्ये समावेश आहे.

  हे ही वाचा : Ketaki Chitale: "चोप दिल्याशिवाय शांत बसणार नाही" केतकी चितळेच्या FB पोस्ट नंतर राष्ट्रवादीची आक्रमक भूमिका

  शहराचा पाणी समस्या सोडवणुकीसाठी जिल्हाधिकारी यांनी तत्काळ खासगी विंधन विहिर, बोअरवेल अधिग्रहित कराव्यात. त्याचबरोबर अनधिकृत पद्धतीने पाणी चालू, बंद करणाऱ्या अपप्रवृत्तींवर गुन्हा नोंदविण्याचे काम पोलिस प्रशासनाने करावे, अशा सूचनाही केल्या आहेत. शहराला मुबलक पाणी पुरवठा होण्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांचा दैनंदिन आढावा घेण्यात येत असल्याचेही देसाई यांनी सांगितले.

  सुरूवातीला मनपा आयुक्त पांडेय यांनी मनपा प्रशासनाकडून करण्यात येत असलेल्या सुरळीत व योग्य पाणी पुरवठ्याबाबत, उन्हाळी परिस्थितीत पाण्याची वाढीव मागणी लक्षात घेता करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत मंत्री देसाई यांना सविस्तर माहिती दिली. तसेच पाणी पट्टी चार हजारांवरून दोन हजार रूपये करण्याच्या पालकमंत्री देसाई यांच्या निर्णयाचे स्वागत करत तत्काळ अंमलबजावणी करणार असल्याचेही सांगितले.

  Published by:Sandeep Shirguppe
  First published:

  Tags: Aurangabad, Aurangabad News

  पुढील बातम्या