ऑपरेशन थेटरमध्ये शस्त्रक्रिया करताना डॉक्टरचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू

ऑपरेशन थेटरमध्ये शस्त्रक्रिया करताना डॉक्टरचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू

Aurangabad Doctor Dies: शस्त्रक्रिया करत असताना डॉक्टराला हृदयविकाराचा झटका आलेला तुम्ही कधी ऐकलं आहे का?

  • Share this:

औरंगाबाद, 27 जून: शस्त्रक्रिया करत असताना डॉक्टराला हृदयविकाराचा झटका आलेला तुम्ही कधी ऐकलं आहे का?, मात्र अशीच एक घटना औरंगाबादमध्ये (Aurangabad) घडली आहे. शस्त्रक्रिया करत असताना एका तरुण डॉक्टरला हृदयविकाराचा (Heart Attack) झटका आला आहे. यात तरुण डॉक्टरचा (Aurangabad Doctor Died) मृत्यू झाला आहे. या घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

औरंगाबादमधल्या एका खासगी रुग्णालयात डॉक्टर दिग्विजय शिंदे प्रॅक्टिस करत होते. दुर्बिणद्वारे शस्त्रक्रिया करत असताना त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि त्याच्यात त्यांचा मृत्यू झाला.

मूळचे इटखेडा येथील डॉ. दिग्विजय शिंदे हे एक फिजिशियन इंटेंसिविस्ट होते. औरंगाबादेतील स्टेशन रोडवरील खासगी रुग्णालय जीआय वन हॉस्पिटलमध्ये डॉ. शिंदे एका रुग्णाची छोटी झालेली अन्ननलिका मोठी करण्याची शस्त्रक्रिया करत होते. या शस्त्रक्रियेवेळी त्यांच्यांसोबत इतर डॉक्टर देखील उपस्थित होते.

हेही वाचा- भारतानंतर 'या' देशात डेल्टा प्लस व्हेरिएंटचा उद्रेक, तिसऱ्या लाटेला सुरुवात 

शस्त्रक्रिया पूर्ण झाली. त्यानंतर दुर्बिणीतून पाहत असताना त्यांना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यानंतर उपस्थित डॉक्टरांनी तात्काळ त्यांच्यावर उपचार केले. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी हृदयविकार तज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आलं. मात्र त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनं आरोग्य क्षेत्रातही हळहळ व्यक्त केली जात आहे.

Published by: Pooja Vichare
First published: June 27, 2021, 10:58 AM IST

ताज्या बातम्या