मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

भारतानंतर दक्षिण आफ्रिकेत कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचा धोका, तिसऱ्या लाटेचं थैमान

भारतानंतर दक्षिण आफ्रिकेत कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचा धोका, तिसऱ्या लाटेचं थैमान

Delta Variant South Africa: भारतात कोरोना व्हायरसच्या (Coronavirus Delta Plus Variant)डेल्टा प्लस व्हेरिएंटनं थैमान घातलं आहे.

  • Published by:  Pooja Vichare

जोहानसबर्ग, 27 जून: भारतात कोरोना व्हायरसच्या (Coronavirus Delta Plus Variant)डेल्टा प्लस व्हेरिएंटनं थैमान घातलं आहे. देशात आलेल्या कोरोनाच्या (COVID-19 ) दुसऱ्या लाटेचं मुख्य कारण डेल्टा व्हेरिएंट असल्याचं म्हटलं जात आहे. याच दरम्यान भारत व्यतिरिक्त दक्षिण आफ्रिकेत कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. दक्षिण आफ्रिकेत (South Africa) तिसरी लाट (Third Wave)आल्याचंही म्हटलं जात आहे. दक्षिण आफ्रिकेतील कोरोनाच्या तिसऱ्या लाटेतील बहुतेक रुग्ण डेल्टा व्हेरिएंटची (Delta variant) असल्याचं तज्ज्ञांनी सांगितलं आहे.

आरोग्य मंत्री ममामोलोको कुबायी-न्गुबाने यांनी शनिवारी सांगितलं की, कोरोनाच्या तिसर्‍या लाटातील परिस्थिती दुसर्‍या लाटेपेक्षा गंभीर असू शकते. कोरोनाच्या संसर्गाची तिसरी लाट ही डेल्टा व्हेरिएंटमुळे होऊ शकते.

हेही वाचा- पंतप्रधान मोदींची आजची 'मन की बात' खूप महत्त्वाची, जाणून घ्या कारण

दक्षिण आफ्रिकेत 25 जूनला 18 हजारांहून अधिक नवीन रुग्ण आढळून आले. जानेवारी 2021 नंतर बाधित रूग्णांचा हा आतापर्यंतचा सर्वाधिक आकडा आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण आफ्रिकेत कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचे कारण बीटा व्हेरियंट होतं. कोरोनाचा डेल्टा प्रकार पहिल्यांदा भारतात आढळून आला, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. तसंच या लाटेमुळे तिसऱ्या लाटेचीही शक्यता आहे. कोरोनाचा डेल्टा प्रकार देशातील जवळजवळ एक तृतीयांश लोकांमध्ये निश्चित झाला आहे.

जानेवारी 2022 मध्ये तिसरी लाट?

जानेवारी 2022 मध्ये कोरोनाची तिसरी लाट उद्रेक असे निष्कर्ष सरकारकडून वर्तवले जात आहेत. अधिकृत निवेदनात असे म्हटले आहे की, कोरोनाच्या तिसर्‍या लाटेत दररोज 21 हजारांहून अधिक प्रकरणे नोंदविली जाऊ शकतात.दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरिल रामाफोसा यांनी कोरोना व्हायरसच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी लागू केलेले निर्बंध आणखी कडक करण्याची घोषणा केली आहे.

First published:

Tags: Corona virus in india, Coronavirus, India, South africa