औरंगाबाद, 11 जून : MIM आणि भाजप हे तसे कधीही न जुळणारे विचार आङेत. भाजप आणि MIM संघर्ष पेटला तर तो जातीय समीकरणात जोडून दोघंही मतदारांच्या भावनांना हात घालतात, हा आजपर्यंतचा अनुभवच आहे. पण जर MIM चे खासदार इम्तियाज जलील यांच्या मुलानंच मोदींची वाह-वाह केली तर. आश्चर्य वाटलं ना… पण तसं घडलं आहे… तेही औरंगाबादमध्ये. (वाचा- अजित पवारांच्या ड्रीम प्रोजेक्टला पुण्यात का होतोय विरोध? वाचा सविस्तर ) औरंगाबादचे MIM चे खासदार इम्तियाज जलील यांचा मुलगा बिलाल यानं परिधान केलेला टी शर्ट शहरात चर्चेचा विषय ठरला. आता या टी शर्टमध्ये असं आहे तरी काय. तर टी शर्टमध्ये काहीही नाही, मात्र टी शर्टवर आहे. हो या टी शर्टवर वाह मोदीजी वाह असं लिहिलेलं आहे. त्यामुलं बिलाल यानं परिधान केलेल्या या टीशर्टची सध्या प्रचंड चर्चा आहे. पण बिलाल खरंच मोदींचं कौतुक करतोय की आणखी काही, हे बिलालनंच स्वतः सांगितलंदेखिल आहे. (वाचा- वादळापूर्वीची शांतता! शनिवारच्या दौऱ्यापूर्वी FB पोस्टद्वारे संभाजीराजेंचे संकेत ) सोशल मीडियावर बिलालचे हे टीशर्ट परिधान केलेले फोटो प्रचंड व्हायरल झाले. याबाबत बिलाल म्हणतो, मी कधीही मोदींचा समर्थक होऊ शकत नाही. मोदींच्या विचारांचा आणि कामांचा मी विरोधकच आहे. भारतात लशींचा तुटवडा असताना मोदींनी इतर देशांत मोठ्या प्रमाणात लस निर्यात केली. मग माझ्यासारख्या तरुणांना लस मिळत नाही म्हणून मी ‘वाह मोदीजी वाह’ हा टी शर्ट परिधान केला. उपहासात्मक टीका करणं ही माझी भावना व्यक्त करण्याची पद्धत आहे, असं बिलाल म्हणतो. याबाबत जलील म्हणाले की, बिलाल हा स्वतंत्र विचारसरणीचा आहे. त्याचा राजकारणाशी संबंध नाही तो सध्या शिक्षण घेत आहेय. मात्र त्याला मोदींच्या कार्यपद्धतीवर व्यक्त होण्याचा अधिकार आहे. आजची पिढी सोशल मीडियावर जास्त व्यक्त होते. तसाच बिलाल टी शर्ट च्या माध्यमातून व्यक्त होतोय, त्यात काय वाईट. आता मोदींची ही आणि अशा प्रकारची वाह वाह औरंगाबादच्या राजकारणात आणखी काही वादळ आणणार का? हेही पाहावं लागणार आहे. मात्र या प्रकरणाची बरीच चर्चा झाली हे मात्र नक्की.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







