मराठी बातम्या /बातम्या /aurangabad /Aurangabad: 50 जेसीबींचा ताफा अन् 338 घरे जमीनदोस्त, लेबर कॉलनीतील महिलांनी फोडला हंबरडा

Aurangabad: 50 जेसीबींचा ताफा अन् 338 घरे जमीनदोस्त, लेबर कॉलनीतील महिलांनी फोडला हंबरडा

50 जेसीबींचा ताफा अन् 338 घरे जमीनदोस्त, लेबर कॉलनीतील महिलांनी फोडला हंबरडा

50 जेसीबींचा ताफा अन् 338 घरे जमीनदोस्त, लेबर कॉलनीतील महिलांनी फोडला हंबरडा

Aurangabad Labour colony: औरंगाबादमधील लेबर कॉलनीतील 338 घरे जमीनदोस्त करण्यात आली आहेत. सकाळीच 50 जेसीबींचा ताफा लेबर कॉलनीत दाखल झाला आणि त्यानंतर तोडक कारवाईला सुरुवात झाली.

औरंगाबाद, 11 मे : लेबर कॉलनीत (Labour colony Aurangabad) आज धडक कारवाई करण्यात आली. लेबर कॉलनीतील 338 घरांवर आज बुलडोझर (demolition drive on 338 houses of labour colony) चालवण्यात आला. गेल्या अनेक महिन्यांपासून या घरांवरील तोडक कारवाईला स्थानिक नागरिक विरोध करत होते. पण आज अखेर जेसीबीच्या सहाय्याने या मोडकळीस आलेल्या घरांवर बुलडोझर चालवण्यात आला आहे.

लेबर कॉलनीतील जवळपास 20 एकरच्या जागेवर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने बांधण्यात आली होती. 1953 साली बांधण्यात आलेल्या या घरांमध्ये शासकीय कर्मचारी निवृत्तीनंतरही राहत होती. तर काहींनी ही घरे इतरांना राहण्यास दिली होती. घरांचा ताबा न सोडल्याने जिल्हा प्रशासनाने ही जागा ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला. हे प्रकरण उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात सुद्धा गेले. सर्वोच्च न्यायालयाने ही घरे पाडण्याचे निर्देश दिल्याने जिल्हा प्रशासनाने ही तोडक कारवाई केली.

वाचा : असनी चक्रीवादळाने मार्ग बदलला, महाराष्ट्रावर काय होणार परिणाम, कुठे बरसणार पाऊस?

तोडक कारवाई सुरू होण्याआधी अनेक लोकांनी आता स्वतः त्यांचं घर आवरायला, सामान घेऊन जायला सुरुवात केली. डोळ्यात पाणी आणून लोक घर सोडली. अनेकांचे सर्व आयुष्य इथं गेलं त्यामुळं ही वसाहत सोडताना त्यांना गहिवरून येतंय. बुधवारी सकाळीच या तोडक कारवाईच्या मोहिमेला प्रशासन सुरुवात केली. त्यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली. पहाटे 5 वाजेपासून पासून या वसाहतीत जाणारे सगळे रस्ते बंद ठेवण्यात आली. या परिसरात पोलिसांनी कलम 144 बुधवार सकाळपासून ते रात्रीपर्यंत लावले आहे.

कारवाईसाठी 500 पोलीस आणि 150 अधिकाऱ्यांचा बंदोबस्त ठेवण्यात आला. 30 जेसीबी आणि 200 मजुरांच्याद्वारे ही वसाहत उध्वस्त करण्यात येत आहे. ही घर पाडू नये म्हणून नागरिकांनी अगदी हाय कोर्ट ते सुप्रीम कोर्ट पर्यंत खटला लढला मात्र अखेर या लढाईत प्रशासन विजयी झाले आणि 338 घरातील नागरिक बेघर झाले. यावेळी लेबर कॉलनीत राहणाऱ्या महिलांनी आपले राहते घर तुटताना पाहून अक्षरश: हंबरडा फोडला.

लेबर कॉलनी ही एक शासकीय कर्मचारी वसाहत होती मात्र निवृत्तीनंतरही लोक इथं राहत होते अनेक जणांनी तर घर विकुन टाकल्याची प्रशासनाने माहिती दिलीय, त्यात ही घर सुद्धा खिळखिळी झाली. त्यामुळं ती प्रशासन रिकामी करणार असल्याची भूमिका घेतली होती आता अखेर कोर्टाने फेटाळल्याने 338 लोकांची घर पडण्याचा प्रशासनाचा मोकळा झाला होता.

पुनर्वसन करण्यात येणार

या तोडक कारवाई दरम्यान विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी प्रतिक्रिया देत म्हटलं, लेबर कॉलनीतील खऱ्या गरजूंच्या पुनर्वसनाचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. या नागरिकांची यादी तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

First published:
top videos

    Tags: Aurangabad, Maharashtra News