शेजारणीसोबत झाले भांडण, 14 महिन्याच्या मुलासह मुलीला फेकलं गच्चीवरून, नंतर मारली उडी!

शेजारणीसोबत झाले भांडण, 14 महिन्याच्या मुलासह मुलीला फेकलं गच्चीवरून, नंतर मारली उडी!

शेजारणीला अद्दल घडवण्यासाठी अनिता आतकर (वय 23) यांनी अवघ्या 14 महिन्याच्या सोहमला गच्चीवरून खाली फेकून दिले.

  • Share this:

औरंगाबाद, 03 एप्रिल : शेजारणीसोबत भांडण झाले म्हणून एका विवाहित महिलेनं आपल्या दोन चिमुरड्यांसह इमारतीवरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना औरंगाबाद (Aurangabad) शहरातील बजाजनगरमध्ये (Bajajnagar) घडली आहे. दुर्दैवी या घटनेत 14 महिन्याच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. तर दोघे जण जखमी झाले आहे.

औरंगाबाद (Aurangabad) शहरातील बजाजनगर येथील जिजामाता हौसिंग सोसायटी इथं घडली आहे. शेजारी राहणाऱ्या महिलेसोबत भांडण झाल्यामुळे तिला अद्दल घडवण्यासाठी या महिलेनं हे कृत्य केल्याचे समोर आले आहे.

विकृतानं धारदार शस्त्रानं कापली मांजरीची शेपटी, गुन्हा दाखल

सतीश आतकर (वय 27) हे सोलापूर येथील बारगोणी गावातील रहिवासी आहे. कामाच्या निमित्ताने ते औरंगाबाद शहरात आले होते. वाळूज येथील जिजामाता कॉलनीत भाड्याने खोली घेऊन राहतात.

आज दुपारी लहान मुलांच्या कारणावरून शेजारी राहणाऱ्या महिलेसोबत भांडण झाले होते. त्यामुळे रागाच्या भरात या शेजारणीला अद्दल घडवण्यासाठी अनिता आतकर (वय 23) यांनी अवघ्या 14 महिन्याच्या सोहमला गच्चीवरून खाली फेकून दिले. त्यानंतर लगेच तीन वर्षांच्या प्रतिक्षाला सुद्धा खाली फेकले आणि नंतर स्वत: सुद्धा आत्महत्या करण्याचा उद्देशाने उडी मारली.

कोरोनाने कुटुंब उद्ध्वस्त, 18 दिवसात 5 जणांचा मृत्यू

यात 14 महिन्याच्या सोहमला डोक्याला मार लागला आणि त्याचा मृत्यू झाला. तर अनिता यांना पायाला आणि डोक्याला मार लागला आहे. तर प्रतिक्षाच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. दोघांची प्रकृती गंभीर आहे, त्यांना तातडीने घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असं वृत्त दैनिक दिव्य मराठीने दिले आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पंचनामा केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.

Published by: sachin Salve
First published: May 3, 2021, 6:04 PM IST
Tags: aurangabad

ताज्या बातम्या