Home /News /astrology /

तुमचं शरीर सांगतं तुमच्या स्वभावाबद्दल; जाणून घ्या काय म्हणतं शास्र

तुमचं शरीर सांगतं तुमच्या स्वभावाबद्दल; जाणून घ्या काय म्हणतं शास्र

तळहातांवरील रेषांवरून आपल्या भविष्यात काय चांगलं-वाईट होणार आहे हे जाणून घेण्यासाठी बहुतांश जण उत्सुक असतात.

     मुंबई, 22 जून-   तळहातांवरील रेषांवरून आपल्या भविष्यात काय चांगलं-वाईट होणार आहे हे जाणून घेण्यासाठी बहुतांश जण उत्सुक असतात. शरीराच्या एखाद्या अवयवावर तीळ असेल तर तो कसा शुभ असतो याबद्दलही अनेकदा आपण ऐकलं असेल. पण हात-पाय, कान, भुवया, बोटं यांच्या आकार आणि ठेवणीवरूनही व्यक्तीचं भाग्य व स्वभावाबद्दलचे अनेक पैलू समजू शकतात. ‘आज तक हिंदी’ने या संदर्भात वृत्त दिलं आहे. व्यक्तीच्या शरीराच्या विविध अवयवयांवरून त्यांचे स्वभावगुण ओळखणं सहज शक्य होतं. हिंदू धर्मात या शास्राला सामुद्रिक शास्र म्हटलं जातं. ज्योतिषशास्राप्रमाणेच हे एक वेगळं शास्र आहे. प्रत्येकाच्या शरीराची ठेवण वेगवेगळी आहे. त्याप्रमाणे त्यांच्या स्वभावातही तसा फरक जाणवतो. उदाहरणार्थ हाताच्या बोटांची नखं लांब आणि सुंदर असतील तर ती व्यक्ती भाग्यशाली असते. नखं वाकडी असतील तर त्या व्यक्तीला जीवनात खूप संघर्ष करावा लागतो. नखांवर अर्धचंद्र असेल तर त्या व्यक्तीचं रोगांपासून संरक्षण होतं. जर नखांमध्ये अर्धचंद्र नसेल तर त्या व्यक्तीला दीर्घकाळासाठी आजारांचा सामना करावा लागतो. नखांवरील पांढरी खूण किंवा एखादा बिंदू एखाद्या आजाराची सूचना देतो. बोलण्यावरील नियंत्रणाचा भुवयांशी संबंध एखाद्या व्यक्तीच्या भुवया दाट असतील तर त्या व्यक्तीचा स्वभाव सरळ असतो. दोन्ही भुवया जोडल्या गेल्या असतील तर ती व्यक्ती रागीट स्वभावाची असते. अशी व्यक्ती आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवू शकत नाही. सलग भुवया नसणाऱ्या व्यक्तीला मानसिक त्रास सहन करावा लागतो. भुवया खालच्या बाजूला झुकलेल्या असतील तर व्यक्तीचा ओढा वैराग्याकडे अधिक असतो. अशा व्यक्ती घराचा त्याग करतात. पायांच्या अंगठ्यावरून कळते अधात्मिक रूची पायाचा अंगठा हा त्या व्यक्तीचा समाजातील प्रभाव आणि अध्यात्मिक रूची दर्शवतो. एखाद्या व्यक्तीचा पायाचा अंगठा जर खूप मोठा आणि लांब असेल ती व्यक्ती सरळमार्गी व पुण्यकर्म करणारी असते. अंगठ्याच्या शेजारील बोट लांब असेल तर ती व्यक्ती अधिक प्रभावशाली असते. जर पायाचा अंगठा अधिक छोटा असेल तर या व्यक्तीला सतत पैशांची चिंता सतावत असते आणि ती व्यक्ती इतरांचे नुकसान करण्यासाठी नेहमी कट रचत असते. हाता-पायांवरील केसांमुळे ठरते विश्वसनीयता पुरुषांच्या हात आणि पायांवर केस असणं खूप चांगलं असतं. ज्या पुरूषांच्या हात व पायांवर केस असतात ते विश्वसनीय असतात. परंतु, महिलांच्या बाबतीत उलटं आहे. महिलांच्या हाता-पायावर केस असणं म्हणजे त्यांच्या जीवनात दु:ख येऊ शकतं. ज्या पुरूषांच्या हाता-पायांवर व छातीवर अधिक केस असतात ते सरळमार्गी आणि उत्तम स्वभावाचे असतात. हातांच्या बोटांवरून कळतो व्यक्तीच्या जीवनाचा संघर्ष हातांची बोटे लांब आणि पातळ असतील तर ती व्यक्ती कलासक्त आणि सरळमार्गी असते. या व्यक्तींना अडचणींचा सामना करावा लागत नाही. हातांची बोटं जाड आणि राट असतील तर त्या व्यक्तीला जीवनात अधिक संघर्ष करावा लागतो. या व्यक्तींचं बोलणं रोखठोक असतं. बोटं वाकडी असतील तर व्यक्तीला अधिक धनसंपदा प्राप्त होते. परंतु, आरोग्याच्या बाबतीत त्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. बोटं जर गुळगुळीत असतील तर ती व्यक्ती अधिक स्वार्थी असते. अशी मंडळी सतत पैशांच्या मागे धावत असतात. (हे वाचा:खूपच रोमँटिक असतात या तारखेला जन्मलेले लोक; कुणालाही करू शकतात आकर्षित) कान दर्शवतात दीर्घायू एखाद्या व्यक्तीचे कान लांब असतील तर ती व्यक्ती दीर्घायू असते. लहान कान असणाऱ्या व्यक्तीचं आयुष्य कमी असतं. तसंच अशा व्यक्तींना अपघाताचा धोकाही असतो. कानांवर केस असणारी व्यक्ती शून्यातून सुरूवात करते आणि यश मिळवून स्वत:चं अस्तित्व निर्माण करते. शरीराच्या अवयवांवरून एखाद्या व्यक्तीचे स्वभावगुण जाणून घेण्याच्या या सामुद्रिक शास्त्रावर समाजात अनेकजण विश्वास ठेवतात. शरीरातील अवयवांच्या ठेवणीवरून व्यक्तींच्या आयुष्यात खरंच फरक पडतो किंवा नाही हे ज्या त्या व्यक्तीचा विषय आहे. पण आजही अनेकजण यावर विश्वास ठेवतात, हे नक्की.
    First published:

    Tags: Astrology and horoscope, Lifestyle

    पुढील बातम्या