जाहिरात
मराठी बातम्या / राशीभविष्य / या 3 राशी आहेत शनिदेवांना प्रिय, तरी सुरू आहे साडेसाती... पाहा तुमची रास आहे का यात?

या 3 राशी आहेत शनिदेवांना प्रिय, तरी सुरू आहे साडेसाती... पाहा तुमची रास आहे का यात?

ज्योतिष शास्त्रानुसार 12 राशींचं वेगळं महत्त्व आहे.

ज्योतिष शास्त्रानुसार 12 राशींचं वेगळं महत्त्व आहे.

ज्योतिष शास्त्रानुसार (Astrology) 3 राशींवर नेहमीच शनिदेवांची कृपा (Special Grace of Shani Dev) असते. मात्र, सध्या याच राशीत साडेसाती आणि पनोती सुरू आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

दिल्ली, 19 जून : ज्योतिष शास्त्रानुसार (Astrology) 12 महत्त्वाच्या राशी (Zodiac Sing) आहेत. राशीनुसार त्यांचा स्वामी असतो आणि त्याच्या प्रभावनुसार या राशींचं भाग्य ठरत असतं. पण काही राशींवर शनी ग्रहाचा जास्त प्रभाव असतो शनी देवांची कृपा असेल तर, माणूस यशस्वी होतो.त्यामुळे शनी देवांची कृपा मिळवण्यासाठी अनेक लोक विविध उपाय करत असतात. काही राशींवर शनी देवांची कृपा कायम असते. पण, त्याच 3 राशी सध्या साडेसाती आणि पनोतीच्या छायेखाली आहेत. तुळ रास तुळ राशीचा स्वामी शुक्र आहे. शुक्र आणि शनी यांच्यामध्ये मैत्री आहे. त्यामुळे ज्योतिष शास्त्रानुसार तुळ राशीवर शनी देवाची चांगली कृपा असते. शुक्र आणि शनीच्या कृपेमुळे या राशीच्या लोकांना सगळी सुखं मिळतात. हे लोक अतिशय मेहनती आणि ईमानर असतात. त्यामुळेच आयुष्यामध्ये एक चांगलं स्थान निर्माण करतात. मात्र सध्या या राशीच्या लोकांवर शनीची पनोती सुरू आहे. ( Chanakya Niti: शब्दांचा गोडवा, स्वभावात नम्रता बनवेल तुम्हाला श्रीमंत ) मकर रास मकर राशीचा स्वामी शनी आहे. त्यामुळे या राशीवर शनीकृपा कायम असते. या राशीचे लोक बुद्धिमान आणि समजदार असतात. मेहनतीने सगळं यश मिळवतात. शनीच्या कृपेमुळे आयुष्यात यशस्वी होतात. मात्र, सध्या मकर राशीच्या साडेसातीचा दुसरा टप्पा सुरू आहे. सध्या शनी या राशीमध्ये वक्री विराजमान आहेत. कुंभ रास कुंभ राशीचा स्वानी शनी आहे. या राशीच्या लोकांवर शनी देवाची कृपा असते. हे लोक सरळ स्वभावाचे आणि ईमानदार असतात. प्रत्येक विषयावरचा गंभीरतेने विचार करतात आणि यश मिळवण्यासाठी शक्यतितके प्रयत्न करतात. मेहनतीची साथ कधीच सोडत नाहीत. सध्या कुंभ राशीच्या साडेसातीचा पहिला टप्पा सुरू आहे. (Disclaimer: या लेखामधली तपशील आणि सूचना सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. news18lokmat.com त्याची पुष्टी करत नाही. याला शास्त्रीय आधार नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात