मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /Numerology: तुमचा जन्म 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झालाय? मग असं जाईल 2023 वर्ष

Numerology: तुमचा जन्म 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झालाय? मग असं जाईल 2023 वर्ष

 अंकशास्त्रात जन्मतारखेवरून भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 2023 हे वर्ष #नंबर 8 साठी कसं असेल, जाणून घ्या.

अंकशास्त्रात जन्मतारखेवरून भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 2023 हे वर्ष #नंबर 8 साठी कसं असेल, जाणून घ्या.

अंकशास्त्रात जन्मतारखेवरून भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 2023 हे वर्ष #नंबर 8 साठी कसं असेल, जाणून घ्या.

 • Trending Desk
 • Last Updated :
 • Mumbai, India

  ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात जन्मतारखेवरून भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 2023 हे वर्ष #नंबर 8 साठी कसं असेल, जाणून घ्या.

  #नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

  #नंबर 8 हा शनिचं प्रतिनिधित्व करतो.

  8 जन्मांक असलेल्या व्यक्ती कार्य पूर्ण करण्याची असीम क्षमता आणि उत्साह घेऊन जन्माला येतात. म्हणून त्यांना मोठ्या पातळीचं यश मिळतं. त्यांना त्यांच्या प्रतिभेची आणि त्यांच्या जीवनातील ध्येयाची जाणीव असते. या व्यक्ती कुटुंबाभिमुख असतात कारण त्या भावनिकदृष्ट्या त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या खूप जवळ असतात. व्यवसायात अशक्य गोष्टी शक्य करून दाखवण्याची क्षमता या व्यक्तींमध्ये असते. जर त्यांनी कोणाशीही पार्टनरशीप केली तर ते इतर भागीदारांपेक्षा जास्त योगदान देतात.

  अशा व्यक्ती सहज समोरच्या व्यक्तीचं मन जिंकू शकतात आणि त्यांची विनोदबुद्धी फार चांगली असते. आठ जन्मांकाच्या व्यक्ती उदार असतात. सहसा त्या इतरांच्या वागण्याचं चांगल्याप्रकारे निरीक्षण करतात. 2023 मध्ये आठ जन्मांकाच्या व्यक्तींनी सर्व आर्थिक बाबी आणि इतर निर्णय जानेवारी, एप्रिल, मे, जुलै, ऑगस्ट, ऑक्टोबर आणि डिसेंबर या महिन्यात घेतले पाहिजेत. असं केल्यास त्यांना नशिबाची साथ मिळेल. एकंदरीत, 2023 हे वर्ष या व्यक्तींसाठी खूप भरभराटीचं असेल.

  2023करिता #नंबर 8चं विश्लेषण

  #नंबर 8 - करिअर आणि पैशांच्या अनुषंगाने 2023 साठीचे अंदाज

  2023 या वर्षाची एकूण बेरीज सात होते त्यामुळे हे वर्ष आठ जन्मांकाच्या व्यक्तींसाठी चढ-उतारांनी भरलेलं असेल. जर तुम्ही निर्णय घेताना अंतर्मनाचं ऐकलं आणि त्यावर जन्मजात मतांचा प्रभाव पडू दिला नाही तर तुम्ही निर्णयांमध्ये यशस्वी व्हाल. कोणत्याही प्रकारची भागीदारी करताना सावधगिरी बाळगा आणि इतरांशी बोलण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा. जर तुम्ही नोकरी करत असाल, तर नोकरी बदलणं हा एक वाईट निर्णय ठरू शकतो. त्यामुळे नवीन ऑफर नाकारा. हे वर्ष तुम्हाला अनेक व्यावसायिक संधी देईल. पण, तुम्ही फक्त जानेवारी, ऑगस्ट आणि ऑक्टोबर महिन्यांमध्ये या संधींचा लाभ घ्यावा.

  #नंबर 8 - प्रेम, रिलेशनशीप आणि लग्नाच्या अनुषंगाने 2023 साठीचे अंदाज

  2023 मध्ये, जुन्या प्रेम संबंधांमध्ये कायमस्वरूपी सेटलमेंट होण्याची शक्यता आहे. म्हणून, नवीन प्रेमाचा शोध घेण्याचा विचार मनातून काढून टाकला पाहिजे. कोणत्याही नातेसंबंधाबाबत निष्कर्ष काढण्यापूर्वी तुम्ही सखोल विचार केला पाहिजे आणि त्यानंतरच तुमचा निर्णय घेतला पाहिजे. नातेसंबंध तयार होण्यास वेळ लागतो, हे तुम्हाला माहितीच आहे. म्हणून एखाद्याशी कमिडेट होण्याचा निर्णय घेताना त्या व्यक्तीला पुरेसा वेळ देता येईल याची खात्री करा. तुमच्या जोडीदाराच्या अगदी छोट्या चुकांमुळे तुम्ही नातं तोडू नका.

  विवाहित जोडप्यांना हे दिवस व्यस्तपणाचे आणि कष्टाचे वाटतील. कुटुंबातील इतर सदस्यांची सेवा करण्यात वेळ आणि कष्ट द्यावे लागतील, त्यामुळे क्षुल्लक मुद्द्यांवरूनही वाद निर्माण होतील. 2023 मध्ये, कुटुंबामध्ये आणि सामाजिक वर्तुळामध्ये तुमची प्रतिमा मोठ्या प्रमाणात उंचावेल. इतरांना मदत करण्याच्या तुमच्या स्वभावगुणामुळे तुम्ही इतरांची मनं जिंकाल. तुम्हाला सर्वांचं प्रेम मिळेल.

  तुमच्या कुटुंबियांशी असलेले मतभेद तुम्ही लवकरात लवकर सोडवले पाहिजेत. कारण 2023 हे वर्ष तुमच्या कौटुंबिक जीवनातील सर्वोत्तम वर्ष असेल. लोक तुमच्या पाठीमागे तुमच्याबद्दल वाईट बोलू शकतात. तुम्ही अशा लोकांबद्दल जागरुक राहिलं पाहिजे. तुम्ही विवाद आणि षड्यंत्रामध्ये अडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे समवयस्क आणि अनोळखी लोकांवर डोळे झाकून अवलंबून राहणं थांबवा.

  #नंबर 8 - 2023 या वर्षासाठी उपाय :

  1. प्रत्येक शनिवारी ब्लॅक सीड आणि मोहरीच्या तेलानं शनिदेवाची पूजा करा.

  2. गरजूंना चपला आणि कपडे दान करा.

  3. सभोवतालच्या हिरव्यागार रोपांना पाणी घाला.

  4. घरकामात मदत करणाऱ्या व्यक्तीशी बोलताना आवाजात सौम्यपणा ठेवा.

  5. मांसाहार आणि मद्य टाळा.

  6. प्राण्यांच्या कातडीपासून तयार केलेल्या लेदरच्या वस्तूंचा वापर टाळा.

  शुभ रंग - स्काय ब्लू आणि हिरवा

  शुभ अंक - 5 आणि 6

  शुभ दिशा - पश्चिम आणि उत्तर

  शुभ दिवस - शुक्रवार आणि शनिवार

  First published:

  Tags: Astrology and horoscope