मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

Numerology : तुमचा मदतीचा हात तुमचंही नशीब चमकवेल; आज जन्मतारखेनुसार दान करा या वस्तू

Numerology : तुमचा मदतीचा हात तुमचंही नशीब चमकवेल; आज जन्मतारखेनुसार दान करा या वस्तू

फोटो सौजन्य - Canva

फोटो सौजन्य - Canva

अंकशास्त्रानुसार 8 डिसेंबर 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Delhi, India

ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 8 डिसेंबर 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.

#नंबर 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

आजचा दिवस आव्हानात्मक आहे. तुम्ही गोंधळलेल्या स्थितीत असाल, शिवाय व्यग्रही असाल. राजकीय नेते आणि टीम लीडर्सनी ऑफर नाकारली पाहिजे. कारण ते डील अवघड दिसत आहे. प्रॉपर्टीशी निगडित बाबींना उशीर होईल. आर्थिक लाभ मध्यम असतील; मात्र त्यात वाद नसतील. आज मानसिक स्वास्थ चांगलं राहण्यासाठी उशिरापर्यंत काम करू नका. वैद्यकीय क्षेत्रातल्या व्यक्ती, स्पोर्ट्स कॅप्टन्स, सौर बिझनेस, इंजिनीअर्स आणि सरकारी अधिकाऱ्यांना आज विशेष नवी ऑफर मिळेल. शेती आणि शिक्षण क्षेत्र नफ्यात राहील.

शुभ रंग : Blue & Yellow

शुभ दिवस : शनिवार

शुभ अंक : 9

दान : आश्रमात केळी दान करा.

#नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

लव्ह लाइफमध्ये तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवायला विसरू नका आणि खूप जास्त वाकू नका. तुमचा प्रामाणिकपणा आणि एकनिष्ठता ही विजयाची कारणं आहेत. इतर व्यक्ती तुमच्या निरागसपणाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे शहाणपण जागृत ठेवा. एक्सपोर्ट इम्पोर्ट, डॉक्टर, इंजिनीअर्स, ब्रोकर्स, ट्रॅव्हल एजन्सीज आणि पार्टनरशिप फर्म्स यश साजरं करतील. जोडीदार किंवा सहकाऱ्यांकडून भावनिकदृष्ट्या दुखावले जाल किंवा उदास वाटेल.

शुभ रंग : Blue & Creme

शुभ दिवस : सोमवार

शुभ अंक : 2

दान : गायींना पाणी पाजा.

#नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

आज व्यग्र राहाल. खूप ऊर्जा आणि प्रचंड क्षमतेमुळे तुम्ही करिअरमध्ये उच्च स्थानी राहाल. क्रिएटिव्ह विचार आणि जादुई भाषणामुळे ऑफिसमध्ये बॉसवर आणि घरी कुटुंबीयांवर छाप पाडाल. तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये चांगलं काम करता येतं. त्यामुळे यश लांब नाही. पैसे आणि सामान काळजीपूर्वक हाताळा. क्रिएटिव्ह व्यक्ती आणि पब्लिक फिगर्स यांना प्रसिद्धी मिळेल. क्रीडा प्रशिक्षकांना मोठा विजय आणि आर्थिक स्वरूपात बक्षीस मिळेल. बांधकाम आणि शेती क्षेत्रात गुंतवणुकीसाठी चांगला काळ. सकाळी कपाळावर चंदनाचा टिळा लावून दिवसाची सुरुवात करा.

शुभ रंग : Orange and Blue

शुभ दिवस : गुरुवार

शुभ अंक : 3 आणि 9

दान : गरिबांना सूर्यफुलाचं तेल दान करा.

#नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

आर्थिक व्यवहारांमध्ये सहभागी होऊन जुने प्रोजेक्ट्स पूर्ण करण्याचा आज दिवस आहे. उच्चपदस्थ व्यक्तींची आणखी प्रगती होईल. आर्थिक प्लॅन्सबाबत इतरांशी चर्चा करणं टाळा. इच्छुक विद्यार्थ्यांनी सरकारी नोकरीसाठी जरूर अर्ज करावा. सकारात्मक रिझल्ट्स लागण्याचे संकेत आहेत. हिरव्या पालेभाज्या दान केल्यास नशीब चमकेल. खेळाडू आणि सर्जन्सचं भरपूर कौतुक होईल. तसंच आर्थिक फायदाही संभवतो. कुटुंबीय आणि मित्रांसमवेत वेळ व्यतीत करणं तुम्हाला व्यग्रतेमुळे शक्य नाही. त्यामुळे त्यांच्या तक्रारी शांतपणे ऐकून घ्या. आज दानधर्म करणं गरजेचं आहे.

शुभ रंग : Blue

शुभ दिवस : शुक्रवार

शुभ अंक : 9

दान : भिकाऱ्यांना चपला दान करा.

#नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

नशीब सर्वसाधारण आहे; मात्र काही ठिकाणी तुम्हाला लीडर म्हणून काम करावं लागेल. तुमच्या मनातल्या भावना जोडीदाराला सांगण्यासाठी चांगला दिवस आहे. मशिनरी खरेदी, प्रॉपर्टी विक्री, कागदपत्रांवर सही करणं किंवा सहलीला जाणं या सर्व गोष्टींसाठी उत्तम दिवस. वृत्तनिवेदक, अभिनेते, हस्तकला आर्टिस्ट, इंजिनीअर या व्यक्तींचं भरपूर कौतुक होईल. गुंतणं टाळा. हा शत्रूचा ट्रॅप असू शकतो.

शुभ रंग : Aqua

शुभ दिवस : बुधवार

शुभ अंक : 5

दान : अनाथाश्रमात हिरवी फळं दान करा.

#नंबर 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

आज सोशलायझेशन करा आणि नवे मित्र बनवा. कारण आजचा दिवस हसण्याचा आहे. आज उद्दिष्टपूर्तीसाठी कष्ट केल्यास उत्तम रिझल्ट्स मिळतील. आज स्वप्नपूर्तीसाठी तयार राहा. कारण आज कृतीला वेळेची साथ मिळेल. आज सर्व प्रकारचा आनंद घ्याल. कुटुंबीयांची साथ आणि प्रेम तुम्हाला समृद्धी देईल. जबाबदाऱ्या पूर्ण करण्यात दिवस व्यतीत कराल. रिटेलर्स, शिक्षक, ज्वेलर्स, कॉस्मेटिक्स बिझनेस, डिझायनर, वकील, टेक कर्मचारी, राजकीय नेते आणि अभिनेत्यांना विशेष अप्रैझल आणि स्थैर्य लाभेल.

शुभ रंग : Sky Blue

शुभ दिवस : शुक्रवार

शुभ अंक : 6 आणि 9

दान : गरिबांना पांढरा भात दान करा.

#नंबर 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

संध्याकाळी गुरू किंवा तुळशीच्या झाडासमोर दिवा लावा. माणसांची निवड शहाणपणाने करा आणि तुमची जबाबदारी इतरांकडे देणं टाळा. रिलेशनशिप, कामगिरी आणि पैशांच्या बाबतीत लवकरच भरपूर प्रगती होईल. बिझनेसमध्ये आज नातेवाईक आणि मित्रांपासून सावध राहा. खेळाडूंनी आणखी वाद टाळण्यासाठी स्पर्धकांपासून दूर राहावं. विरुद्धलिंगी व्यक्तीमुळे तुमचं नशीब चमकेल. भगवान शंकर यांची पूजा करून त्यांचा आशीर्वाद घ्या.

शुभ रंग : Green

शुभ दिवस : सोमवार

शुभ अंक : 3

दान : अनाथाश्रमात पिवळ्या डाळी दान करा.

#नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

संत्री खा आणि प्राण्यांची कायम सेवा करा. आज एकापाठोपाठ एक कामं असतील. तुमच्या लीडरशिपचा आनंद घेण्याचा दिवस आहे. कारण तुमच्या अवतीभवती असलेल्या साऱ्या व्यक्ती तुमच्याशी निष्ठावंत आहेत. आरोग्याची काळजी घ्या आणि कुटुंबीयांसमवेत वेळ व्यतीत करा. आज दानधर्म केल्याने जादुई फायदा होईल. हिरवाईच्या सान्निध्यात काही वेळ व्यतीत करा आणि झाडांना पाणी घाला. करिअरसाठीचे तुमचे निर्णय भविष्यासाठी पर्फेक्ट ठरतील. तुमच्या मेंटॉरचं मार्गदर्शन घ्या आणि त्यानुसार वागा.

शुभ रंग : Purple

शुभ दिवस : शुक्रवार

शुभ अंक : 6

दान : गरिबांना छत्री दान करा.

#नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

हीलर्स, वास्तू कन्सल्टंट्स, हॉटेलियर्स, डॉक्टर्स, फार्मासिस्ट्स, सर्जन, राजकीय नेते, खेळाडू यांना पुरस्कार मिळतील. त्यांची दखल घेतली जाईल. आजचा दिवस आनंदाचा, ऊर्जेचा, प्रसिद्धीचा आणि उत्साहाचा आहे. तुमची ऊर्जा एकाच दिशेने तुमच्या उद्दिष्टाकडे केंद्रित केल्यास जास्त फायदा होईल. आर्थिक नियोजन आणि प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन सुरळीतपणे पूर्ण होण्याची शक्यता आहे. परस्पर विश्वासामुळे रिलेशनशिप्स अधिक मजबूत होतील आणि समृद्धी मिळेल.

शुभ रंग : Red

शुभ दिवस : मंगळवार

शुभ अंक : 9

दान : गरिबांना लाल मसूर दान करा.

8 डिसेंबर रोजी जन्मलेले सेलेब्रिटीज : शर्मिला टागोर, धर्मेंद्र, प्रकाशसिंग बादल, अरिंदम चौधरी, गीता गोपीनाथ, बाळाजी बाजीराव

First published:

Tags: Astrology and horoscope, Horoscope, Lifestyle, Numerology