Home /News /astrology /

Numerology : प्रेमात पडला असाल तर आजची संधी सोडू नका; बिनधास्त व्यक्त करा आपल्या भावना

Numerology : प्रेमात पडला असाल तर आजची संधी सोडू नका; बिनधास्त व्यक्त करा आपल्या भावना

Numerology 31 May 2022 : अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं.

ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 31 मे 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या. #नंबर 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आजचा दिवस हा तुमच्या आशा-आकांक्षा पूर्ण करणारा आहे. आज ज्या गोष्टी घडत जातील त्यात तुमचा फायदा असेल. प्रॉपर्टी खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरळीत पार पडतील. खेळामध्ये किंवा इतर गेम्समध्ये जिंकण्याची भरपूर शक्यता आहे. टूल्स, मशीन, फर्निचर, साहित्य, औषध, कपडे, ग्लॅमर आणि ट्रॅव्हल एजन्सी या व्यवसायांतल्या व्यक्तींना भरपूर नफा मिळेल. राजकीय नेते आणि पायलट व्यक्तींना यशस्वी नेतृत्व करण्याची संधी मिळेल. लहान मुलांचं शिक्षक वा प्रशिक्षकांकडून कौतुक होईल. शुभ रंग : Teal शुभ दिवस : रविवार शुभ अंक : 1 दान : कृपया भिकाऱ्यांना गहू दान करा. #नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज घरगुती राजकारणापासून सावध राहा. विशेषतः महिलांनी इतर महिलांपासून सांभाळून राहण्याची गरज आहे. लोक तुमच्या इच्छा-आकांक्षा दाबण्याचा प्रयत्न करतील. कायदेशीर वायदे पूर्ण कराल; मात्र त्यामुळे तुमची प्रतिमा डागाळेल. एखादी व्यक्ती तुमचा स्वाभिमान दुखावू शकते, तेव्हा सांभाळून राहा. महिलांनी आपल्या जोडीदाराच्या सावध स्वभावाकडे दुर्लक्ष करावे. आज तुमच्या जुन्या ओळखी वापरून सरकारी कंत्राट मिळवाल. राजकीय व्यक्ती आणि एक्सपोर्ट-इम्पोर्ट व्यवसायातल्या व्यक्तींना भरपूर फायदा संभवतो. शुभ रंग : Sky Blue शुभ दिवस : सोमवार शुभ अंक : 6 दान : कृपया मंदिरामध्ये तेल दान करा. #नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) तुमच्या आकर्षक पर्सनॅलिटीमुळे कित्येक जण तुमच्यावर जळतील; मात्र त्यामुळे तुमच्या कामावर परिणाम होणार नाही. तुमचं अभिनयकौशल्य दाखवण्यासाठी आज उत्तम दिवस आहे. नोकरीच्या शोधात असलेल्यांना चांगली बातमी मिळेल. पब्लिक फिगर असणाऱ्या व्यक्ती आपल्या बोलण्यातून इतरांवर छाप पाडतील. संगीतकार आणि लेखकांनी आज घेतलेले सर्व निर्णय त्यांच्या फायद्याचे ठरतील. आज केलेली गुंतवणूक भरपूर फायदा देऊ शकते. प्रेमात असलेल्यांनी आपल्या जोडीदाराला मनातल्या भावना मोकळेपणाने सांगाव्यात. सरकारी अधिकाऱ्यांनी खबरदारी घेण्याची गरज आहे. दिवसाची सुरुवात करताना कपाळावर चंदनाचा टिळा लावा. दिवसभरात गुरूच्या नावाचा जप केल्याने फायदा होईल. शुभ रंग : Orange शुभ दिवस : गुरुवार शुभ अंक : 3 आणि 1 दान : कृपया महिला मदतनीस व्यक्तीला केशर दान करा. #नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) तुम्ही घेतलेल्या निर्णयावर ठाम राहा. त्यामुळे भविष्यात भरपूर फायदा होईल. वारंवार तुमचं मत बदलू नका. उत्पादक आणि शेतकरी एखादी प्रॉपर्टी वा संपत्ती घेण्याचा विचार करत असाल, तर थोडं थांबा. राजकारण आणि मनोरंजन क्षेत्रातल्या व्यक्तींनी आज प्रवास केल्यास फायदा संभवतो. मेडिकल, सॉफ्टवेअर, हस्तकला, धातू, जाहिरात या क्षेत्रांतल्या व्यक्ती आणि वैज्ञानिकांना आज मोठं यश मिळेल. विद्यार्थी आरामात आपलं लक्ष्य गाठतील. मार्केटिंग क्षेत्रातल्या व्यक्ती आपलं टार्गेट पूर्ण करतील. कृपया मांसाहार टाळा आणि मेडिटेशन करा. शुभ रंग : Blue शुभ दिवस : शनिवार शुभ अंक : 9 दान : कृपया भिकाऱ्यांना लिंबूवर्गीय फळं दान करा. #नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) ग्लॅमर इंडस्ट्री आणि मीडियामधल्या व्यक्तींसाठी आज भरभराटीचा दिवस आहे. वैयक्तिक आयुष्यात आज रोमान्स आणि कमिटमेंट्स यांची भरपूर शक्यता आहे. तुमच्या कामाबद्दल प्रशंसा आणि फायदा मिळवण्याचा आजचा दिवस आहे. एखादा जुना मित्र वा नातेवाईक तुमच्याकडे मदत मागण्यासाठी येईल. त्याला टाळू नका. डिझायनर, ब्रोकर, प्रॉपर्टी डीलर, बँकर, खेळाडू आणि राजकीय नेते या व्यक्तींचं नशीब जोरावर राहील. सेल्स आणि खेळात असलेल्या व्यक्तींनी जलद हालचाल करणं फायद्याचं ठरेल. विद्यार्थ्यांना यश मिळेल. शुभ रंग : Sea Green शुभ दिवस : बुधवार शुभ अंक : 5 दान : कृपया हिरव्या पालेभाज्या दान करा. # नंबर 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आजचा दिवस प्रेमाचा आणि भरपूर संधींचा आहे. कुटुंबाचं प्रेम मिळेल. एकदम ऐशोआरामात दिवस जाईल. मुलांसोबत वेळ व्यतीत करण्यासाठी आज उत्तम दिवस आहे. व्हिसा मिळण्यासाठी वाट पाहत असाल तर आणखी थोडं थांबावं लागेल. नवीन घर किंवा नोकरीच्या शोधत असलेल्यांना आज आवडता पर्याय मिळेल. अभिनेते आणि मीडिया क्षेत्रातल्या व्यक्तींना यश मिळेल. दुपारनंतर तुम्हाला आयुष्याबाबत बरीच स्पष्टता मिळेल. त्यामुळे समाधानी वाटेल. शुभ रंग : Teal शुभ दिवस : शुक्रवार शुभ अंक : 6 दान : कृपया गरिबांना दुग्धजन्य मिठाई दान करा. #नंबर 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आजचा दिवस वाणी मधुर ठेवण्याचा आहे. तुमच्या कम्फर्ट झोनमध्ये न राहता, तातडीने बाहेर पडण्याची गरज आहे. नव्या संधी तुमची वाट पाहत आहेत. वकील आणि सीए असणाऱ्या व्यक्तींना करिअरमध्ये मोठं यश मिळेल. खेळ आणि शिक्षणात वरिष्ठांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहील. नातेसंबंध फुलतील. विरुद्धलिंगी व्यक्ती तुमच्यासाठी नशीबवान ठरेल. राजकीय नेते नागरिकांवर आणि पक्षातल्या वरिष्ठांवर छाप पाडण्यात यशस्वी होतील. महिलांना शेअर मार्केटमध्ये यश मिळेल. आज गुरूमंत्राचा जप करणं विसरू नका. शुभ रंग : Orange शुभ दिवस : सोमवार शुभ अंक : 7 दान : कृपया मंदिरात कुंकू दान करा. #नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) भूतकाळात केलेल्या काही चांगल्या कामांचा पैशांच्या स्वरूपात परतावा मिळेल. एखादा मोठा निर्णय घेताना आपला आडमुठा स्वभाव बाजूला ठेवा. तुमच्या मोठ्या सोशल नेटवर्कमुळे तुमची कामं पटापट पूर्ण होतील. दिवसाच्या शेवटी यश मिळेल. आजचा बराचसा वेळ ज्ञानार्जनात जाईल. डॉक्टर्सची सेमिनारमध्ये प्रशंसा होईल. पब्लिक फिगर असणाऱ्या व्यक्तींना संध्याकाळपर्यंत भरपूर प्रसिद्धी मिळेल. शुभ रंग : Sea Blue शुभ दिवस : शुक्रवार शुभ अंक : 6 दान : कृपया भिकाऱ्यांना लिंबूवर्गीय फळं दान करा. #नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आजचा दिवस आनंदात जाईल. जुने मित्र भेटण्याची शक्यता आहे. प्रॉपर्टी डीलर्स आणि डॉक्टर्सचं कामाच्या ठिकाणी विशेष कौतुक होईल. प्रेमात असलेल्यांनी मध्यस्थांच्या बाबतीत खबरदारी घ्यावी. आजचा दिवस प्रगतीचा आणि प्रशंसा मिळवण्याचा आहे. अचानक धनलाभ संभवतो. प्रमोशनसंबंधी बोलणी, मुलाखत, ऑडिशन किंवा सरकारी ऑर्डरसाठी अर्ज दाखल करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. खेळाडू आणि विद्यार्थ्यांनी डॉक्युमेंटेशनच्या दृष्टीने पावलं उचलावीत. अभिनेते, सीए, शिक्षक, खेळाडू आणि हॉटेल व्यावसायिकांचं नशीब जोरावर राहील. शुभ रंग : Red and Orange शुभ दिवस : मंगळवार शुभ अंक : 3 आणि 9 दान : कृपया घरगुती कामगारांना वा भिकाऱ्यांना डाळिंबं दान करा. 31 मे रोजी जन्मलेले सेलेब्रिटीज : कृष्णा दास, अहिल्याबाई होळकर, वीर दास, सुब्रतो बागची, कल्पना आझमी
First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Numerology

पुढील बातम्या