मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

Numerology : आज कोणता रंग तुमच्यासाठी लकी; काय खाणं फायद्याचं ठरेल? वाचा अंकशास्त्र

Numerology : आज कोणता रंग तुमच्यासाठी लकी; काय खाणं फायद्याचं ठरेल? वाचा अंकशास्त्र

अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 10 ऑगस्ट 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.

अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 10 ऑगस्ट 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.

अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 10 ऑगस्ट 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.

ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 10 ऑगस्ट 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या. #नंबर 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज कोणतंही काम पूर्ण करण्यासाठी तुमची इच्छाशक्ती महत्त्वाची ठरेल. प्रवास आरामात होतील आणि इच्छित स्थळी वेळेवर पोहोचाल. इतरांचा विश्वास जिंकण्यासाठी योग्य काळ नाही. त्यामुळे जास्त कमिटमेंट्स टाळा. सामाजिक संपर्कामुळे पद प्राप्त करण्यास कोणतीही अडचण येणार नाही. यश मिळवण्यासाठी सूर्यदेव आणि गुरूचे आशीर्वाद घ्यायला विसरू नका. खेळाडूंना आपल्या प्रशिक्षकांमुळे मोठं येश मिळेल. तुमच्या खेळातली एखादी मोठी व्यक्ती भेटेल. आत्मविश्वास वाढण्यासाठी सूर्यदेवाला जल अर्पण करा. शुभ रंग : Yellow and Blue शुभ दिवस : रविवार आणि शुक्रवार शुभ अंक : 5 दान : गरिबांना पिवळा भात दान करा. #नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) उच्च शिक्षण किंवा परदेशात शिक्षण घेण्यासाठी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर त्यासाठी आज उत्तम दिवस आहे. समोर येणारी सर्व कामं आणि आव्हानं आत्मविश्वासाने स्वीकारा. लहान मुलांसोबत आणि नातेवाईकांसोबत वेळ व्यतीत करण्यासाठी उत्तम दिवस. गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे बिझनेसमध्ये मोठी उडी घेऊ शकता. लिक्विड, शिक्षण, साहित्य, फायनान्स, इलेक्ट्रॉनिक्स, औषध, एक्स्पोर्ट-इम्पोर्ट, सौर ऊर्जा, शेती, पेट्रोल आणि केमिकल्स अशा व्यवसायांमध्ये असलेल्या व्यक्तींना चांगला नफा होईल. शुभ रंग : White and Sky Blue शुभ दिवस : सोमवार शुभ अंक : 2 दान : गायींना आणि भिक्षेकऱ्यांना पिण्याचं पाणी दान करा. #नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) ब्युटी पार्लर आणि खाद्यपदार्थ या क्षेत्रांमधली संधी मिळाल्यास सोडू नका. प्रसिद्धी मिळवण्यासाठी सध्या चांगला काळ आहे. त्यामुळे तुमचं कौशल्य लोकांसमोर दाखवा. विद्यार्थ्यांना आज मोठं यश मिळेल. तुमच्या कामाची दखल घेतली जाईल; मात्र तुमच्या मार्गदर्शकाचे आभार मानायला विसरू नका. गोड बोलून तुमच्या जोडीदाराचं मन जिंकण्यासाठी आज उत्तम दिवस आहे. तुम्ही राजकीय नेते किंवा सरकारी अधिकारी असलात, तर आज लोकांचं लक्ष तुमच्याकडे वेधून घ्याल. विद्यार्थ्यांनी परीक्षा किंवा मुलाखत देण्यापूर्वी गुरुमंत्राचा जप करणं आवश्यक आहे. महिलांनी आज पिवळ्या रंगाचे अन्नपदार्थ बनवून संपूर्ण कुटुंबाला ते खाऊ घालावेत. यामुळे गुरू ग्रहाची शक्ती वाढेल. शुभ रंग : Pink and Violet शुभ दिवस : गुरुवार शुभ अंक : 3 आणि 1 दान : मंदिरात चंदन दान करा. #नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) डॉक्टर आणि वैज्ञानिकांना त्यांच्या कामाचा चांगला मोबदला मिळेल. योजनाबद्ध पद्धतीने काम केल्यास गोंधळ दूर होईल. आज कामाचं अगदी योग्य व्यवस्थापन कराल. त्यामुळे योग्य पद्धतीने काम पार पडेल. डिफेन्स, प्रॉपर्टी डीलर्स, हॉटेल व्यावसायिक, उत्पादक, टेलिकॉम व्यावसायिक आणि आयटी कर्मचारी या सर्वांना भरपूर फायदा होईल. आज केलेल्या गुंतवणुकीवर परतावा मिळण्यासाठी काही वेळ लागेल हे लक्षात घ्या. आजचा बराचसा वेळ नियोजनात जाईल. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणार असाल, तर वरिष्ठांचा सल्ला अवश्य घ्या. तुमचा छंद जोपासण्यासाठी थोडा वेळ काढा. संत्री सेवन करा. शुभ रंग : Grey शुभ दिवस : शुक्रवार शुभ अंक : 9 दान : गरिबांना किंवा गायींना हिरवं वा काळं धान्य दान करा. #नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) जोडप्यांमध्ये एकमेकांप्रति विश्वास कायम ठेवा, अन्यथा अडचणीत याल. व्यावसायिक आणि राजकीय व्यक्तींसाठी उत्तम दिवस. तुमच्या सहकाऱ्यांपासून सावध राहा आणि तुमची गुपितं त्यांना सांगू नका. मित्रांसोबत किंवा नातेवाईकांसोबत असताना व्यावहारिकपणे विचार करा. ग्लॅमर, मीडिया, फॉरेन कमोडिटीज आणि क्रीडा क्षेत्रातल्या व्यक्तींना विशेष अप्रैझल मिळेल. मीटिंगमध्ये Aqua रंगाचे कपडे घातल्याने फायदा होईल. आज पार्टी आणि मांसाहार टाळा. प्रॉपर्टीशी संबंधित निर्णय तुमच्या बाजूने लागतील. खेळाडूंना मोठं यश मिळेल. शुभ रंग : Aqua शुभ दिवस : बुधवार शुभ अंक : 5 दान : गायींना पाणी दान करा. #नंबर 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) तुमच्या व्यक्तिमत्त्वाचं सौंदर्य वाढवण्याचा आजचा दिवस आहे. त्यासाठी भरपूर शॉपिंग कराल. कॉस्मेटिक्स व्यापार आणि क्रिएटिव्ह क्षेत्रातल्या व्यक्तींना नव्या संधी मिळतील. तुम्हाला योग्य जोडीदार दिल्याबद्दल आज देवाचे आभार मानाल. पालकांना आपल्या मुलांचा अभिमान वाटेल. कुटुंबीय, नातेवाईक, मित्र आणि सहकाऱ्यांचा पूर्ण पाठिंबा तुम्हाला मिळेल. जोडीदारासोबत वेळ व्यतीत करण्यासाठी आणि ऑफिसमध्ये प्रेझेंटेशन देण्यासाठी उत्तम दिवस. सरकारी कंत्राट घेताना रिस्क घेणं फायद्याचं ठरेल. वाहन, घर, मोबाइल इत्यादी गोष्टींच्या खरेदीसाठी किंवा सहल आयोजित करण्यासाठी चांगला दिवस. शेअर मार्केट गुंतवणूक फायद्याची ठरेल. रोमँटिक रिलेशनशिपमध्ये समाधानी राहाल. अभिनय आणि राजकीय क्षेत्रात करिअर करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांनी समोर येणारी ऑफर स्वीकारावी. भविष्यात फायदा होईल. शुभ रंग : Blue and Pink शुभ दिवस : शुक्रवार शुभ अंक : 6 दान : मंदिरात नारळ दान करा. #नंबर 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) तुमची इच्छाशक्ती आज तुमच्या बाजूने असेल. आजचा दिवस बऱ्याच चढ-उतारांचा असेल. विशेषतः बिझनेस डील्समध्ये तुम्हाला हुशारीने काम करावं लागेल. मेडिकल चेअकप करणार असाल, तर ते संध्याकाळी पार पाडावं. आज वृद्धांची सेवा करणं फायद्याचं ठरेल. कोणताही मोठा निर्णय घेणं टाळा. विरुद्धलिंगी व्यक्तीचा सल्ला स्वीकारा. पैशांची योग्य पद्धतीने बचत करण्यासाठी वकिलांचा सल्ला घ्या. सॉफ्टवेअर आणि राजकीय क्षेत्रातली बिझनेस डील्स यशस्वी होतील. विवाहासाठी अनुरुप प्रस्ताव येतील. भगवान शंकराच्या मंदिरात जाऊन नवग्रह पूजा केल्याने समाधान मिळेल. शुभ रंग : Peach शुभ दिवस : सोमवार शुभ अंक : 7 दान : आश्रमात पिवळी फळं दान करा. #नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) तुमच्या बॉसवर आणि वरिष्ठांवर चांगली छाप पाडण्याएवढी क्षमता तुमच्याकडे आहे. कामाच्या ठिकाणी लवचिक राहणं फायद्याचं ठरेल. एखादं काम लवकर पूर्ण व्हावं यासाठी आवश्यकतेनुसार पैसा किंवा हुशारी वापरावी लागेल. कायदेशीर प्रकरणं सोडवण्यासाठी प्रभावी व्यक्तीची किंवा पैशांची मदत होईल. बिझनेस डील पूर्ण करण्यासाठी तुमच्या ओळखी कामी येतील. विद्यार्थ्यांनी स्पर्धेला उपस्थित राहताना गडद रंगाचे कपडे घालणं टाळावं. जोडीदारासोबतविसंवादामुळे वाद होईल. तुमचे सर्व निर्णय योग्य ठरतील. प्रवासाचे बेत टाळणं उत्तम. दानधर्म करणं गरजेचं आहे. शुभ रंग : Teal शुभ दिवस : शनिवार शुभ अंक : 6 दान : गरजूंना चपला दान करा. #नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) जोडप्यांना भविष्याचं नियोजन करण्यासाठी उत्तम दिवस. सरकारी टेंडर आणि डील आरामात पार पडतील. ग्लॅमर, एअरलाइन्स, सॉफ्टवेअर, गूढविद्या, संगीत किंवा शिक्षण क्षेत्रातल्या व्यक्तींना प्रसिद्धी मिळेल. राजकीय क्षेत्रातल्या व्यक्तींना नवीन पद मिळेल. आजचा दिवस सभेत भाषण देण्यासाठी, मुलाखत देण्यासाठी, स्पर्धा परीक्षा देण्यासाठी उत्तम आहे. संगीतकार आणि खेळाडू व्यक्तींच्या पालकांना आपल्या मुलांचा अभिमान वाटेल. डॉक्टर आणि सर्जन असलेल्या व्यक्तींना पुरस्कार मिळेल. प्रवासामध्ये अनेक गोष्टी साध्य होतील. शुभ रंग : Red शुभ दिवस : मंगळवार शुभ अंक : 9 दान : लाल मसूर दान करा. 10 ऑगस्ट रोजी जन्मलेले सेलेब्रिटीज : व्ही. व्ही. गिरी, शबीर अहलुवालिया रमेशबाबू प्रज्ञानंद, प्रत्यूषा बॅनर्जी, फूलनदेवी
First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Numerology, Zodiac signs

पुढील बातम्या