आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून भूमिका कलम यांनी सांगितलेलं आजच्या दिवसाचं (27 जुलै 2022) राशिभविष्य
मेष (Aries) : दैनंदिन उत्पन्नाचे स्रोत वाढतील. तुम्हाला तुमच्या मुलांवर खर्च करावा लागेल. तुमच्या दिवसाची आर्थिकदृष्ट्या छान सुरुवात होईल. आज व्यवसायातून तुम्हाला खूप आनंद, समाधान मिळेल.
वृषभ (Taurus) : कुटुंबातल्या सदस्यामुळे तुम्ही आज आर्थिकदृष्ट्या नशीबवान ठराल. पार्टनरशिपमधल्या व्यवहारांमध्ये खूप सावध राहण्याची गरज आहे. व्यवसायांची वृद्धी होण्याची अपेक्षा आहे. इन्शुरन्समुळे तुम्हाला आर्थिक मदत होईल.
मिथुन (Gemini) : कौटुंबिक सहली ठरवाल आणि त्यातून खर्चही होईल. आज तुम्हाला बचतीसाठी चांगल्या संधी मिळतील. आज घराच्या नूतनीकरणासाठी काही खर्च होईल. आर्थिक परिस्थिती सुधारेल.
कर्क (Cancer) : वडिलोपार्जित संपत्तीशी निगडित असलेले वाद सुटतील. तुम्हाला तुमच्या आरोग्यावर खर्च करावा लागण्याची शक्यता आहे. तुम्ही रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करू शकाल. बिझनेसमध्ये उत्पन्नाच्या दृष्टीने स्थिरता मिळेल. घरखर्च कमीत कमी असेल.
सिंह (Leo) : पार्टनरशिपमधून उत्पन्नात सुधारणा होईल. अत्यंत कष्ट करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आजचा दिवस समाधान, आनंद देणारा, गौरवाचा असेल. व्यावसायिकांची आर्थिकदृष्ट्या चांगली प्रगती होईल.
कन्या (Virgo) : आज तुमचे आई-वडील तुम्हाला आर्थिक मदत करतील. आज तुमचा प्रवासावर विनाकारण खर्च होईल. मुलांच्या अनारोग्यामुळे काही खर्च होण्याची शक्यता आहे. बिझनेसमध्ये गुंतवणुकीची गरज आहे आणि बिझनेसमध्ये नफा होईल. बिघडलेल्या आर्थिक परिस्थितीमुळे कुटुंबात वाद होण्याची शक्यता आहे.
तूळ (Libra) : बिझनेसमधल्या उत्पन्नाच्या साधनात प्रगती होईल. फिल्ड वर्क फायद्याचं ठरेल. आर्थिक परिस्थिती पार्टनरशिपच्या माध्यमातून सुधारू शकते. ऑफिसमध्ये ओव्हरटाइम काम केल्यास चांगले लाभ, बक्षीस मिळेल.
वृश्चिक (Scorpio) : पगारात वाढ होण्याची शक्यता आहे. कुटुंबाचे खर्चही वाढण्याची शक्यता आहे. बिझनेसमध्ये तोटा सहन करावा लागण्याची शक्यता आहे. अनपेक्षित परिस्थितीतून तुम्हाला चांगले पैसे कमावण्याची संधी उपलब्ध होऊ शकेल. गुंतवणूक केलेल्या पैशांतून नफा होईल.
धनू (Sagittarius) : कौटुंबिक खर्च वाढतील. ओळखीच्या व्यक्तीकडून तुम्हाला आर्थिक मदत मिळेल. बिझनेसच्या प्रगतीच्या दृष्टीने आजचा दिवस चांगला आहे. वाहनावर खर्च करावा लागण्याची शक्यता आहे.
मकर (Capricorn) : विद्यार्थ्यांना त्यांच्या वडिलांकडून आर्थिक मदत केली जाईल. कुटुंबांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होत असल्याचं जाणवेल. दैनंदिन उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. बिझनेसची वृद्धी होईल. भावंडांवरच्या खर्चात वाढ होईल.
कुंभ (Aquarius) : कामासाठी केलेल्या प्रवासामुळे तुमच्या बजेटवर परिणाम होईल. घरात धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केल्यामुळे मोठा खर्च होईल; मात्र एकंदर आर्थिक परिस्थिती तुम्हाला अनुकूल अशी आहे. वाहनाच्या दुरुस्तीसाठी खर्च होण्याची शक्यता आहे.
मीन (Pisces) : भविष्यासाठी बचत आणि गुंतवणुकीचं नियोजन आज करण्याचा प्रयत्न करा. बिझनेसमध्ये आर्थिक वृद्धी होईल. लाइफ पार्टनर्समुळे खर्च वाढण्याची शक्यता आहे. आज तुम्ही जुनी कर्जं फेडू शकाल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.