मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

Money Mantra: मोठे आर्थिक व्यवहार करणार आहात? जरा थांबा; आर्थिकदृष्टया 26 जुलैचा दिवस असा असेल

Money Mantra: मोठे आर्थिक व्यवहार करणार आहात? जरा थांबा; आर्थिकदृष्टया 26 जुलैचा दिवस असा असेल

आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून भूमिका कलम यांनी सांगितलेलं आजच्या दिवसाचं (26 जुलै 2022) राशिभविष्य

आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून भूमिका कलम यांनी सांगितलेलं आजच्या दिवसाचं (26 जुलै 2022) राशिभविष्य

आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून भूमिका कलम यांनी सांगितलेलं आजच्या दिवसाचं (26 जुलै 2022) राशिभविष्य

आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून भूमिका कलम यांनी सांगितलेलं आजच्या दिवसाचं (26 जुलै 2022) राशिभविष्य

मेष (Aries) : परदेशी गुंतवणुकीतून तुम्हाला अधिक पैसा मिळेल. कापड व्यापारी चांगला नफा कमावतील. पैसे अडकलेली जुनी प्रकरणं मार्गी लागतील. पैशांशी संबंधित सर्व कामं यशस्वीपणे पूर्ण होतील.

वृषभ (Taurus) : आज बिझनेस चांगला चालेल. आर्थिक व्यवहार फायद्याचे ठरतील. नोकरीच्या नव्या संधी उपलब्ध होतील. तुम्ही ज्या व्यक्तीवर प्रेम करता, तिच्याबरोबर प्रवासाला जाऊ शकता. आज तुम्हाला वडिलांकडून आर्थिक साह्य मिळेल.

मिथुन (Gemini) : परदेशी कंपनीत गुंतवणूक केल्यास भविष्यात मोठा फायदा होऊ शकतो. ओळखीच्या व्यक्तीसोबत पार्टनरशिपमध्ये बिझनेस सुरू करायची इच्छा असल्यास आज चांगला दिवस आहे. वडिलांची मालमत्ता फायद्याची ठरेल. आज तुम्ही तुमच्या लहान भावंडांना मदत करण्याची शक्यता आहे.

कर्क (Cancer) : पार्टनरशिपमध्ये नवा बिझनेस सुरू करा. तो खूप फायद्यात चालेल. लोह आणि स्टीलच्या बिझनेसमध्ये असलेल्या व्यक्तींना तोटा होण्याची शक्यता आहे. घरखर्च कमीत कमी असतील. मित्रांसोबत आंतरराष्ट्रीय ट्रिपचं नियोजन करू शकाल; मात्र त्याचा तुमच्या बजेटवर विपरीत परिणाम होईल.

सिंह (Leo) : आज बिझनेसमधून जास्त फायदा होणार नाही. व्यापाराशी संबंधित कामांमध्ये आज गुंतवणूक करणं टाळा. कारण त्यातून मोठा आर्थिक तोटा होण्याची शक्यता आहे. तुमच्या ओळखीची एखादी महिला आज मदत करील. दैनंदिन खर्च वाढतील आणि ते ताणाचं कारण ठरेल.

कन्या (Virgo) : मशिनरीशी संबंधित बिझनेसना नशीब अनुकूल आहे. तुमचे अडकलेले पैसे परत मिळतील. तुम्ही नोकरदार मनुष्य असलात, तर स्वतःचं काही तरी नवं व्हेंचर सुरू करण्याचं नियोजन करू शकता. फॉरीन ट्रेड आज नफ्याचा ठरेल. जमीन आणि प्रॉपर्टीशी संबंधित मुद्द्यांमुळे पैसे अडकून राहतील.

तूळ (Libra) : बिझनेसची चांगली प्रगती होईल. परिस्थिती अनुकूल असली, तर तुम्ही आज तुमच्या घराच्या स्वप्नपूर्तीच्या दिशेने महत्त्वाचं डील आज करू शकाल. उत्पन्नापेक्षा खर्च जास्त होण्याची शक्यता आहे. घरातल्या नात्यांमध्ये काही प्रॉब्लेम्स येण्याची शक्यता आहे. घरखर्च वाढण्याची शक्यता आहे. आज तुम्हाला तुमच्या भावंडांना आर्थिक मदत करावी लागण्याची शक्यता आहे.

वृश्चिक (Scorpio) : खाद्यपदार्थांशी निगडित व्यवसायांना नशीब साथ देईल आणि या बिझनेसमधून चांगलं उत्पन्न मिळेल. आज तुम्ही आर्थिक मदत आवश्यक असलेल्या एखाद्या मित्राला मदत कराल. शेअर बाजारात गुंतवलेले पैसे तुमच्या चिंतेचं कारण ठरतील. एखाद्या जवळच्या व्यक्तीशी कर्जावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

धनू (Sagittarius) : कोणी तरी तुम्हाला आर्थिक मदत करील. गुंतवणूक जोखमीची ठरेल. गुंतवणुकीबाबत सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. दैनंदिन उत्पन्नावरून डिप्रेशन येण्याची शक्यता आहे. खासगी उद्योगांना काही किरकोळ तोटा होण्याची शक्यता आहे.

मकर (Capricorn) : कापड व्यापाऱ्यांना त्यांचे अडकलेले पैसे परत मिळण्यात अडचणी येतील. तुम्हाला कदाचित काही पैसे कर्जाऊ किंवा उधार घ्यावे लागतील. तुमची आई तुम्हाला आज आर्थिक मदत करील. तुम्ही तुमच्या उत्पन्नाच्या स्रोतावर विचार कराल. तुमचा जवळचा मित्र तुम्हाला आर्थिक वृद्धीच्या वाटेवर नेईल.

कुंभ (Aquarius) : तुम्हाला तुमची प्रेयसी/प्रियकर यांच्यावर आज खर्च करावा लागेल. आज कुटुंब हे आर्थिक तोट्याचं कारण ठरेल. उपजीविका मिळवणं अवघड आहे. पार्टनरशिपमधून तुम्हाला समृद्धी मिळेल. अचानक झालेल्या एखाद्या प्रवासामुळे तुमचं बजेट विस्कळीत होईल.

मीन (Pisces) : दैनंदिन उत्पन्न खूप समाधानकारक नसेल. तुम्हाला खास मित्राकडून काही पैसे उधार घ्यावे लागण्याची शक्यता आहे. प्रवासामुळे आर्थिक अडचणी उद्भवतील. आज बिझनेसविषयक व्यवहारांमध्ये सावधगिरी बाळगायला हवी.

First published:

Tags: Astrology and horoscope, Money, Money matters