जाहिरात
मराठी बातम्या / राशीभविष्य / Money Mantra: आज 'या' राशीला होणार प्रचंड मोठा आर्थिक लाभ; कशी असेल तुमची आर्थिक बाजू? जाणून घ्या

Money Mantra: आज 'या' राशीला होणार प्रचंड मोठा आर्थिक लाभ; कशी असेल तुमची आर्थिक बाजू? जाणून घ्या

आर्थिक राशिभविष्य.

आर्थिक राशिभविष्य.

Money Mantra: आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून आजच्या दिवसाचं (21 जुलै 2022) राशिभविष्य.

    Money Mantra: आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून आजच्या दिवसाचं (21 जुलै 2022) राशिभविष्य. भूमिका कलाम यांच्या माध्यमातून बाराही राशींचं आर्थिक राशीभविष्य जाणून घेऊया. मेष (Aries) : आज तुम्हाला आनंदी वाटेल. आज तुम्ही सुखसोयीच्या भौतिक गोष्टींवर खर्च कराल आणि आरामदायी वातावरणाचा आनंद घ्याल. भरपूर मोठी रक्कम हातात आल्यामुळे तुम्हाला समाधान मिळेल आणि नशीब तुम्हाला साथ देईल. संध्याकाळी मित्रमंडळी आणि कुटुंबीयांसमवेत चांगला काळ व्यतीत कराल. रात्री काही कारणामुळे कुटुंबीयांवर काही खर्च करावा लागेल. वृषभ (Taurus) : आजचा दिवस आरोग्यासाठी वाईट आहे. अनहेल्दी अन्नपदार्थ टाळा. हलका आहार घ्या. आज आळशीपणामुळे तुम्हाला ऑफिसचं काम करावंसं वाटणार नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट असतो. संध्याकाळपासून रात्रीपर्यंतच्या काळात तुम्ही एखाद्या लग्नसोहळ्याला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुमचा काही खर्चही होईल. मिथुन (Gemini) : आज तुम्ही एखादा महत्त्वाचा प्रोजेक्ट सुरू करण्याबद्दल विचार कराल. तो प्रोजेक्ट यशस्वीरीत्या पूर्ण होण्यासाठी वर्षभर लागू शकतं. आज तुम्ही काही प्रकारच्या आर्थिक लाभाची अपेक्षा करू शकता. आरोग्य, तसंच आर्थिक मुद्द्यांकडे दुर्लक्ष करू नका. सध्याच्या घडीला तुम्ही रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक केली नाहीत तर बरं. कर्क (Cancer) : आजचा दिवस तुमच्यासाठी फारच चांगला आहे. आज नशीब महत्त्वाची भूमिका निभावेल. जीवनाच्या सर्व क्षेत्रांत तुम्ही प्रगतीच्या दिशेने वाटचाल कराल. लाभ मिळतील. स्कीमशी संबंधित प्रपोझलला मंजुरी मिळाल्यानंतर आणि पैसे मिळाल्यानंतर तुम्ही बिझनेस प्रोग्राम घेऊन पुढे जाल. तुम्हाला योग्य प्रकारची, अनुरूप माणसं आणि चांगल्या संधी मिळत राहतील. त्यांच्या साह्याने तुम्ही प्रगतीच्या मार्गावर पुढे वाटचाल करत राहाल. सिंह (Leo) : आज तुमचे अन्य व्यक्तींसोबतचे नातेसंबंध मधुर असतील. तुम्हाला ऑफिसमध्येही सर्व प्रकारचं साह्य मिळेल. आज तुम्हाला कदाचित डॉक्टरांकडेही जावं लागण्याची शक्यता आहे. संध्याकाळी काही आरोग्य समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. संध्याकाळी कोणासोबतही आर्थिक व्यवहार करू नका. रात्री तुम्हाला एखादं गिफ्ट किंवा सरप्राइज मिळण्याची शक्यता आहे. कन्या (Virgo) : आज तुम्हाला ऑफिसमधल्या व्यक्तींकडून सर्व प्रकारचं सहकार्य मिळेल. प्रोजेक्ट पूर्ण करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. एखाद्या महान माणसाच्या मध्यस्थीने कौटुंबिक वाद सोडवता येईल. सावध राहा. आर्थिक बाबतींत नशीब साथ देईल. तूळ (Libra) : आज तुम्ही बिझनेस पार्टनरशिप मेन्टेन करण्याची गरज आहे. तसंच तुमच्या रागावर नियंत्रण ठेवण्याचीही गरज आहे. आज तुम्ही सर्व प्रकारच्या भूमिका चांगल्या प्रकारे निभावाल. आज तुम्हाला यश मिळेल, नशीब साथ देईल. संध्याकाळचा वेळ मनोरंजनात व्यतीत केला जाईल. वृश्चिक (Scorpio) : आज या राशीच्या व्यक्तींना संमिश्र परिणाम दिसतील. तुम्ही शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असूनही प्रोफेशनल लाइफमध्ये चांगलं काम कराल. धाडसाने जी कामं कराल, त्यात यश मिळेल. कामाच्या ठिकाणी, तसंच कुटुंबात काही अडचणी असतील. तुम्ही त्यांना धीराने तोंड द्याल आणि त्यातून बाहेर याल. धनू (Sagittarius) : आरोग्यविषयक, तसंच आर्थिक रिसोर्सेसकडे लक्ष देणं गरजेचं. नशीब तुम्हाला साथ देईल आणि कुटुंब आनंदी असेल. ऊर्जा वाया घालवू नका. कारण अशा व्यक्ती एकामागोमाग एक विनंत्या करत राहतात. आज तुमचं समाजातलं महत्त्व वाढेल. मूडमध्ये होत असलेल्या बदलांवर लक्ष ठेवा. भावनांवर नियंत्रण ठेवणं महत्त्वाचं. मकर (Capricorn) : आज तुमच्या आयुष्यात काही महत्त्वाचे बदल घडू शकतात आणि त्यातून तुम्हाला लाभ होणं अपेक्षित आहे. आज तुम्ही एखाद्या कठीण परिस्थितीतून जाल; पण एक लक्षात घ्या की जेव्हा अंधार जास्त गडद होतो, तेव्हा पहाट जवळ असते. आज तुम्ही सत्याला सामोरे गेलात, तर नशीब तुम्हाला साथ देईल. तुम्हाला काही भावनिक समस्यांना तोंड द्यावं लागू शकेल; पण तुम्ही साऱ्या समस्यांवर मात कराल. कुंभ (Aquarius) : कुंभ राशीचा स्वामी असलेल्या शनीचे आशीर्वाद आज तुमच्या पाठीशी असतील. तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकतील. आज तुमच्या कुटुंबात आनंदी वातावरण असेल. नशीब तुम्हाला साथ देईल. वैयक्तिक नातेसंबंधांवर भावनांचं राज्य असेल. कोणतंही काम करताना एकदा विचार जरूर करा. कामाच्या ठिकाणी अनपेक्षित काही बदल होण्याची शक्यता आहे. प्रत्येक क्षेत्रात फायदे होतील. मीन (Pisces) : आज नशीब तुम्हाला साथ देईल आणि घरात आनंदाचं आगमन होईल. तुम्ही ठेवलेल्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत तर तुम्ही निराश व्हाल. वैयक्तिक नात्यांमध्ये काही कारणावरून वाद होण्याची शक्यता आहे. आज तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, की तुम्हाला आयुष्यात गरज पडेल, तेव्हा मित्र नक्कीच तुम्हाला साथ देतील.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात