छत्रपती संभाजीनगर, 1 जुलै: प्रत्येक व्यक्ती आपलं भविष्य जाणून घेण्यासाठी उत्सुक असतो. आपल्या राशीमध्ये कोणते योग येणार आहेत. त्याचबरोबर आपल्याला काय फायदा होणार आहे? तसेच आपलं आरोग्य कसं राहणार आहे? हे जाणून घेण्याची उत्सुकता असते. आज आपण ज्योतिषाचार्य अनंत पांडव यांच्याकडून धनु राशीसाठी जुलै महिन्यामध्ये कोणते योग असणार आहेत? हे पाहणार आहोत. धनु राशीच्या लोकांना हे होतील फायदे धनु राशीचा पराक्रम स्थानांमधून म्हणजे कुंभ राशीतून शनी महाराज वक्रीभ्रमण करत आहेत. या प्रमाणाचे फळ म्हणजे जे व्यक्ती राजकारणात आहेत किंवा राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत त्यांना याचा नक्कीच फायदा होईल. चांगले यश येईल. व्यापार क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांना फायदा होईल. नोकरी करणाऱ्यांना प्रमोशन मिळेल, तसेच त्यांना पगारातही चांगली वाढ मिळू शकते, असे पांडव म्हणतात.
शेअर मार्केट गुंतवणूक केल्यास फायदा सप्तम स्थानांमधून बुध आणि रवी एकत्र भ्रमण करत आहेत. यामुळे भद्र राजयोग हा निर्माण होत आहे. यामुळे नोकरी क्षेत्रात किंवा व्यावसायिक क्षेत्रामध्ये चांगली वृद्धी होईल. तसेच शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास किंवा दीर्घ गुंतवणूक करणाऱ्या लोकांना निश्चितच फायदा होईल व लाभ होईल. अष्टमस्थानात शुक्र आणि मंगळ यांच्या युतीने मालव्य योग तयार होत आहे. त्यामुळे निश्चितच लाभ होईल, असं पांडव यांनी म्हटलं आहे. शेती, वास्तू, गृह योग जे लोक अनेक दिवसांपासून भूमीच्या किंवा घराच्या शोधामध्ये आहेत त्यांना देखील फायदा होईल. जे वास्तूच्या शोधात आहेत त्यांना वास्तू योग प्राप्त होईल. जे लोक भूमीच्या शोधामध्ये आहेत त्यांना भूमी योग प्राप्त होईल, असे भविष्य ज्योतिषाचार्य पांडव यांनी वर्तवले आहे. छाया ग्रह केतुची वक्री गती, या 3 राशीच्या लोकांना बनवू शकते श्रीमंत! ही घ्यावी लागेल काळजी या राशीच्या लोकांना गुरु आणि राहू हे देखील त्यांच्या पंचमास्थानातून गोचरीचे भ्रमण करत आहेत. याला चांडाळ योग असं म्हणतात. या लोकांनी विशेषतः आपल्या शरीराची काळजी घ्यायला पाहिजे. प्रामुख्याने कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस वाढणार नाही आणि हृदयाचा कुठलाही त्रास वाढणार नाही याची काळजी घ्यावी. जे व्यक्ती व्यवसाय, व्यापार, नोकरी करत आहेत त्यांनी आपली चिंता शांत ठेवावी आणि जास्तीत जास्त आपल्या स्वतःची काळजी, असा सल्ला पांडव यांनी दिला आहे. (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)