मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /आजचे राशीभविष्य : वृषभ राशीला शैक्षणिक प्रगतीचा योग, जाणून घ्या सोमवार तुमच्या राशीत काय घेऊन आलाय

आजचे राशीभविष्य : वृषभ राशीला शैक्षणिक प्रगतीचा योग, जाणून घ्या सोमवार तुमच्या राशीत काय घेऊन आलाय

यासोबतच कर्क लोकांच्या आरोग्य आणि वैवाहिक जीवनावरही विपरित परिणाम होऊ शकतो, काळजी घ्यावी. याशिवाय संक्रमण काळात खर्चही वाढेल. प्रवासादरम्यान विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

यासोबतच कर्क लोकांच्या आरोग्य आणि वैवाहिक जीवनावरही विपरित परिणाम होऊ शकतो, काळजी घ्यावी. याशिवाय संक्रमण काळात खर्चही वाढेल. प्रवासादरम्यान विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

आज दिनांक 18 ऑक्टोबर 2021 सोमवार, अश्विन शुद्ध त्रयोदशी. चंद्र आज दुपारनंतर मीन राशीतून भ्रमण करेल.

मेष

आज व्यय स्थानातील चंद्र भ्रमण फारसे अनुकूल नाही. हुरहूर, निरुत्साह जाणवेल. व्यय होईल. आर्थिक बाजू सांभाळा. प्रकृतीच्या तक्रारी असतील. दिवस मध्यम जाईल.

वृषभ

दिवस लाभदायक असून मित्र मैत्रिणींसोबत मौज मजेचे प्लॅन आखले जातील. आर्थिक स्थिती उत्तम राहील. पंचम स्थानात बुध शैक्षणिक प्रगती होईल. दिवस चांगला आहे.

मिथुन

आज दिवस संथ जाईल. तुमचा अधिकार वाढेल. काही उत्तम निर्णय घ्याल. काम जास्त असेल. पण फळ मिळेल. आरोग्य ठीक राहील. आर्थिक बाजु ठीक. दिवस शुभ आहे.

कर्क

भाग्य आज जोरात आहे.  चंद्र बुधाच्या प्रतियोगात असून आध्यात्मिक प्रगती होईल. मोठ्या व्यक्तींचे आशीर्वाद मिळतील. देव धर्म कराल. खर्च बेताने करा. दिवस शुभ आहे.

सिंह

आज राशीच्या अष्टमात होणारे चंद्र भ्रमण अनेक बाबतीत समस्या निर्माण करेल. वाहन जपुन चालवा. अपघात, प्रकृती सांभाळा. कोणाशी भांडण करू नका. विलासी वृत्ती वाढीस लागेल. दिवस मध्यम आहे.

कन्या

आज तुम्ही दोघ एकमेकांना सांभाळून घ्याल. जोडीने घरासाठी खरेदी होईल. कार्यक्षेत्रातील अडचणी कमी होतील. विचित्र ग्रहमान आहे.मानसिक ताण येईल. धार्मिक बाबतीत फारसे मन रमणार नाही. प्रकृती जपा. दिवस मध्यम.

तुला

आज षष्ठ चंद्र शारीरिक कष्ट दाखवत आहे. पैशाची देवाण घेवाण जपून करा. नातेवाईकांना भेट द्याल. राशीत प्रवेश केलेला सूर्य आत्मविश्वास डळमळीत करेल.

आर्थिक लाभ संभवतात. दिवस मध्यम जाईल.

वृश्चिक

आज संतती साठी काही निर्णय घ्याल. त्यांना वेळ द्याल. नोकरीत उत्तम संधी मिळतील. मुलाखतीतून यश मिळेल. व्यय मंगळ  सावधगिरीचा संकेत देत आहे.दिवस उत्तम.

धनु

आज धनु राशीच्या व्यक्ती साठी दिवस घरगुती काम, जबाबदारी वाढवणार आहे. सूर्य कार्य क्षेत्रात प्रगती दाखवतो आहे. कायदा पाळा. आरोग्य सांभाळा. दिवस बरा आहे.

मकर

मौज मजेचा दिवस आहे. महत्त्वाचे फोन, भेटीगाठी, प्रवास योग आहेत. प्रकृती कडे लक्ष द्या. प्रवासात जपुन रहा.  बहिण भावाच्या भेटीचा योग येईल. दिवस चांगला आहे.

कुंभ

राशीच्या व्यक्तींना उत्तम आर्थिक लाभ करून देणारा दिवस आहे. सहज बोलून पैसा वसुल होईल. प्रकृती कडे दुर्लक्ष नको. अधिकारी व्यक्तीशी भेट होईल. दिवस कुटुंबातील व्यक्ती सोबत आनंदात घालवा.

मीन

आज राशीतील चंद्र तुम्हाला  मानसिक शांती, समाधान देईल. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. भावंडाची भेट होईल. आर्थिक बाजु चांगली राहील. लाभ  होतील. आरोग्य ठीक. दिवस शुभ आहे.

शुभम भवतु!!

First published:
top videos

    Tags: Astrology and horoscope