मुंबई, 05 ऑक्टोबर : हिंदू धर्मात दसरा हा सण असत्यावर सत्याचा विजय, वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतिक आहे. हा उत्सव दरवर्षी शारदीय नवरात्रीच्या दहाव्या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी रावणाच्या पुतळ्याचे दहन केले जाते. यावेळी दसरा हा सण आज 05 ऑक्टोबर 2022 रोजी साजरा होत आहे. ज्योतिषशास्त्रात असे अनेक उपाय आहेत, जे या काळात केल्याने ते अधिक प्रभावी ठरतात. भोपाळचे ज्योतिषी विनोद सोनी पोद्दार 12 राशींनुसार ज्योतिषीय उपाय सांगत आहेत, ज्याद्वारे तुम्हाला फायदा होऊ शकतो. असे मानले जाते की, या दिवशी हनुमानाची विशेष पूजा केल्याने सर्व संकटे दूर होतात. मेष - मेष राशीच्या लोकांनी या दिवशी तुपाचा दिवा लावावा आणि हनुमान कवचचे पठण करावे, ज्यामुळे त्यांना आत्मविश्वास मिळेल. वृषभ - दसऱ्याच्या दिवशी हनुमान मंदिरात किंवा घरी रामचरित मानस (अखंड रामायण) पाठ करा. जीवनातील सर्व समस्या दूर होतील. मिथुन - दसऱ्याच्या दिवशी रामायणातील आरण्यक कांडाचे पठण करावे. यानंतर हनुमानाला पान अर्पण करा आणि कोणत्याही गायीला खाऊ घाला. कर्क - कर्क राशीच्या लोकांनी दसऱ्याच्या दिवशी पंचमुखी हनुमान कवच पाठ करून हनुमानजींना पिवळे फूल अर्पण करून ते पाण्यात विसर्जन करावे.
सिंह - सिंह राशीच्या लोकांनी दसर्याच्या दिवशी बाल कांडाचे पठण करावे. कन्या - कन्या राशीच्या लोकांनी दसऱ्याच्या दिवशी सुंदरकांडाचे पठण करावे, तसेच बजरंगबलीच्या प्रतिमेसमोर तुपाचा दिवा लावावा. तूळ - तूळ राशीच्या लोकांनी दसर्याच्या दिवशी बाल कांडचे पठण करावे. यानंतर हनुमानाला तांदळाची खीर अर्पण करा. वृश्चिक - वृश्चिक राशीवर शनिची साडेसाती सुरू होणार आहे. अशा स्थितीत हनुमानाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी दसऱ्याच्या दिवशी हनुमान अष्टकाचे पठण करावे. धनु - धनु राशीच्या लोकांनी दसऱ्याच्या दिवशी अयोध्याकांडाचे पठण करावे. तसेच हनुमानाला शुद्ध मध अर्पण करा. मकर - मकर राशीच्या लोकांनी दसऱ्याच्या दिवशी किष्किंधकांडाचे पठण करावे. तसेच हनुमानाला लाल डाळ अर्पण करा आणि मासे किंवा बकऱ्यांना खायला द्या. हे वाचा - मंदिरात दिवा लावताना या छोट्या गोष्टी कायम लक्षात ठेवा, मनोकामना होतात पूर्ण कुंभ - कुंभ राशीच्या लोकांनी दसऱ्याच्या दिवशी उत्तर-कांड पाठ करा. तसेच गोड गुळाची पोळी बनवून हनुमानाला अर्पण करा, नंतर मुंग्यांना खाऊ घाला. मीन - मीन राशीच्या लोकांनी दसऱ्याच्या दिवशी हनुमान बाहुकचा पाठ करावा. तसेच हनुमानजींना लाल फुले किंवा हार अर्पण करा.