व्हायरल
नवी दिल्ली, 25 फेब्रुवारी : सोशल मीडियावर लोकप्रिय होण्यासाठी लोक अनेक वेगवेगळ्या गोष्टी करत असतात. आपण सगळ्यांपेक्षा काहीतरी हटके करावं आणि सगळ्यांपेक्षा वेगळं दिसावं यासाठी सोशल मीडियावर तरुण तरुणी खूप काही करताना दिसतात. यामध्ये मजेशीर व्हिडीओ, विचित्र व्हिडीओ, धोकादायक स्टंट या सगळ्यांचा समावेश असतो. मात्र कधी कधी काहीतरी विचित्र करण्याच्या नादात ते त्यांच्याच अंगलट येतं. असाच काहीसा प्रकार एका तरुणीसोबत घडला असून तिचा व्हिडीओदेखील समोर आला आहे. सध्या समोर आलेल्या व्हिडीओमध्ये एक तरुणीला स्टंट करणं महागात पडलं. तिच्या व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. व्हिडीओमध्ये दिसतंय की, एक मुलगी वाहत्या नदीच्या वरच्या लाकडी फांदीवर योगा करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. यासाठी ती आपले शरीर पूर्णपणे मागे वाकवते. सर्व काही सुरळीत चालले होते की अचानक तिचा तोल गेला आणि जोरात ती नदीत पडली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप पाहिला जात आहे आणि व्हायरलही होत आहे.
असे स्टंट करणे किती धोकादायक आहे हे तुम्ही पाहिले आहे का? हा अपघात किती भीषण असेल याचा अंदाज व्हिडीओ पाहूनच बांधता येतो. सोशल मीडियावर अशा सर्व स्टंट्सचे व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असून व्हिडीओवर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. @wtf_scene नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे.
दरम्यान, असे स्टंट व्हिडीओ बनवण्याच्या नादात अनेकांसोबत असे धोकादायक प्रकार घडले आहेत. यापूर्वीही सोशल मीडियावर असे अनेक स्टंटचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. प्रसिद्धी झोतात येण्यासाठी लोक काय काय करतात हा व्हिडीओ पाहून तुम्हाला अंदाज आलाच असेल.