JOIN US
मराठी बातम्या / Viral / या तरुणानं केली कमाल, चक्क बनवली इलेक्ट्रिक बुलेट, किंमत ऐकून हैराण व्हाल

या तरुणानं केली कमाल, चक्क बनवली इलेक्ट्रिक बुलेट, किंमत ऐकून हैराण व्हाल

एका तरुणाने चक्क बुलेट बाइक तयार केली आहे,

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

संदीप सैनी, प्रतिनिधी हिसार, 2 जून : चारचाकी गाड्यांपेक्षा तरुणांमध्ये जास्त क्रेझ असते ती दुचाकीची अर्थात मोटारसायकलची. या बाइकमध्ये हे फिचर आहेत, त्या बाइकमध्ये ते फिचर आहेत, अशा चर्चा तरुणांमध्ये सर्रास ऐकायला मिळतात. शिवाय लाखो रुपये जमवून किंवा कर्ज घेऊन तरुण हौस म्हणून बाइक खरेदी करत असतात. अशातच 70 हजारात बुलेट बाइक मिळाली तर किती आनंद होईल ना? आपण 70 हजारात बुलेटचा विचारही करू शकत नाही, तोच हरियाणाच्या हिसार भागातील एका तरुणाने 70 हजारात चक्क बुलेट बाइक तयार केली आहे, तीदेखील साधीसुधी नाही, तर इलेक्ट्रिक बुलेट बाइक.

हरयाणाच्या हिसारमधील सीसर या लहानशा गावात महावीर पेंटर यांनी लाकडाच्या सहाय्याने इलेक्ट्रिक बुलेट बाइक बनवली आहे. या बाइकमुळे प्रदूषण कमी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. या बाइकमध्ये 12 वोल्टची बॅटरी बसवण्यात आली असून चार्जिंगनंतर ती 50 किलोमीटरपर्यंत धावू शकेल. शिवाय 400 किलो वजन पेलवण्याची तिची क्षमता आहे. दरम्यान, महावीर यांना लहानपणापासूनच नवे शोध लावण्याचा आणि नवनवीन वस्तू बनवण्याचा छंद होता. त्यांनी इलेक्ट्रिक सायकलसह छोटा इलेक्ट्रिक ट्रॅक्टरसुद्धा बनवला होता. आता भविष्यात ड्रोन बनवण्याचं त्यांचं स्वप्न आहे. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ते प्रचंड मेहनत घेत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या